याचा एकच खुराक घ्यायचा.! खोकला कायमचा विसरून जायचा.! घशात साठलेला सगळा कफ होईल मोकळा.! खूप उपयोगी पडेल.!

आरोग्य

आपल्या भारत देशाला हा असा देश आहे ज्याला तीन ऋतू लाभले आहेत आणि ते म्हणजे उन्हाळा पावसाळा व हिवाळा. हिवाळा आपल्या पैकी अनेकांचा आवडीचा ऋतू आहे. गुलाबी थंडी व सोबतच परिसरातील वातवरण देखील साजरे तयार होते. मात्र हा ऋतू आपल्या सोबत अनेक आजार देखील घेऊन येतो. हिवाळ्यात आपल्या आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते व अनेक आजारांना आपण बळी पडू लागतो.

आपण खाल्लेले अन्न देखील योग्य प्रमाणात व योग्य वेळी पचन होत नाही. आता हिवाळा सुरु झाला आहे आणि सोबतच अनेकांना सर्दी, खोकला व ताप अचानक व वारंवार भरु लागतो. सोबतच अंग दुखी व जुनाट आधी लागलेले शारिरीक मार या थंडीच्या दिवसात दुखू लागतात. आणि या सोबतच घश्यात कफ जमा होवू लागतो अश्या वेळी सारखे इस्पितळात धाव घेणे बरे नाही आणि या साठी आता वेळ देखील आपल्याकडे नसतो.

जर तुम्ही या समस्यांवर चांगला नैसर्गिक व रामबाण उपाय शोधत आहात तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला असा एक चमत्कारिक व गुणकारी उपाय सांगणार आहोत ज्याच्या एका वापराने तुम्ही हिवाळ्यात कधीच आजारी पडणार नाहीत. फक्त एकदा हा उपाय आचरणात आणलात की शरीराची रोग प्रतिकार शक्ती चांगलीच वाढेल. सर्दी ताप व खोकल्यासारखे आजार तुमच्या व परिवाराच्या आस पास भटकणार सुद्धा नाहीत.

हे वाचा:   केसांना लावा हा अंड्याचा शाम्पू, केस बनतील एखाद्या हिरोईन सारखे.! लांबसडक केस हवे असतील तर हे कराच.!

तुमच्या घश्यात तयार होणारा कफ आता गायब होईल. हा उपाय एक आयुर्वेदीक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम होत नाही. सोबतच हा एक घरगुती उपाय असल्याने तुम्ही हा कमी पैशात घरच्या घरीच तयार करु शकता. म्हणूनच हा सामान्य लोकांच्या देखील खिशाला परवडेल. चला आता वेळ न दवडता सदर लेखात पुढे या उपायाला लागणारी सामग्री व याला बनवण्याची कृती जाणून घेवूया.

हा रामबाण उपाय तयार करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे. पेरूची पाने. पेरूच्या फळाला तुम्ही ओळखतच असाल. हे चवील गोड व मधुर असते. याच्या सेवनाने शरीराला विविध प्रकारचे मिनरल्स व जीवनसत्वे मिळतात. या फळाची पाने देखील खूप प्रमाणावर उपयुक्त व औषधी असतात. आपली सर्दी, खोकला व घश्यात जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी दोन ते चार पाने पेरूची घ्या.

आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे काळी मिरी. भारतीय मसाल्यांमध्ये ही काळी मिरी मुख्य प्रमाणावर वापरली जाते. परंतू याचे औषधी गुणधर्म देखील आहेत. उष्ण असल्या कारणाने सर्दी व खोकल्यावर ही एक रामबाण उपाय आहे. या सोबतच शरिरातील आम्ल पित्त देखील कमी करण्यासाठी काळी मिरी उपयुक्त आहे. चार ते पाच फळे काळी मिरीची घ्या. तीसरा घटक जो आवश्यक आहे तो म्हणजे आले.

हे वाचा:   पिठाचा उंडा फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या महिला आवर्जून वाचा, वाचल्यानंतर म्हणाल अशी चूक पुन्हा करणार नाही.!

आले शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. याच्या सेवनाने घश्याला आराम मिळतो. झोप उडते व डोके शांत होवू लागते. एक छोटा तुकडा आले किसून घ्या. आता पेरूची पाने बारीक चुरा एक 200 मि.ली. पाण्यात टाका. यात काळी मिरी व आले सुद्धा टाका. आता गॅसवर हे मिश्रण गरम होण्यासाठी ठेवा. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा. यात चवीपुरता गूळ देखील तुम्ही टाकू शकता.

आता या मिश्रणाचे सेवन तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर व दुपारी 4 च्या सुमारास करु शकता. याच्या प्रभावाने तुम्हाला असणार्या सर्दी खोकला व घश्याच्या समस्या अथवा कफाची समस्या या त्वरित नैसर्गिकरित्या समूळ नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.