अगदी लहान असतानाच का होतात केस पांढरे.? त्यामागे असतात ही कारणे.! ही लहानशी चूक करू शकते केसांचे वाटोळे.!

आरोग्य

मित्रांनो मानवाला साज शृंगाराची खूप आवड आहे. पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत त्याला सर्व कही नीट व आकर्षक हवे असते. केस हे माणसाचे सर्वात पहिले आकर्षण केंद्र आहे. आज मी आपल्यासाठी केसांचे आरोग्य टिकवून ठेवणारा आणि केस जर गळत असतील, तुटत असतील किंवा केसांच्या काही समस्या असतील, तर यापासून सुटका करून देणारा असा उपाय घेऊन आली आहे.

तर यासाठी आपल्याला लागणार आहे, जास्वनंदाच्या झाडाची पाने किंवा फुले. तुमच्याकडे जर फुले असतील तर तुम्ही फुले घ्या आणि नसतील तर यासाठी पाने घेतली तरी देखील वापर करू शकतो. तर येथे आपल्याला जास्वनंदाच्या झाडाची पाने घ्यायची आहेत. ही प्रथम देठापासून काढून घ्यायची आहेत. आणि हाताने बारीक करून घ्यायची आहेत. एक लोखंडाचे पात्र घ्या.

जर तुमच्याकडे लोकांडाचे पात्र नसेल, तर दुसऱ्या पत्राचा देखील आपण येथे वापर करू शकतो. परंतु तुमच्याकडे जर लोकांडाचे पात्र असेल तर, तुम्ही लोकांडाच्या पत्राचाच वापर करा.आता या लोखंडच्या पात्रात अर्धी वाटी भरून तेल टाकायचे आहे. आणि त्या तेलमध्येच थोडेसे, किमान पण वाटी असे तिळाचे तेल घ्यायचे आहे. आणि जी आपण पाने तोडून घेतली आहेत ती देखील यामध्ये टाकून घ्या.

हे छान मंद आचेवर उकळवून घ्यायचे आहे. हे उकळण्यासाठी किमान तीन ते चार मिनिटे लागतील. परंतु हे संपूर्ण मंद आचेवरच उकळवून घ्यायचे आहे. म्हणजे या पानांचा जो अर्क आहे तो या तेलामध्ये छान उतरला जातो. आणि यापासून आपल्यला पूर्णपणे फायदा होतो. आता हे तेल तयार झाले आहे, हे कसे समजणार..? तर ही जी पाने आहेत ती आपण ताजी घेतली आहेत. परंतु नंतर ही जी पाने आहेत ती कडक होणार आहेत.

हे वाचा:   साबण वापरण्या ऐवजी हे वापरा, त्वचा लहान बाळाच्या त्वचा सारखी कोमल आणि सुंदर बनेल, पिंपल्स तर कायमचे विसरा.!

परंतु हिरवीच आहेत. म्हणजेच याचा रंग न बदलताच ही कडक होतील आणि असे झाले की आपले तेल येथे तयार झाले आहे असे समजावे. कारण हे जर आपण जास्त वेळ ठेवले तर त्या पानांचा रंग चेंज होईल. लगेचच याचा रंग काळा होईल. म्हणजेच काळा झाल्यामुळे, या तेलामध्ये जो अर्क उतरला आहे तो सुद्धा जळून जातो. म्हणून हा मंद आचेवर आणि ही पाने हिरवी असतानाच गॅस बंद करावा.
हे तयार झालेले तेल थोडेसे थंड होऊद्या.

नंतर हे तेल एका बॉटल मध्ये गाळून घ्यायचे आहे. याचप्रमाणे आपण जास्त देखील तेल तयार करून ठेवू शकतो. किंवा या तेलांएवजी, जे तेल तुम्ही केसां करीता वापरता त्या तेलामध्ये हि पांने टाकून वापरली तरी देखील चालेल आणि येथे मी व्हिटॅमिन इ ची कैप्सुल घेतली आहे. विटामीन इ ची कैप्सुल आपल्याला मेडिकल स्टोर मध्ये सहज उपलब्ध होईल.

हे वाचा:   काळे, पिवळे, खराब झालेले दात किती दिवस लोकांना दाखवणार.! आजच करा हा घरगुती उपाय.! एकही रुपया खर्च न करता दात बनतील हिऱ्यासारखे.!

तर हे तेल थंड झाले कि त्यामध्ये फक्त एक कैप्लसुलच जेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला किमान अर्धी वाटी तेल तयार मिळेल. यामध्ये आपल्याला एका कैप्सुल चे तेल टाकायचे आहे आणि जर आपण जास्त तेल तयार केले, तर त्यानुसार कैप्सुल चा कमी जास्त वापर करू शकता. आणि हे तयार झालेले तेल आठवड्यातून किमान दोन वेळा स्क्याल्प पासून केसांच्या खालच्या टोकापर्यंत लावून छान मसाज करायची आहे.

यामुळे केसांच्या सर्व समस्या कधी निघून गेल्या ह्यादेखील आपल्याला कळणार नाही. आणि केस गळती तर लगेचच थांबण्यास मदत होईल. आहे की नाही अत्यंत साधासुधा आणि अगदी नैसर्गिक उपाय. नक्की करून पहा हा उपाय. या उपायाचे तुमच्या शरीरावर काहीच दुष्परिणाम दिसून येत नाहीत म्हणून बिनधास्त याचा वापर करा व आपल्या केसांचे आरोग्य टिकवून ठेवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.