हार्ट अटॅक आल्यावर कोणताही व्यक्ती असो असे केल्याने त्याचा जीव वाचतोच.! हे प्रत्येकाला माहिती असावे अनेकांचे प्राण वाचू शकतात.!

आरोग्य

भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदय आपल्या शरीराचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे. जर हृदय नीट असेल अथवा योग्य आकारात आकुंचन करत असेल तर तुम्हाला कोणता ही मोठा विकार होत नाही. शरीरात रक्त शुद्ध करण्याचे यंत्र म्हणजे हृदय होय. माणसाला चांगले आरोग्य हवे असेल तर त्याने आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे.

आज काल आपण आपल्या आहारात देखील जास्त प्रमाणात बाहेर तयार झालेले अरबट सरबट व मसालेदार पदार्थ खातो आणि घरातील संतुलित आहार खाणे टाळतो. हेच जंक फूड व फास्ट फूड खाल्यास आपल्या शरीराला हानी होते. मोठ्या प्रमाणावर आपल्या हृदयाला याचा तोटा होत आहे व अनेक नव नवीन हृदयाचे आजार आता माणसाला होत आहेत.

मित्रांनो एका संशोधना दरम्यानच्या सर्व आकडेवारी वरून असे दिसून आले आहे की, भारतात हृदय विकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यात तरुण मंडळींचाही समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदय. विकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्या इतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्‍याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते

हे वाचा:   फक्त अर्धा कांदा तुमचे पांढरे झालेले केस काळे करेल, पंधरा दिवसाच्या आत केस काळे झालेले दिसतील...!

आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणे आणि प्रथमोपचार संबंधित आवश्यक माहिती जाणून घेतलीच पाहिजे. हृदय विकाराचा झटका येताना ही लक्षणे दिसू शकतात. छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, घाम येणे.

चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, श्वास लागणे, मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. मात्र कधीकधी वेदना खूपच जोरात होतात, तर कधीकधी सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता झटका आल्यास प्रथमोपचार म्हणून काय कराल? मित्रांनो जर सदर व्यक्ती शुद्धीत असेल, तर ताबडतोब त्यांना 300 मिलीग्राम एस्पिरिन द्या.

हे रक्त पातळ करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कधीकधी रक्ताची गुठळ्या होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनू शकते. जर असे काही झाले, तर त्याला आराम मिळेल. परंतु यासह, रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा. जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर ताबडतोब त्याला सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास तपासा. शिवाय नाडी देखील तपासा.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा एसिडिटी होत असेल तर एकदा हे वाचा.! काहीही खाल्ले तरी असे पचले जाते.! त्यासाठी असावे लागेल तुमच्याकडे ही एक गोष्ट.!

श्वास किंवा नाडी येत नसेल तर ताबडतोब सी पीआर द्या. यासाठी आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्या वर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णाची छाती दाबा. लक्षात ठेवा की, आपल्याला दर मिनिटाला 100 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करवी लागेल.

रुग्णाची छाती दाबा आणि प्रत्येक 25-30 वेळा रुग्णाला तोंडाद्वारे ऑक्सिजन द्या. तोंडाद्वारे ऑक्सिजन देताना त्या व्यक्तीचे नाक बंद करा. कॉम्प्रेशन दरम्यान, रुग्णाच्या छातीच्या हाडात किंवा बरगड्यांमध्ये कोणतीही समस्या नसल्याची खात्री करून घ्या, कारण रुग्णाचे आयुष्य वाचवणे याला प्रथम प्राधान्य आहे. उर्वरित समस्या रुग्णालयात देखील हाताळल्या जाऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.