या गावरान उपायाने अनेक लोक आपली केस काळे कुट्ट करतात.! ना कुठला शाम्पू ना डाय बिना खर्चात काळे असे होतात केस.!

आरोग्य

मित्रांनो, आज-काल आपली सुंदरता ही आपले केस यावरून ठरवली जाते. परंतु अनेक तरुणांमध्ये लवकरच केस सफेद होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर लवकरच सफेद होणारे केस कमी होऊ शकतात. परंतु सफेद केस असतील तर त्यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात तेही आपण बघायला हवे. आजकाल आपणाला सर्वच ठिकाणी म्हणजेच सर्वांचेच केस पांढरे झालेले पाहायला मिळतात.

पांढरे केस यामुळे आपल्या सौंदर्य हे पिके पडून जाते. मग आपण आपले केस हे काळे करण्यासाठी अनेक केमिकल चा वापर करतो. अनेक प्रकारच्या मेहंदी, क्रीम्स आपण लावत असतो. परंतु मित्रांनो या केमिकलचा आपल्यावर साईड इफेक्ट देखील व्हायला लागतो. त्यामुळे मग आपण कोणत्याच क्रीम्स वापरण्यास तयार नसतो. तर मित्रांनो आज तुम्हाला एक घरच्या घरी करता येणारा डाय सांगणार आहे.

हे डाय तुम्ही जर आपले केसांना लावले तर यामुळे तुमचे जे काही पांढरे केस झालेले आहेत ते काळे होण्यास मदत होईल. तर मित्रांनो हे डाय आपण घरच्या घरी बनवू शकतो. यासाठी आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. मित्रांनो त्याचा फायदा कमी-जास्त होऊ शकतो. परंतु याचा कोणत्याही प्रकारची नुकसान आपल्याला होणार नाही. तर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया हे डाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे ते.

तर मित्रांनो आपणाला यासाठी लागणार आहे ते म्हणजे नारळाची साल. आपण नारळ फोडण्यासाठी आणतो किंवा एखाद्या पदार्थांमध्ये वापरण्यासाठी आणतो आणि त्यानंतर आपण त्या नारळावरची साल जी आहे ती फेकून देतो. परंतु मित्रांनो या नारळाच्या सालीचा आपल्याला खूपच फायदा होणार आहे. तर मित्रांनो या सालीमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नसल्याने आपणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

तर मित्रांनो ही नारळाची साल आपल्याला घ्यायची आहे. तर मित्रांनो या नारळाच्या सली घट्ट असतात. त्या थोड्याफार आपणाला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. नंतर आपणाला लोखंडाची कढई तुमच्या घरी जर असेल तर लोखंडाची कढई घेऊ शकता किंवा इतर प्रकारची कोणतीही कढई असेल तर ती कढई घ्यायची आहे. त्या कढईला थोडे गरम करायचा आहे.

या कढईमध्ये आपल्याला मोकळ्या केलेल्या या नारळाच्या साली ठेवायचे आहेत आणि सावकाशपणे ह्याला भाजायचे आहे. त्यावेळेस आपण आपला गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि या साली एक प्रकारच्या आपणाला त्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. या साली आपणाला हलवत राहायच्या आहेत. नंतर या साली मधून आपल्याला धूर निघालेला दिसेल.

हे वाचा:   जर कुठे आढळली ही वनस्पती तर पटकन घरी घेऊन या; दम्याच्या आजारावर आहे रामबाण उपाय.!

या साली सुकलेल्या असल्यामुळे याला आग देखील लागण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला कढईमध्ये या साली भाजून घ्यायचे आहेत. नंतर तुम्हाला या साली भाजलेल्या पूर्ण जाणवतील म्हणजेच एक प्रकारचा धूर या साली मधून निघेल. धूर निघून या साली जळायला लागतील. जर तुम्हाला घराबाहेर शक्य असेल तर तुम्ही घराबाहेर या साली देखील कढईमध्ये भाजून घेऊ शकता.

तर मित्रांनो या साली भाजल्यानंतर एक प्रकारची राख याची तयार होते. लहान मुलांना यापासून आपल्याला दूर ठेवायचे आहे. नंतर आपणाला गॅस बंद करून हे राख आपणाला थंड करून घ्यायचे आहे. नंतर मित्रांनो या राखेला आपण चमच्याच्या साह्याने बारीक करून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर मित्रांनो ही राख आपणाला चाळून घ्यायची आहे म्हणजेच जे काही मोठे कोण असतील ते बाजूला काढून फेकून द्यायचे आहेत आणि जी बारीक राख आहे ते आपल्याला घ्यायची आहे.

मित्रांनो तुम्ही वर्षभरासाठी देखील स्टोअर करून ठेवू शकता. तर मित्रांनो याच्या वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने याचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस काळे होण्यासोबतच वाढण्यास देखील मदत होते. आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. तुम्हाला यातील कोणतीही पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. तर त्या पद्धती कोणते आहे ते आपण आता जाणून घेऊयात.

तर मित्रांनो तुम्हाला एका वाटीमध्ये ही राख घ्यायची आहे. जेवढे तुम्हाला राख हवी आहे तेवढी आपण एका वाटीमध्ये घ्यायची आहे. नंतर तुम्हाला कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचे तेल हे प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते. हे तेल आपणाला घ्यायचे आहे. आणि हे तेल आपणाला त्या राखेमध्ये मिक्स करायचे आहे. राख व्यवस्थित मिक्स होईल एवढे तेल आपल्याला घ्यायचे आहे आणि हे तुम्ही आपल्या केसांना लावू शकता.

हे वाचा:   सुकलेल्या नसांमध्ये रक्त भरेल, संतान प्राप्ती च सुखं देईल..अनेक रोगांचा सर्वनाश करेल ही जडिबुडी...! ज्याला मिळेल तो खरा नशीबवान.!

दुसरी पद्धत म्हणजे मित्रांनो तुम्ही एका वाटीमध्ये जेवढी हवी आहे तेवढी राख घ्यायची आणि त्यामध्ये फ्रेश एलोवेरा जेल तुम्ही त्या राखेमध्ये घालायचे आहे. ती राख व्यवस्थित मिक्स होईल एवढे एलोवेरा जेल त्यामध्ये घालायचे आहे. तसेच मित्रांनो तुम्ही जर एखादी मेहंदी लावत असाल तर त्या मेहंदी मध्ये तुम्ही एक चमचा तयार केलेले हे डाय म्हणजेच नारळाचे तेल आणि राख किंवा एलोवेरा जेल आणि राख हे डाय तुम्ही एक चमचा त्या मेंदीमध्ये मिक्स करून लावू शकता.

किंवा तुम्ही फक्त आपण जे काय तयार केलेले डाय आहे म्हणजेच नारळाचे तेल आणि राख मिक्स केलेले हे डाय किंवा एलोवेरा जेल आणि राख मिक्स केलेले हे डाय आहे तुम्ही लावू शकता. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीचा वापर करू शकता. तर मित्रांनो हे डाय तुम्ही डाय करण्याच्या ब्रशने लावू शकता किंवा कापूस घेऊन त्या कापसाच्या साह्याने देखील तुम्ही आपल्या केसांना लावू शकता.

तुम्हाला हे डाय दोन तास आपल्या केसांना लावून ठेवायचे आहे. जर कमी वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवू शकता आणि जर जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही रात्रभर हे डाय आपल्या केसांना लावू शकता आणि त्यावरती संध्याकाळी एक कपडा तुम्ही बांधून ठेवू शकता. याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. सकाळी तुम्ही एखाद्या हलक्या शाम्पू ने आपले केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.

तर मित्रांनो हे घरच्या घरी तयार केलेले डाय तुम्ही वापरले तर तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यास मदत होईल. तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि याचा रिझल्ट देखील तुम्हाला नक्की मिळेल. कोणताही साईड इफेक्ट या उपायाने तुम्हाला होणार नाही. तर मित्रांनो असा हा घरगुती डाय तुम्ही एकदा अवश्य करून पहा. त्यामुळे तुमचे केस वाढण्यास देखील मदत होईल. तसेच पांढरे केस काळे सुद्धा होतील.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.