पितांबरीने देव घसणारे जरा हे पण वाचा.! शास्त्रात असे करणे चुकीचे मानतात.! देवांची मूर्ती साफ करण्याची ही आहे शास्त्रशुद्ध पद्धत.!

आरोग्य

आपल्या घरामध्ये देवाच्या मुर्त्या असतात आपण त्याला बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक केमिकल किंवा कुठल्याही पावडर ने स्वच्छ करत असतो. अशा वेळी आपण काय करायला हवे.? बऱ्याच वेळा देवघरातल्या मूर्ती व्यवस्थित साफ न केल्यामुळे काळ्या पडतात आणि त्यांची चमक कमी व्हायला लागते. मूर्ती साफ करण्यासाठी कपडे धुवायची पावडर किंवा भांडी घासायचं लिक्विड वापरलं तरी, त्याने ती चकाकी येत नाही आणि त्यामुळे मूर्ती जुनाट वाटायला लागतात.

मित्रांनो अशा या काळवटलेल्या आणि काळ्या पडलेल्या मोठ्या कशा पद्धतीने स्वच्छ करावा असा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो. तर मित्रांनो आपल्यातील बरेच जण अशावेळी मार्केटमध्ये मिळणारे वेगवेगळे केमिकलचा वापर करत असतात आणि त्याचबरोबर इतर गोष्टींचा उपयोग करून ते काळे डाग काढण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु मित्रांनो आपण ज्यावेळी हे काळे काढण्यासाठी केमिकलचा वापर करतो तेव्हा त्या मुर्त्या खराब होण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर हे जे केमिकल आपल्याला बाजारामध्ये मोर्चा स्वच्छ करण्यासाठी मिळतात हे केमिकल खूप महाग असते आणि त्यासाठी आपल्याला जास्त किंमत सुद्धा मोजावे लागते. परंतु मित्रांनो आपण जर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतींचा आणि उपायांचा वापर करून आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुर्त्या स्वच्छ केल्या तर यामुळे त्या मुर्त्या नक्कीच स्वच्छ होतील.

तर मित्रांनो अशीच एक आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली सोपी पद्धत आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्त्या स्वच्छ करण्यासाठी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो.

तर कोणता आहे हा उपायआपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे काही घटक लागणार आहेत. त्यामधील सर्वात पहिला घटक म्हणजे बेसनचे पीठ. मित्रांनो बेसनचे पीठ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि याचा उपयोग करून आपण आपल्या घरामध्ये असणारे देवी देवतांच्या मुर्त्यांवरचे काळे डाग पडलेले आहेत ते नक्की काढू शकतो.

हे वाचा:   दाढ दुखी रात्रीतून थांबेल, दातातला किडा मिनिटात बाहेर येईल, हा छोटासा उपाय करून बघा कोणीही सांगितला नसेल.!

तर मित्रांनो यानंतर दुसरा जो आपल्याला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दही. मित्रांनो दहीही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि यामुळे आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवी-देवतांच्या मुर्त्या स्वच्छ करू शकतो. त्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो लिंबू हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच.

यामध्ये असणारे अनेक फायदेशीर घटक हे आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या मुर्त्या स्वच्छ करण्यासाठी मदत करत असतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने यातील पदार्थांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो सर्वात पहिला एका वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये आपल्याला दोन चमचे बेसनचे पीठ घ्यायचं आहे. मित्रांनो शक्यतो तुम्ही उपाय करत असताना ताजे बेसनचे पीठ वापरा.

अशा पद्धतीने दोन चमचे बेसनचे पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ते दीड चमचा दही घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू सुद्धा पिळायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तीन घटक आपल्याला एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये एकत्र करून घ्यायचा आहे. त्यानंतर चमचाच्या सहाय्याने याची एक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो या पेस्टचा वापर आपल्याला हा उपाय करत असताना करायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला तो पिळून राहिलेला अर्धा लिंबू ची साल आहे ती साल घेऊन आपल्याला ही पेस्ट त्या लिंबू च्या साह्याने त्या देवी देवतांच्या मूर्तीवर लावायचे आहे आणि थोडंसं घासून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला लिंबू च्या साह्याने त्यावर लावायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला ही पेस्ट त्या मुर्त्यांवरच राहू द्यायचे आहे.

हे वाचा:   सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी प्यायला या गोष्टीचे पाणी, अमृतासमान असते हे पाणी, फायदे ऐकले तर पायाखालची जमीन सरकेल.!

दहा मिनिटानंतर आपल्याला त्यावर थोडीशी पिठीसाखर टाकायचे आहे किंवा जर तुमच्याकडे पिठीसाखर उपलब्ध नसेल तर अशावेळी साखर मिक्सरला लावून त्याची पावडर तयार होईल. तर ती पावडर तुम्हाला या मुर्त्यांवर टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा त्या लिंबूच्या साह्याने आपल्याला ह्या मुर्त्या व्यवस्थितपणे घासून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्या लिंबूच्या साह्याने आपल्या मुर्त्या व्यवस्थितपणे घासून घ्यायचे आहे.

दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला या मुर्त्या घासून घेतल्यानंतर गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दिसून येईल की, तुमच्या ज्या काही काळवटलेल्या किंवा काळ्या पडलेल्या मूर्ती आहेत त्या चमकू लागलेले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये असलेल्या सोन्याच्या किंवा पितळेच्या ज्या काही देवी देवतांच्या मूर्ती आहेत त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.