केस फेविकोल सारखे चिकटले जातील.! कितीही तोडले तरी निघणार नाही.! एकदा जरी आणि एखादा जरी केस गळला तर बोला.! एकही केस गळला तर बोला.!

आरोग्य

केस हे स्त्री असो किंवा पुरुष सर्वांचा आवडता विषय यावरूनच आपली सुंदरता समजत असते. तुम्हाला माहीतच असेल केसांची वाढ होण्यासाठी, केसातील कोंडा घालवण्यासाठी , केस चमकदार आणि मुलायम करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. तसेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खूप प्रभावी घरगुती उपाय. दाट, काळेभोर केस सगळ्यांनाच आवडतात.

पण आपल्या खाण्यापिणाच्या वेळा बदलल्यामुळे आणि धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व जपायला वेळच मिळत नाही. आणि जपायचा प्रयत्न जरी केला तरी आजकाल बाजारात मिळणारी रासायनिक उत्पादने, केसांचे शाम्पू , कंडिशनर, जेल यांमुळे केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या सगळ्या रासायनिक उत्पादनांचा वापर करून केस तात्पुरते छान दिसतात पण त्यांचे आरोग्य बिघडत असते. काही जणांना केस गळतीचा खूप त्रास सहन करावा लागतो. केस गळणे, केस तुटणे, कोंडा होणे, केसांना बुरशी लागणे इत्यादी. या सगळ्यांवर हा उपाय फायदेशीर ठरेल. तो म्हणजे कडीपत्ता आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कडीपत्ता नीट सुकवून त्याची अर्धी वाटी पाने काढून घ्या.

हे वाचा:   टोमॅटो विकत घेताना ही गोष्ट नेहमी पाहूनच विकत घ्यावे, एक पण टोमॅटो खराब होणार नाही.!

पण हा कडीपत्ता कडक उन्हात सुकवू नका. पंख्याखाली हि पाने सुकवा. आणि त्यात खोबरेल तेल घाला. ही पाने आणि तेल मिक्स करून ते मिक्सरला वाटून घ्या. आणि हे मिश्रण गॅस वर ठेवून उकळवा. त्यासोबतच त्यात कडीपत्ता ची २-३ पाने अक्कही टाका. गॅस वर असताना हे मिश्रण अधून मधून ढवळून घ्या. हे मिश्रण 20 ते 25 मिनिटे उकळल्यानंतर जी दोन तीन अक्खी पाने तुम्ही तेलात टाकली आहेत.

ती कुरकुरीत झालेली दिसतील. यावरून तुम्हाला कळेल की हे तेल आता तयार झाले आहे. हे तेल वापरताना शक्यतो कोमट करूनच घ्यावे. तेल कोमट करून केसांना लावल्यास ते केसांवर जास्त घासावे लागत नाही. कोमट असल्याने ते लगेच केसात जिरते. अशाप्रकारे केसांना पोषण मिळाल्याने केस मजबूत होतात. थंड तेल केसांना लावल्याने ते जास्त वेळ मालिश करावे लागते.

पण अशाप्रकारे जास्त मालिश केल्याने सुद्धा केस तुटू लागतात आणि गळतात सुद्धा. कडीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमिन E असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. केसगळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस, केस विरळ होणे, तुटत राहणे ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे.

हे वाचा:   हे फळ कुठे मिळाले तर पटकन घरी आणावे, आरोग्यासाठी आहे वरदान, पोटासंबंधी च्या अनेक समस्या होतील दूर, अपचन आणि गॅसला कायमचे विसरा...!

या सगळ्यावर कडीपत्ता अत्यंत गुणकारी आहे. नारळ तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल लावल्याने कोंडा, कोरडेपणा अशा समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे. या तेलामुळे केसांची वाढ होऊन केस मजबूत बनतात. म्हणूनच हे तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.