रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके रिकामी पोटी खाण्याचे चमत्कारिक फायदे..! 100 आजार कायमचे दूर पळून जातील..!

आरोग्य

सुका मेवा आपल्या पैकी अनेक लोकांना खाण्यास आवडतो. यात अनेक घटक येतात जसे बदाम, काजू, अक्रोड व मनुका. बदाम, काजू अथवा अक्रोड खाण्यास शरीरात गरमी वाढते त्याच बरोबर शरीरात पित्ताचा संचार देखील होवू लागतो. मात्र मनुके खाण्यास कोणता ही धोका नाही. मनुके हे द्राक्षाच्या फळा पासून तयार केले जातात. यांची बनवण्यासाठी लागणारी प्रक्रिया सोपी आहे. चांगली रसाळ द्राक्षे घ्यावीत व सुकायला घालावीत यांच्या आत असणारा रस घट्ट होतो व मनुके तयार होतात. मनुके दोन प्रकारचे असतात एक जे हिरव्या द्राक्षा पासून तयार होतात आणि दुसरे जे काळ्या रंगाच्या द्राक्षा पासून तयार केले जातात.

हे जास्त महाग देखील नाहीत. यांच्या सेवनाने शरीराला फक्त फक्त फायदे होतात. मित्रांनो मनुके आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. अनेक वेळा आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल अश्या वेळी रोज मूठभर मनुके खावेत. याने तुमचा थकवा शीण दूर होईल आणि तुम्हाला ताजेपणा वाटू लागेल. याच्या बरोबर शरीराची रोगां सोबत लढणारी रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी देखील प्रचंड वाढू लागेल.

सकाळी न्याहरीच्या समयी मनुके सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी प्रखर होते असे शास्त्रज्ञ सांगतात. ज्या लोकांना दृष्टीचा प्रॉब्लेम आहे तसेच मोठा भिंगाचा चष्मा अगदी लहान वयातच लागला आहे अश्या लोकांनी सकाळच्या समयी मनुके नक्कीच खावेत. जे लोक व्यायाम करतात ज्यांना आपली शरीर यष्टी चांगली करायची आहे अश्या लोकांनी देखील केळ्या सोबत दहा ते बारा मनुके सकाळच्या वेळात नक्कीच खावेत. लहान मुलांना पालकांनी मनुके आवर्जून द्यावेत याच्या मागचे कारण म्हणजे मनुक्याच्या सेवनाने त्यांची बुद्धी चांगलीच तल्लख होते. रोज रात्री झोपण्याच्या आधी दुधातून चार ते पाच मनुके खाल्याने स्मरण शक्ती वाढू लागते व अभ्यासात देखील लक्ष्य लागते. सोबतच हे गोड असल्याने लहान मुले ही खाण्यासाठी रुची दाखवतात.

हे वाचा:   मुलींनो गालावर एकही केस परत उगणार नाही.! त्यासाठी करायला लागेल एवढं सोप्प काम.! नको ते केस असे कायमचे ब्लॉक करा.!

• मनुके पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे या घटकांची वाढ होते.

मित्रांनो आपण पाहिले मनुके खाल्याने काय काय फायदे आपल्या शरीराला होतात आता आपण पाहणार आहोत पाण्यात रात्र भर भिजवून सकाळी ही मनुके ग्रहण केल्यास कोणते घटक यात वाढू लागतात आणि याची अजून कोणते फायदे आपल्या शरीराला होतात. मित्रांनो मनुक्याच्या भिजवून नंतर सेवनाने शरीरातील घा’ण म्हणजेच टॉ’क्सिक घटक हे बाहेर टाकले जातात. शरीर हे नैसर्गिक रित्या साफ करून देण्याचे काम हे मनुके करतात. या सोबतच ज्यांना पचन क्रियेत अडचणी येतात व रोज पोट साफ होण्यासाठी गोळ्या व औषधे घ्यावी लागतात अश्या लोकांनी पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी मनुके नक्की खावेत.

याने तुमचे पचन तंत्र योग्य आकारात कार्यरत होईल व पोट साफ होण्यास कोणता ही विलंब अथवा कष्टाचा सामना अजिबात करावा लागणार नाही. या सोबतच ज्या लोकांना हृदय संबंधित काही समस्या असतील अश्या लोकांना देखील डॉक्टर स्वतः मनुके खाण्याचा सल्ला देतात. आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्या करता मनुका हा एक उत्तम घटक आहे असे आता अभ्यासातून समोर आले आहे. म्हणूनच ज्यांना हृदय संबंधित कोणत्या ही तक्रारी आहेत त्यांनी याचे सेवन आवर्जून करावे.

हे वाचा:   चिकन, मटण आणि मासे कशाने येत असते जास्त ताकद...! काय असते जास्त फायदेशीर...!

मित्रांनो या सोबतच रात्री पाण्यात भिजवून सकाळी मनुके खाल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ब व मिनरल्स मिळतात. शरीराला अति आवश्यक फॉलीक ॲसीड तसेच लोह, मॅग्नेशियम व फॉस्फेट मिळते. शरीराच्या रोजच्या दिनचर्ये साठी हे घटक खूपच आवश्यक असतात आणि हे आपल्याला या भिजत ठेवलेल्या मनुक्यातून मिळतात. आता अनेक ठिकाणी फ्लेवर म्हणून देखील मनुका वापरला जातो. याच्या गोड चवीमुळे विविध पेय तसेच आइस क्रीम मध्ये देखील याचा वापर आपल्याला आता पाहायला मिळतो.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मनुके असेच सुके खावेत मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे अश्या लोकांनी पाण्यात भिजवून मनुके खावेत असे केल्याने अगदी काहीच दिवसात वजन प्रचंड वाढू लागेल. ज्या लोकांना भूक लागत नाही व सारखे उलटी सारखे वाटत राहते त्यांनी देखील दुपारच्या वेळी मनुके खावेत याने तुम्हाला भूक लागेलच सोबतच शरीर संतुलित राहील. एवढे सगळे फायदे आपल्याला एकाच घटकापासून मिळत आहेत म्हणूनच डॉक्टरांना दूर ठेवायचे असेल तर मनुक्याच्या सेवन तुम्ही देखील नक्कीच करा.