तुमचे डोळे आले असेल तर, डोळ्याला पाणी येते का.? डोळे लाल होते का.? या तीन घरगुती उपायाने डोळे पूर्णपणे बरे होतील.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला डोळ्यांच्या आजाराबाबत आम्ही काही उपाय सांगणार आहोत. मित्रांनो जर बघायला गेलं तर पावसाळ्यात इतर पावसाळी आजार तर असतात पण त्यात डोळ्यांच्याआजारांच्या साथींची चिंता पण वाढली आहे . म्हणजे मित्रांनो डोळे येणे हे सुध्दा झपाट्याने वाढत आहे. देशभरातील सर्वच राज्यात आय फ्लू चे रुग्ण आढळून येत आहे त्यामुळे अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहे, तर चला मग सुरवात करूया.

आय फ्लू म्हणजे काय.?

आय फ्लू (Eye Flu) हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis), पिंक आय (Pink Eye), डोळे लाल होणे असेही म्हणतात. सामान्य भाषेत याला डोळे येणे असंही म्हणतात.संसर्ग एलर्जी वायर्स आणि बॅक्टरीया च्या संसर्गाने डोळे येण्याचा त्रास होत आहे आणि यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यात सतत पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांना सारखी चुरचुर होणे, डोळ्यांवरती चिकट थर साठणे ,डोळे लाल होऊन दुखणे व डोळ्यांतून वारंवार पाणी जाणे हे त्रास बऱ्याच जणांना होत आहेत आणि ह्यांच्या संपर्कात लहान मुले जास्त येत आहे.

हे वाचा:   आंघोळ करण्यापूर्वी फक्त एकदा लावा.! डोक्यावरचे सफेद केस काळे कुळकुळीत बनतील.! केसांना काळे करण्याचा घरगुती जुगाड.!

याचे कारण म्हणजे किटाणूंचे संसर्ग ज्या व्यक्तींना डोळ्यांचा त्रास होत असेल डोळे आलेले असतील अश्या व्यक्तीनीं पाणी कोमट करून एका वाटीत घ्यायचे आहे आणि त्याच प्रमाणे Cotton boll घेऊन ह्यात Deep करून ह्या कोमट पाण्याने डोळे छान स्वच्छ करायचे आहे आणि त्याच प्रमाणे Ice cubes असतील तर ह्या Ice cubes ने डोळ्यांना शेक द्यावा आणि जर ह्या प्रमाणे जर नसतील तर बर्फ घेऊन एका कॉटन च्या रुमालात घेऊन त्या रुमालाने डोळे शेकावे

आणि तिसरे म्हणजे गुलाब जल, गुलाब पाण्याचं देखील दिवस भरातून दोन ते तीन वेळेस ज्या प्रमाणे आपण Ice Droop टाकतो त्याच प्रमाणे थेंब दोन्ही डोळ्यात टाकायचे आहेत आणि आपल्याला संसर्ग होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर वारंवार हात धुवून सॅनिटायझर चा वापर केला तरी चालेल व continue गॉगल चा वापर केला तरी चालेल आणि आपला रुमाल असो किंवा टॉवेल असो हे देखील वेगळे ठेवावे .

त्याच बरोबर कोळसा छान लालबुंद करून एका पात्रात ठेवावा आणि देशी कपूर घेऊन म्हणजेच आपण ह्या कापूरला देशी / भिमसेन कपूर म्हणून देखील ओळखतो हे कापूर घ्यायचे आहे आणि ह्याची पावडर करून या लालबुंद कोळश्यावर टाका आणि याचाच धूर करून ह्याच धुरी ने शेक द्यावा असे दिवस भरातून ३ वेळेस करायचे आहेत आणि या बरोबरच डोळ्यांवर पाणी मारून दिवस भरातून ३ वेळेस डोळे देखील स्वच्छ करायचे आहेत. हे घरगुती उपाय करून सहजतेणे जर डोळे आले असतील तर सुटका नक्कीच होऊ शकते.

हे वाचा:   घरी बनवा ही अशी क्रीम, चार चौघात उठून दिसायचे असेल तर आतापासूनच करा तयारी.! या फुलापासून फक्त पंधरा मिनिटात तयार होईल घरगुती क्रीम.!

आणि या बरोबरच कुठल्याही कंपनीचे चांगले eye drop घेऊन ते eye drop देखील डोळ्यांत टाकायचे आहेत. यापैकी जे तुम्हाला आवडले असेल ते घरगुती उपाय तुम्ही करू शकता या कुठल्याही उपायाने तुम्हाला कोणताही side effect न होता फायदाच होणार आहे आणि लहानांपासून पासून मोठ्यानंपर्येंत तुम्ही हे उपाय करू शकता, तर आहे कि नाही साधे सोप्पे घरगुती उपाय.?

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.