मानवी केस हे केराटीन नामक प्रथिनांपासून तयार होतात. आपले केस जर काळे भोर व चमकदार तसेच लांबसडक असतील तर आपण चार चौघात उठून दिसू लागतो. नीटनेटके केस हे आपल्या सौंदर्याला जणू चार चांद लागतात. जरी केसांचे असणे एवढे गरजेचे नसले तरी ही एक उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणजेच गुड पर्सनॅलिटी साठी सुडौल केस हे हवेच.
आता लोक आपल्या जीवनशैलीच्या अनुसार केसांच्या स्टाइल देखील करू लागले आहेत. आधीच्या दशकांमध्ये लोकांचे केस हे अगदी म्हातारपणात देखील काळेभोर व घट्ट असत. मात्र आता अवघ्या वीस ते बावीस अनुमान असलेल्या तरूण तरुणींना केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मागचे कारण म्हणजे आपल्या आस पास वाढत असणारे प्रदूषण. होय मित्रांनो प्रदूषणाचा आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या केसांवर देखील दुष्परिणाम दिसून येतो. केस वया आधी पांढरे होवू लागत व गळून टक्कल देखील पडते.
याच बरोबर अनेक वेळा ही समस्या आनुवंशिकतेमुळे देखील होवू शकते आणि बहुदा म्हटल्यास तर अचूक आहार ग्रहण नमस्कार केल्याने. आज काल फास्ट जमाना आहे आपण देखील घरच्या संतुलित आहाराला नाकारून फास्ट फूड जंक फूड खातो आणि जे पोषण शरीराला हवे असते ते मिळू शकत नाही अश्या वेली देखील केसांची वाढ थांबते व केस गळायला सुरवात होते. आज काल केसांचे आरोग्य सुदृढ करू असे हमी देणारे अनेक घटक बाजारात उपलब्ध आहेत. मात्र यांचा काडीचा ही उपयोग आपल्याला होत नाही. होय मित्रांनो उलट याने आपले केस अजून कमजोर हो त्या वस्तूच्या आहारी जातात. मग महिन्याला व आठवड्याला ती वस्तू केसांना लावलीच लागते. आपल्या केसांना त्या घटकाची सवय लागून राहते.
• केसांच्या सर्व समस्यांचा एक रामबाण उपाय.
आता तुम्ही देखील अश्या समस्यांना तोंड देत असाल अथवा तुमच्या आजु बाजूला अश्या प्रकारच्या उपायाची कोणाला गरजे असेल तर मित्रांनो हा लेख तुमच्यासाठीच आहे. आता निर्धास्त व्हा. आमचा हा रामबाण उपाय करताच तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच बळावेल. त्याच बरोबर हा एक आयुर्वेदिक उपाय आहे व याचा तुमच्या केसांवर कोणताच वाईट परिणाम झालेला दिसून येणार नाही. अगदी घरच्या घरी काही मिनिटांत हा उपाय बनवून तयार होईल अगदी कमी खर्चाचा व जास्त फायदा देणारा हा उपाय आहे. चला आता वेळ फुकट न दवडता पाहूया नक्की काय आहे हा उपाय. सर्व प्रथम हा उपाय तयार करण्यासाठी आपणास काही सामग्रीचा संग्रह करावा लागेल.
केस गळती होण्यास सुरवात होते ती म्हणजे कोंड्यामुळे. जर त्याला संपुष्टात आणण्यास जर आपण यशस्वी झालो तर केस गळती त्वरित थांबेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यकता आहे ती म्हणजे लसणीच्या चार ते पाच पाकळ्यांची. लसणीच्या पाकळ्यां मध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी ऑक्सिडेंट व ऊर्जा असते. आपल्या शरीरासाठी या फार उपयुक्त असतात आणि प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात या लसणीच्या पाकळ्या तुम्हाला हमखास सापडतील. या नंतर आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे लिंबाच्या रसाची.
लिंबाच्या रसात शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी लागणारे सर्व गुणधर्म असतात. सोबतच यात मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्व क देखील असते. अपचन व गॅस सारख्या समस्याना देखील लिंबाचा रस त्वरित कमी करतो. म्हणूनच या उपायासाठी एका लिंबाचा रस काढा. लिंबू हे पिवळे पिकलेले असले तर अति उत्तम. तिसरा व शेवटाचा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे 2 चमचे खोबरेल तेल. लहानपणा पासून आपण केसांना खोबऱ्याचे तेल लावत आलो आहोत. खोबऱ्याचे तेल केसांना चमक देते व काळेभोर आणि मजबूत बनवण्यासाठी मदत करते. या सोबतच केसांना मुळापासून मजबूत देते. म्हणूनच या उपाया करिता 2 मोठे चमचे खोबऱ्याचे तेल घ्या.
• उपाय तयार करण्याची कृती:-
मित्रांनो सर्वात आधी लसूण घ्या व मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. या लसणीच्या पाकळ्या बारीक झाल्या की यात आता पुढे एका लिंबाचा रस टाका. आता या दोन्ही घटकांना छान एकत्र होवू द्या. पुढे दहा ते पंधरा मिनिटे थांबा नंतर यात खोबऱ्याचे दोन चमचे तेल टाका. चांगले मिश्रण झाल्याचे दिसून आल्यास रोज रात्री झोपताना कापसाच्या बोलण्याच्या मदतीने हा रस केसांच्या मुळापर्यंत लावा. सकाळी उठून थंड पाण्याने केस धुवून टाका. हा उपचार आठवड्यातून फक्त तीन वेळा वापरावे. या उपायाच्या प्रभावाने तुम्हाला असणार्या केसांच्या सर्व समस्या अगदी मुळापासून समाप्त होतील.