तुमची बदनामी करणाऱ्याचे तोंड असे बंद करा.. पुन्हा कधी तुमच्या वाट्याला जाणारच नाहीत.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आज आपण शत्रूच तोंड बंद करणार एक यंत्र पाहणार आहोत. या यंत्राला मुख स्तंभन यंत्र अस म्हणतात. मुख स्तंभन याचा अर्थ मुख म्हणजेच तोंड बंद करणार यंत्र. जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल घरात किंवा शेजारी पाजारी, गावात, परिसरात, पै पाहुण्यांमध्ये तुमच्याबद्दल नको त्या गोष्टी सांगत असेल, तुमची बदनामी करत असेल, गरळ ओकत असेल आणि यामुळे तुमची प्रतिमा खराब होत चाललेली आहे. लोक तुमच्याविषयी वाईट विचार करू लागलेले आहेत, लोकांना, लोकांच्या मनात तुमची प्रतिमा अगदी निगेटिव्ह बनलेली आहे.

तर अशावेळी या शत्रूच तोंड बंद करणार हे यंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की काढा. अर्थात हे यंत्र काढल्यानंतर ते लगोलक पुसून सुद्धा टाकायचे आहे त्यामुळे काळजी करू नका कुणालाही याबाबत काहीही कळणार नाही. हे यंत्र आपल्या शत्रूच तोंड बंद करवत. जी व्यक्ती तुमच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलते, तुमची समाजात बदनामी करते, तुम्हाला नीच दाखवण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्तीच तोंड याने बंद होतं.

जेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट साईट बोलू लागेल तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला त्रास होईल आणि ती तुमच्याबद्दल वाईट बोलणं बंद करेल. मित्रहो, हे यंत्र मच्छिंद्र‌नाथांनी मानव जातीच्या कल्याणासाठी तयार केलेल आहे. तेव्हा याचा गैरवापर करण्याचा चुकूनही मनात विचार आणू नका.

हे यंत्र बनवण्यासाठी, या ठिकाणी आपण चार रेषा काढलेल्या आहेत, एक उभी रेषा आहे, आडवी रेषा आणि दोन तिरक्या रेषा. आणि अगदी व्यवस्थित पहा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मी तुम्हाला सांगतो, सर्वात वरती ओम, त्यानंतर शेजारी ओम हीम ओम ह्रीम ओम ह्रीम परत ओम तर अशा प्रकारे आपण हे यंत्र अगदी जस आहे तसं काढायच आहे. मध्ये देवदत्त हे नाव लिहायचे. हे सगळं आपण कशाने करणार तर आपल्या घरामध्ये जी भिंत आहे कोणतीही भिंत तर आपल्या घराच्या भिंतीवरती पांढऱ्या खडून आपण हे यंत्र काढायचे. हे यंत्र काढण्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्यानंतर आपण ही क्रिया करायची.

हे वाचा:   या खताच्या वापराने ब्रम्हकमल फुलांनी भरून जाईल.. फक्त २ थेंब १० दिवसांत ब्रम्हकमळ कळ्या, फुलांनी बहरेल.!

गुरुवारी सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर हे यंत्र आपल्या घराच्या भिंतीवर पांढऱ्या खडूने आपण काढायचे आहे आणि ते काढल्यानंतर बरोबर सेंटरला म्हणजे बरोबर मध्यभागी ज्या ठिकाणी सर्व रेषा एकत्र आलेल्या आहेत म्हणजेच देवदत्त या नावाच्या सेंटरला मध्ये आपण आपल्या शत्रूच नाव लिहायचे. एकाच शत्रूच, एकापेक्षा जास्त लोक असतील तर ह्या गुरुवारी एकासाठी करा, पुढच्या गुरुवारी दुसऱ्यासाठी करा.

एकावेळी एकाच आपण नाव लिहायच आहे आणि हे नाव लिहिल्यानंतर या यंत्राची आपण सफेद पुष्प म्हणजे पांढऱ्या फुलांनी पूजा करायची तीन चार पांढरी फुल आणा कोणतीही चालतात. ही फुलं या यंत्राला आपण वाहायची आहेत आणि बस या ठिकाणी कोणताही मंत्र दिलेला नाही हे यंत्र तुम्ही काढलेल आहे.

आता एक पांढरा कपडा आपण घ्यायचा आहे, सफेद कपडा आणि या कपड्याने या यंत्राला झाडायच आहे. हे यंत्र झाडून टाकायचय म्हणजे काय तर त्याच्यावरती आपण मारा, त्या यंत्रावरती मारा आणि नंतर त्याच कपड्याने हे यंत्र पुसून टाका. आता महत्त्वाची गोष्ट आहे दोन ब्राह्मणांना आपल्याला जेवू घालायचं आहे. अर्थात जर ब्राह्मण मिळत नसतील तर कोणत्याही दोन विद्वान किंवा पुण्यवान जी लोक असतात किंवा कोणत्याही गोरगरिबाला आपण दान करा किंवा त्यांना जेवू खाला.

हे वाचा:   या पद्धतीने चटणी बनवाल तर इडली डोसा पेक्षा जास्त चटणी खाल; पहा बनवण्याची पद्धत..

शक्यतो जे गरीब लोक झोपडपट्टीत वगैरे राहतात तर त्यांना आपण थोडफार जे जेवणाच साहित्य असत ते देऊन आलात तरी चालेल. घरात बनवलेला स्वयंपाक हा त्यांना तुम्ही देऊन या. मित्रहो, हा उपाय केल्यानंतर शत्रूचं तोंड बंद होतं. शत्रूची वाचा, तुमच्याबद्दल अनाप शणाप काही आता बोलणार नाही.

अर्थात हे सगळं करत असताना आपल्या कुलदेवतेच आपण स्मरण करावं. भगवान मछिंद्रनाथ, मछिंद्रनाथ यांचं आपण स्मरण करावं आणि त्यानंतर आपण हा उपाय केला तर तो चांगला ठरेल. तुमच्या गुरूंच तुम्ही स्मरण नक्की करा. तुम्ही ज्यांना तुमचे गुरु मानता जस की बाळू मामा असतील किंवा स्वामी समर्थ असतील जे कोणी ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांच स्मरण नक्की करा आणि त्यानंतरच आपण हा उपाय करा.

आपल्या जीवनात सुख समृद्धी संपन्नता लाभो आणि अशा कोणत्याही शत्रूपासून आपल आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण होवो हीच बाळू मामांच्या चरणी प्रार्थना करून आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा लेख आपल्या मित्रांना कुटुंबीयांना अवश्य शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांची त्यांच्या शत्रूपासून सुटका नक्की होईल आणि त्याच पुण्यफळ हे तुम्हाला लाभेल.