पावसाळ्यात कांदे लवकर खराब होऊ नये म्हणुन ५ टिप्स, घरातील कांदा अजिबात सडणार नाही, फक्त करा हे काम.!

ट्रेंडिंग

हॅलो, नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे. पावसाळ्याच्या सीजन मध्ये बाहेर आद्रता तयार होते, ओलाव्यामुळे घरामध्ये जे आपण कांदे साठवतो किंवा नवीन कांदे आणतो ते खराब व्हायला लागतात किंवा त्यांना कोंब फुटायला लागतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कांदे खराब होऊ नये यासाठी आम्ही आज तुम्हाला पाच टिप्स देणार आहे. ज्यामुळे पावसाळ्यात कांदे जे आहेत ते खराब होणार नाहीत. तर पावसाळ्यामध्ये कांदे जे आहेत ते खराब होऊ नये यासाठी आपण टिप्स बघत आहोत.

तर पहिल्या टिप मध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहे की जे कांदे आपण भरपूर प्रमाणात घरात आणतो ते कांदे कशाप्रकारे साठवायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं की आपण आणलेले के कांदे आहे ते फ्रिज मध्ये स्टोअर केले जातात. शक्यतो बरेच जण कांदे बटाटे फ्रिजमध्ये स्टोअर करत नाही परंतु जे कोणी फ्रिजमध्ये कांदे आणि बटाते अशा प्रकारे स्टोर करून ठेवत असतील तर इथे आपल्याला ते थांबवायच आहे.

हे वाचा:   उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहे का? म्हणून काही लोक उशिराच लग्न करत असतात.!

शिवाय जे कांदे आपण ठेवणार आहोत त्या दोन तीन कांद्यामध्ये चांगल्यापैकी डिस्टन्स हवा. एकमेकांना चिटकून कांदे ठेवायचे नाहीये. त्यामुळे एखादा कांदा खराब झाला तर दुसरा कांदा खराब होणार नाही या कारणास्तव आपल्याला जे कांदे आहेत ते थोड्या डिस्टन्सवर ठेवायचे आहे. नाहीतर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला बास्केट बाजारात मिळतात यांचा वापर करायचा आहे.

या बास्केट मधे हवा जायला मोकळी जागा असते. बास्केट मध्ये पण कांदे स्टोर करताना आपल्याला खूप असे कांदे एकावर एक रचून ठेवायचे नाही. थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला बास्केट मध्ये हे कांदे अशा पद्धतीने ठेवायचे आहे जेणेकरून कांदे खराब होत नाहीत.

बघूया आता पुढची ट्रिक. आता या ट्रिक मध्ये तुम्हाला दिसत आहे की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कांदे आपण विकत घेऊन येतो आणि असेच्या असे प्लास्टिकच्या पिशवीतच हे कांदी कितेक दिवस तरी अशा पद्धतीने ठेवून देत असतो. पावसाळ्याचा सीजन सुरू झालेला आहे त्यामुळे सगळ्यात आधी कांद्यांच्या खाली आपल्याला डबल पेपर अंथरायचा आहे आणि त्यावरच कांदे स्टोअर करून ठेवायचे आहेत.

हे वाचा:   फक्त 5 मिनिटांत करा टाकी साफ.. ना टाकीतल पाणी काढायची गरज ना आतमध्ये उतरण्याची.! 

आता आपण इथे शेवटची टीप बघत आहोत. जे काही कांदे आपण विकत आणणार आहोत तर ते कांदे पूर्णपणे कोरडे असले पाहिजे. जर आपण ओला कांदा विकत आणला तर हमखास पावसाळ्याच्या काळामध्ये तो लवकर खराब होणार आहे. सुकलेला कांदाच आपण पावसाळ्याच्या सीजन मध्ये विकत आणला पाहिजे.

ही काळजी आपण घेतली पाहिजे. कांदे स्टोअर करताना सगळे कांदे पसरवून ठेवायचे आहे आणि शक्यतो एकमेकांना चिटकून ठेवायचे नाहीयेत. तर पावसाळ्याच्या सीजन मध्ये कांदे खराब होऊ नये यासाठी आपण काही टिप्स बघितल्या. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. जर लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट मधे नक्की कळवा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत सुद्धा नक्की शेअर करा.