फक्त 5 मिनिटांत करा टाकी साफ.. ना टाकीतल पाणी काढायची गरज ना आतमध्ये उतरण्याची.! 

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत आहे, आणखी एका नवीन लेखामध्ये. मंडळी 1000 लिटर ची टाकी असो, 700 लिटर ची टाकी असो किंवा 500 लिटर ची टाकी असो, ना कोणाची हेल्प घेता, न कोणाला टाकीत उतरवता आणि सगळ्यात महत्त्वाचं 10 मिनिटात तुमच्या टाकीतला गाळ साफ करण्याची अगदी सोपी ट्रिक आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहे.

आज आम्ही तुम्हाला ह्या टाक्या विदाऊट त्यामध्ये उतरवता आणि जुन्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून ह्या कश्या साफ करायच्या, यामधला जो काही मातीचा किंवा आपण त्याला गाळचा थर म्हणतो तो कसा काढायचा तेही फक्त 10 मिनिटामध्ये आणि कोणाचीही हेल्प न घेता हे कसं करायचं ते सांगणार आहे.

अगदी टाकी फुल भरलेली असेल तरीही तुम्ही ती साफ करू शकता. ह्या टाकीमध्ये जास्त पाणी आहे त्यामुळे आपण ही टाकी साफ करणार आहोत. सगळ्यात प्रथम खाली जंतू सुद्धा झालेले असतात टाकीमध्ये, भरपूर दिवस झाले टाकी स्वच्छ केलेली नाहीये आणि यामुळे भरपूर असं गढूळ पाणी यामधे साठत आणि त्यामुळे त्यामध्ये भरपूर अशी माती राहते आणि त्या मातीचा थर जर नेहमी साफ नाही केला तर तो थर तसाच जो आहे पूर्ण टाकीमध्ये साचत असतो.

मग अशा वेळेस काय करायचं तर आपल्या घरी बघा अशा पद्धतीची प्लास्टिकची बॉटल असतेच असते. एकदा वापरली की आपण फेकूनच देतो, मग बस तीच आपल्याला बॉटल् घ्यायची आहे आणि आपल्याला तिचा जो काही वरचा भाग आहे म्हणजेच तोंडाकडचा भाग आहे आपल्याला फक्त आणि फक्त त्याचच काम असणार आहे. तर चला आपण आता हे टूल कसं बनवायचं ते बघून घेऊयात.

तर आता आपण बाटलीचा तोंडाकडचा भाग कापून घेतलाय आणि आता त्याला तुम्हाला चिरा पाडून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला एक प्लास्टिकचा पाईप हवा आहे आणि त्यासोबत एक पीव्हीसी पाईप सुद्धा हवा आहे, जो मी प्लास्टिकच्या पाईपच्या एका तोंडाला जे आहे जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला याच जे काही झाकण आहे काढून घ्यायच आहे आणि जो पीव्हीसी पाईप घेतला आहे आपण, तुम्ही एकतर त्याची लेंथ थोडीशी मोठी सुद्धा घेऊ शकता.

हे वाचा:   एका रात्रीत मटकीला मोड आणण्याची एकदम सोप्पी पद्धत नक्की बघा; वेळ वाचणारी गावरान ट्रिक.!

बऱ्याचदा 1000 लिटर ची जी काही टाकी आहे तिथे आपली जी हाईट आहे ती पोहोचत नाही मग अशा वेळेस ती टाकी साफ करतानी स्टूल किंवा खुरचीचा वापर करायचा, त्याच्यावर उभ राहून तुम्हाला हे जे टूल आहे हे आपल्याला आत टाकाव लागणार आहे.

आता बघा मी इकडे चिकट टेपने व्यवस्थित हे सील करून घेतले आहे आणि चिकट टेपने व्यवस्थित सील यासाठी कारण हे बिलकुल एका जागेवरून हलता कामा नये आणि सगळ्यात महत्त्वाच आपण जेव्हा हे टाकी मधे सोडणार आहोत तर टाकीमध्ये हे पडता कामा नये म्हणून आपल्याला हे इथे व्यवस्थित रित्या पाईप आणि बॉटल अटॅच करून घ्यायची आहे. आता बघा आपलं टूल तयार झालय, काहीसं अशा पद्धतीच टूल आपलं तयार झालय.

आता काही लोक काय करतात तर हे टाकतात आणि मग एका बाजूने तोंडाने ओढतात. तर आपल्याला तसं काहीच करायचं नाही. एका बाजूने यामध्ये पाणी टाकायचंय, इथपर्यंत पाणी टाकायचंय की दुसऱ्या बाजूने ते पाणी बाहेर जोपर्यंत येत नाही. आता पाईप आपला फूल भरलेला आहे. आता ह्या पाईपामध्ये आपल्याला अस बोट घालायच आहे म्हणजे पाणी बाहेर येता कामा नये.

आता लगेच हा जो दुसरा पाईप् तुम्ही ज्यामधे बोट घातला होत तो पटकन खाली टाकायचा आणि हे जे काही टूल आहे ते व्यवस्थितरित्या हलवायचं, आपल्याला इथे पाणी तोंडाने ओढायच सुद्धा काम पडलं नाहीये आणि व्यस्थितरित्या पाणी सुद्धा बाहेर आलं. आता बघा हे एकदम क्लिअर वॉटर येतय. आता गाळाच पाणी कस येईल ते दाखवते. तर बघा एका हाताने हे टूल धरायचे आणि तुम्हाला पूर्ण टाकीमध्ये हे फिरवायच आहे तुम्ही जस जस फिरवणार आहात तसं तिथला गाळ निघून जात आहे आणि तुमची टाकी अगदी स्वच्छ होणार आहे.

हे वाचा:   लोक अपमान करतात आणि तुम्हाला काहीच बोलता येत नाही? या 3 गोष्टी लक्षात ठेवा...

आता यासोबत गाळच नाही तर यामध्ये जंतू सुद्धा झालेले आहेत मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पण एक गोष्ट आहे याचा तोटा असा आहे की थोडसं पाणी मात्र यामधे वाया जातं मग अशा वेळेस तुम्ही हे पाणी एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये ठेवून झाडांना सुद्धा टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता अगदी जंतू वगैरे सुद्धा यामध्ये होते तर ते सगळं काही निघालं आहे. ना आपल्याला कोणाची हेल्प लागली ना आपल्याला त्यामध्ये उतरायची गरज पडली, ना आपल्याला हे साफ करायला एक तास लागला. अगदी मिनिटामध्ये हे साफ होत, अगदी पाच मिनिट सुद्धा पुरेसे आहेत.

एनर्जी इकडे बिलकुल वेस्ट होत नाही. 5 मिनिटात पूर्ण साफ होऊन जातं आणि तुम्ही बघू शक्ता जिकडे तिकडे गाळच गाळ आहे आणि जंतू सुद्धा झाले होते पाण्यामध्ये त्यामुळे जंतू सुद्धा बाहेर निघालेले आहेत. ही टाकी सुद्धा आपली साफ झाली आहे. तुम्ही सुद्धा तुमची टाकी अशा पद्धतीने साफ करा आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा लेख कसा वाटला. जर हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.