आपल्या मनात नेगेटिव्ह आणि वाईट विचार आल्यावर काय करायचे? फक्त करा या 3 गोष्टी.!

ट्रेंडिंग

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण असे असतात ज्यांच्या मनामध्ये खूप नेगेटिव्ह विचार येतात. कितीही प्रयत्न केला तरी ते थांबतच नाही. हे मनातले वाईट विचार थांबवायचे कसे? याबद्दलच आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे. आजच्या लेखात आपण या नकारात्मक विचारांबद्दल एका वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिले इथे आपल्याला हे बघाव लागेल की मनात वाईट विचार येतातच का? याच्या मुळावर आपल्याला घाव घालावा लागेल. इंग्लिश मध्ये एक शब्द आहे गिगो म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट, म्हणजे कचरा आतमध्ये टाकला तर कचराच बाहेर पडेल आणि आपले आयुष्य हे गिगो वरच चालते.

जर तुमच्या मनाच्या हार्डडिस्क मध्ये कचरा असेल तर तुम्ही तसच विचार कराल. कैकयी ला वाईट संगत लाभली तेव्हा तिचे मन खराब झाले आणि मनात वाईट विचार यायला सुरुवात झाली आणि मग तिने दशरथाला सांगून भगवान श्रीरामांना वनवासात पाठवले आणि आपला मुलगा भरत याला सिंहासनावर बसवले. तेव्हा हा वाईट विचार आला कुठून? हा वाईट विचार आला मंथराच्या संगतीतून.

हे वाचा:   अरे बापरे...! हा मुलगा देत आहे दोन वर्षापासून अंडे.! पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

तसेच आपण सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये मंथरा कुठून कुठून प्रवेश करते? कुठून ही मंथरा येऊ शकते? वर्तमान पत्रातून ही मंथरा येऊ शकते, टीव्ही पाहण्यातून, चित्रपट पाहण्यातून ही येऊ शकते, तुमच्या संगतीतून, तुमच्या नातेवाईकांकडून किंवा इंटरनेट मधून. ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मंथराचेच काम करतात आणि आपल्या मनामध्ये कचरा टाकतात.

हा कचरा जेव्हा आपल्या खोल अंतरमनामध्ये जातो तेव्हा आपल्या चित्तामध्ये असे वाईट विचार यायला सुरुवात होते. त्यामुळे मुळावर आक्रमण करणे खूप गरजेचे आहे, नाहीतर या नेगेटिव विचारांमधून बाहेर पडणे खूप अवघड जाईल त्यामुळे आपल्या मनाची हार्डडिस्क ज्याला आपण अंतर्मन म्हणतो तिचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे.

पण एखाद्याचे मन निगेटिव विचारांनी भरलेले आहे, सारखे मनात वाईट विचार येत असतील मग अशा स्थितीमध्ये काय केले पाहिजे? मित्रांनो एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही या वाईट विचारांबद्दल सतत विचार करत असता त्यांना खत पाणी घालता तेव्हा हे विचार खोल तुमच्या अंतरमनामध्ये घर करून राहतात आणि मग त्यांना शुद्ध करायचे असेल तर त्याच्यावर जो विचारांचा आपण साठा साठवतो तो चांगल्या कॉलिटीचा असला पाहिजे.

हे वाचा:   घराच्या चारी कोपऱ्यात ही एक गोष्ट ठेवा एकही उंदीर घरात पाय सुद्धा ठेवणार नाही.! उंदरांना पळवण्याची सगळ्यात सोपी पद्धत.!

ते कसे करायचे? आपण सातत्याने चांगली पुस्तके वाचली पाहिजे, सतत चांगले ऐकले पाहिजे, चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे. याने काय होईल? सतत तुमच्या मनामध्ये चांगले विचार घोळत राहतील आणि नियम हा आहे की जे विचार तुम्ही सतत बहिर मनामध्ये घोळवता ते अंतर्मनामध्ये मूळ धरतात आणि कालांतराने त्याच प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ लागतात, त्यामुळे जास्तीत जास्त चांगले वाचन करा, चांगले ऐका, चांगल्या लोकांच्या संगतीत रहा आणि लोकांबद्दल चांगले बोला आणि एकदा का तुमचे अंतर्मन शुद्ध झाले की नंतर वाईट विचार आले तरी ते जास्त वेळ टिकणार नाही. कारण तुमच्या मनामध्ये चांगल्या विचारांचे प्रमाण जास्त असेल.

तर मित्रांनो आजचा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर हा लेख आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. धन्यवाद.