मित्रांनो आजच्या या लेखात आपण सोनचाफ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. आज आपण घरी तयार केलेल्या खताचा वापर जर सोनचाफ्याच्या झाडासाठी महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल. सोन चाफ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी आपल्याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते.
कारण खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वे ही मिळत असतात पण त्याचबरोबर झाडावरती कीड लागू नये म्हणून हे किटकनाशकाचा फवारा करणे देखील आवश्यक असते. कारण झाडाला कीड लागली तर झाडाची वाढही होत नाही आणि झाडाला फुले देखील जास्ती लागणार नाही.
तर त्यासाठी आपल्या घरामध्येच ज्या लसूण आणि कांद्याच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील खूप चांगला फायदा होतो किंवा महिन्यातून एकदा तुम्ही निमतेलचा देखील स्प्रे करू शकता. सोन चाफ्याच्या झाडावरती कीड लागू नये म्हणून, कुंडीतील मातीमध्ये मुंग्या शंख तयार होऊ नये म्हणून आज आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या एका वस्तूचा वापर करणार आहोत. ती वस्तू म्हणजे हळद आहे.
हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे. हळदीचा खत म्हणून तसेच बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो. आता पावसाळ्यामध्ये कुंडीतील माती मध्ये ही कीड ही जास्ती लागत असते, त्याचबरोबर बुरशी देखील लागण्याचे प्रमाण हे जास्ती असते, तर त्यासाठी तुम्ही हळदीचा वापर केला तर या सर्व समस्या या दूर होण्यासाठी ही मदत होते.
सोन चाफ्याच्या झाडाच्या कुंडीतील ही जी माती आहे ती देखील अधून मधून हलवून मोकळी करणे आवश्यक असते. त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण त्याचबरोबर आपण जी खते पाणी देत असतो ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात. साहजिकच आपले झाड हे चांगले वाढते आणि झाडाला फुले देखील भरपूर लागत असतात.
सोन चाफ्याच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्ती न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपतच या झाडाला हे पाणी द्यावे. आता आपण ज्या हळदीचा वापर करणार आहोत, ती एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाची जर कुंडी असेल तर त्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच या हळदीचा वापर हा करायचा आहे.
कुंडीमध्ये लावलेल्या या झाडावरती भरपूर अशा कळ्या, फुले येण्यासाठी झाडाची वाढ चांगली होणे हे आवश्यक असते, आणि तरच झाड हे भरपूर फुले देत राहते. तर त्यासाठी महिन्यातून एकदा आपल्याला कोणत्याही एखाद्या नायट्रोजन युक्त खताचा वापर करणे हे आवश्यक असते. तर आज मी शेणखतापासून तयार केलेल्या लिक्विड खताचा हा वापर करणार आहे. शेणखतापासून हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते आपल्याला एक दिवस हे पाण्यात भिजत ठेवायचे आहे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहे ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते.
जेव्हा आपण या लिक्विड खताचा वापर करतो तेव्हा कुंडीतील माती ही थोडी कोरडी असणे हे आवश्यक असते. शेणखतामध्ये नायट्रोजन चे प्रमाण जास्ती असल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण त्याचबरोबर झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो.
झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या व फुले देखील जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात. आता हे जे आपण लिक्विड खत तयार केलेले आहेत त्याचा वापर हा डायरेक्ट झाडांना तसाच न करता ते पाण्यामध्ये डायलुट करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे. कारण हे खत थोडे स्ट्रोंग असते. म्हणजे जर एक मग हे खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण खत म्हणून करणार आहोत. आता या तयार केलेल्या लिक्विड खतामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच.
सोन चाफ्याच्या या झाडावरती भरपूर कळ्याफुल येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील आवश्यक असते. त्यामुळे या कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला दिवसभरामध्ये एक चार ते पाच तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवावी. आता आपण फुले येण्यासाठी राखेचा देखील हा वापर करणार आहोत.
कारण फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक, पोषक तत्वे आहेत ते राखेत जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशी फुले लागतात. मात्र या राखेचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे. म्हणजे आपण हे जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते दोन लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक चमचा एवढाच या राखेचा वापर हा करायचा आहे.
तर अशाप्रकारे हे लिक्विड खत आणि राख हे व्यवस्थित मिक्स करून हे तयार झालेले जे खत आहे ते तुम्ही सोन चाफ्याच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी दिले तरी झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड अगदी कळ्या व फुलांनी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला आजचा हा लेख ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.