उन्हाळा सुरू झाल्यानंतर चेहऱ्यावरती शरीरावरती येणारा घाम हा आपल्या त्वचेसाठी दुश्मन बनत असतो. खरंतर आपण जे पाणी पितो त्याचे बाहेर येण्यासाठी घाम हा नैसर्गिक रित्या असतो. परंतु हा घाम जर पुन्हा शरीरात जिल्हा तर यामुळे काही त्वचा विकार देखील होऊ शकतात. त्वचा विकार जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे त्वचा तेलकट पडणे डाग येणे चेहऱ्यावरती जखमा होणे.
अशा प्रकारच्या अनेक लोकांना मुलींना महिलांना तसेच तरुण वयात येणाऱ्या मुला-मुलींना समस्या जाणवत असतात. यासाठी अनेक लोक मेडिकलमध्ये किंवा डॉक्टरांकडे जाऊन काही औषधे देखील घेत असतात यासाठी वेगवेगळ्या लोशनचा वापर केला जातो. परंतु एवढे सगळे करून देखील याचा काहीही फायदा होत नसतो. अशावेळी नेमके काय करायला हवे हे देखील सुचत नाही.
तर मित्रमंडळींनो तुमच्यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्या टिप्सचा तुम्ही वापर केला तर तुमचा चेहऱ्यावर असलेली डाग पिंपल्स सर्व काही नष्ट होतील तसेच तुमची त्वचा तेलकट असेल तर ती देखील जाईल म्हणजे चेहऱ्यावर जाईल कट करून पूर्णपणे जाईल. जर तुमचा चेहरा खूपच तेलकट झाला असेल तर यासाठी तुम्ही एक घरगुती उपाय करू शकता.
एका बाऊलमध्ये थोडेसे दही घ्यायचे आहे या दह्यामध्ये एक ते दोन चमचे मध टाकायचा आहे याला चांगल्या प्रकारे एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी याने तुमच्या चेहऱ्यावर असलेला तेलकटपणा पूर्णपणे जाईल. याचबरोबर तुम्ही काही बदाम भिजू घालून ते दुसऱ्या दिवशी बारीक करून ते चेहऱ्याला लावू शकता याने देखील चेहऱ्यावरील पूर्णपणे तेल शोषले जाते व चेहरा खूप तेजस्वी बनतो.
आता आपण पाहूया की चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर किंवा डाग आल्यानंतर काय उपाय करायचे आहे. जर कधी चेहऱ्यावर पिंपल्स आले तर त्यावर नारळाच्या तेलाचा हा उपाय तुम्ही नक्की करू शकता याद्वारे तुमचे पिंपल्स हे काही दिवसात नाहीसे होतील. सर्वप्रथम तुम्ही नारळाचे तेल हे तुमच्या तळहातावर घ्या त्याला चांगल्या प्रकारे चोळून घ्या. हे तेल आता चेहऱ्यावर पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा.
हा उपाय तुम्ही रात्री करू शकता जेणेकरून सकाळी तुमच्या चेहऱ्यावर असलेला पिंपल्स नष्ट होतील. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवा त्यानंतर कॉटनच्या कपड्याने किंवा कापसाच्या साह्याने चेहरा पूर्ण साफ करून त्यावर गुलाब जल लावा अशा प्रकारे जर तुम्ही काही दिवस सतत करत राहिला तर तुमच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचे तेज निर्माण होईल.
यासोबतच यामुळे तुमचा चेहऱ्यावर असलेली डाग सुद्धा जातील. जर तुमच्याकडे एखादे संत्री असेल तर त्याचा साल काढून ते देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता याने देखील चेहरा आणखी तेजस्वी बनतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.