आपल्यातील बरीच लोक आजकाल धार्मिक परंपरा व रीतिरिवाज मानत नाहीत आपल्या घरातील मोठी व जुनी मंडळी जसे आपले आजी- आजोबा, पणजी-पंजोबा आपल्याला अनेक रीतीभाती पाळण्यासाठी सांगत असतात. मात्र आपण आजकालच्या युगात आधुनिकीकरणामुळे या रीतीना पाळण्यास तयार नसतो.
आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे केसांसंबंधीच्या काही जुन्या रितिरिवाज व परंपरा बद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया काय आहे त्यामागचे खरे शास्त्र?
रात्रीच्या वेळी केस मोकळे सोडणे अशुभ का मानले जाते? शास्त्रानुसार मोकळे सोडलेले केस हे दु:खी व शोकाकुल असल्याचे प्रतीक मानले जाते. याकरता महिलांना केस बांधण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मंदिरामध्ये केस मोकळे सोडून जाणे देखील अशुभ मानले जाते.
संध्याकाळच्या वेळी केस का विंचरु नये ? शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी सूर्य बुडाल्यानंतर महिलांनी कधीही केस विंचरु नये. पुरातन शास्त्रानुसार व प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार संध्याकाळच्या वेळी केस मोकळे सोडून केस विंचरल्यामुळे ती व्यक्ती वाईट आत्म्यांच्या शिकार होण्याची जास्त शक्यता असते.
केस मोकळे सोडून झोपले देखील वर्ज्य आहे! पुराण शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केस मोकळे सोडून झोपल्याने देखील घरांमध्ये क्लेष निर्माण होतो व घरातील सुख: शांती नष्ट होऊन घरामध्ये कायम भांडणे सुरु होतात. याकरता कधीही रात्री झोपल्यावर महिलांनी केस मोकळे न सोडता वेणी घालावी.
केस विंचरताना निघालेले केस व गुंता कुठेही फेकु नये!केस विंचरताना तुटलेले केस किंवा निघालेले केस व गुंता हे इतरत्र फेकल्यामुळे बाहेरची बाधा करणारे व तंत्रविद्या करणारे लोक त्या केसांवर जादूटोणा करू शकतात. त्यामुळे अशा लोकांच्या हातात केस पडू नये याकरता आपले केस व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी जमा करून योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.
केस विंचरताना कंगवा खाली पडणे अशुभ मानले जाते! केस विचारताना आपल्या हातातून कंगवा खाली पडला तर ते अशुभ मानले जाते.असे म्हटले जाते की अशी घटना घडली तर त्या घरांमध्ये वाईट बातमी येऊ शकते.
पौर्णिमेला केस विंचरू नयेत:- असे म्हटले जाते की पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ज्या रात्रीस पुर्ण चंद्र असतो तेव्हा कधीही केस विंचरु नयेत. खिडकी किंवा दरवाजामध्ये उभे राहून केस विंचरल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी वाईट आत्मे आपल्याकडे आकर्षित होतात व त्याचा प्रभाव आपल्यावर सुरू होतो.
मा’सिक पा:ळीमध्ये केस धुऊ नयेत:- पुरातन शास्त्रानुसार मा’सिक पा’ळीमध्ये महिलांनी कधीही केस धुऊ नये. याचे शास्त्रीय कारण असेही मानले जाते की या काळामध्ये महिलांना रक्तस्राव होत असल्यामुळे महिलांच्या शरीराचे तापमान वाढलेले असते त्यामुळे केस धुतल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असतो. म्हणून या काळामध्ये आंघोळ करताना केसांवरुन आंघोळ करणे वर्ज्य आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.