गॅरंटी देतो हे करून बघा, आता तुमचं मन कोणीही दुःखवू शकणार नाही.!

ट्रेंडिंग

मित्रांनो कधी कधी आपल्याला लोक घालून पाडून बोलतात, आपण काही चुकी केली नसताना आपला अपमान करायचा प्रयत्न करतात. काही लोक तर निष्कारण आपल्यामध्ये दोष काढतात, मग अशावेळेस आपण निराश गोष्टी मनाला लावून घेतो. तुम्ही जर अशा लोकांपैकीच असाल की जे गोष्टी मनाला लावून घेतात तर मग आजचा हा लेख तुमच्यासाठी आहे. हे मर्म तुम्हाला कळले तर लोकांच्या गोष्टी मनाला लावून घ्यायचे तुमचे प्रमाण 100 टक्के कमी होईल आणि शेवटी आम्ही तुम्हाला टेक्निक सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीची गोष्ट मनाला लावून घेऊन दुखी होणार नाही.

मित्रांनो समजा एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही पांढरे बूट घातले आहे, तुम्ही मित्राला भेटायला जाता तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो काय रे एका पायात पांढरा आणि दुसरा पायात काळा बूट का घातला आहे? तेव्हा तुम्ही आश्चर्य व्यक्त करता आणि त्याला म्हणता नीट बघ मी दोन्ही पायात पांढरेच बूट घातले आहे. तरीसुद्धा तो तुम्हाला म्हणतो की नाही तू दोन्ही पायात वेगवेगळे बूट घातले आहे आणि तू खूपच विचित्र दिसत आहे.

आता तुम्ही थोड हैराण व्हाल पण तुम्ही तो म्हणाला ते मनाला लावून घेणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही बूट बरोबर घातले आहे. बाकी कोणाला नाही फक्त त्यालाच फरक जाणवत आहे म्हणजे प्रॉब्लेम त्या मित्राच्या त्याच्या नजरेत आहे, त्याच्या विचारात आहे. ह्या वरून आपल्याला शिकायला भेटते की ह्याने काही फरक पडत नाही ती लोक तुमच्याबद्दल काय बोलतात.

हे वाचा:   फक्त हा 1 पदार्थ वापरा, कपड्यांचा रंग कधीच जाणार नाही, कपडे कायम दिसतील नव्यासारखे.!

जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात तर मग लोक काहीही बोलू दे तुमच्या वर त्याचा काही परिणाम होणार नाही. लोकांमध्ये एवढा दम नाही की ते तुम्हाला त्रास, मनस्ताप देऊ शकतील. माझी स्वतःची खरी घडलेली गोष्ट सांगतो. लहानपणी मी शाळेत ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्यावर बरीच घरं होती, त्यापैकी एका घरामध्ये एक वेडी तरुणी होती.

ती काय करायची की खिडकी मध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना काही पण वाईट बोलायची, शिव्या द्यायची पण सगळ्यांना माहिती होते कि ती वेडी आहे त्यामुळे तिच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नव्हते. मित्रांनो यात आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. ती मुलगी सगळ्यांना शिव्या देऊन सुद्धा कोणी तिच्या गोष्टी मनाला लावून घेत नव्हते. इथे मला हे सांगायचे नाही की कोणी तुम्हाला शिव्या दिल्या तर गप्प बसा पण एखादा आपल्याला वाईट बोलला तर त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्यावर आहे.

ह्या जगात कोणाची ताकद नाही तुमचा मूड खराब करायची, तुम्हाला दुखवायची, जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतःला दुःखी करत नाही. मला खूप सारे स्त्रियांचे मेसेज येतात की सर आमचे साडू बरोबर वागत नाही, काही मेसेज असतात काही माणसे आम्हाला खूप त्रास देतात. मित्रांनो मला या लेखामधून हेच सांगायचे आहे की जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्हाला राग किंवा तुमचं मन कोणी दुखावणार नाही. बरोबर आधी सामंजस्याने घ्यायचा प्रयत्न करा पण ती समोरची व्यक्ती स्वभावतःच दुष्ट असेल न बदलणारी असेल तर मनामध्ये असा विचार करा की ती समोरची व्यक्ती वेडी आहे.

हे वाचा:   पेट्रोल महाग झाले म्हणून या पठ्ठ्याने बनवली चक्क खाऱ्या पाण्यावर चालणारी बाईक

आता आपण टेक्निक बघूया, जी व्यक्ती तुम्हाला सतत दुखावते तिच मनामध्ये चित्र निर्माण करा. ती व्यक्ती जोकर झाली आहे असा विचार करा. तिच्या नाकावर फोड आहे, डोक्यावर टोपी आहे, चेहऱ्यावर विचित्र मेकअप केला आहे, चित्रविचित्र लिपस्टिक लावली आहे असा विचार करा, आता तुम्हाला थोडा आराम वाटेल. आता तुम्हाला ती व्यक्ती ज्या शब्दाने दुखावत होती ती जोकर आहे असं समजा. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीच्या बोलण्याचे जाम हसू येईल आणि प्रचंड कॉमेडी वाटेल. हा प्रयोग तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती बरोबर नेहमी करू शकता.

या प्रयोगामुळे तुम्हाला जर कोणी काही बोलले तर तुम्ही ते मनाला लावून घेणार नाही. त्याचे दुःख वाटणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा या जगात तुम्ही प्रत्येकाला खुश ठेऊ शकत नाही कारण प्रत्येकाला खुश ठेवायला गेलो तर आपल्या आयुष्याची वाट लागेल आणि लोक कधी खुश होणार नाहीत. त्यापेक्षा जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढेल तुमच्याबद्दल कोण काय बोलतोय तुम्हाला त्याने काही फरक पडणार नाही. तर मित्रांनो हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि ज्याला या लेखाची खरंच गरज आहे अश्या तुमच्या मित्रांना हा लेख नक्की पाठवा.