घरासमोर असलेले तुळशीचे रोपटे कधी सुकले तर ही चूक कधीही करू नका, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

अध्यात्म

हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोपटे लावलेच असते. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपट्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक व्यक्ती ही तुळशीच्या रोपाची मनोभावाने पूजा करत असते. असे सांगितले जाते की तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचे रूप असते. तसेच भगवान विष्णूची जेव्हापण पूजा करायची असते तेव्हा तुळशीच्या पानाला विशेष महत्त्व दिले जाते. घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्य असेल तर तुळशीचे पाने लागतच असतात.

हजारो लाखो वर्षांपासून तुळशीचे झाड हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य मानले जाते. घराच्या अंगणामध्ये तुळशीचे झाड लावणे हि प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. तुळशीला देवीचे रूप मानले जाते. असेही म्हटले जाते की तुळशीचे रोपटे जर घरासमोर असेल तर आपल्या घरावर कुठल्याही वाईट प्रकारची नजर पडत नाही. तसेच कुठल्याही नकारात्मक शक्तिचा प्रभाव आपल्या घरावर होत नाही. या सर्वांपासून तुळशीमुळे आपल्या परिवाराचा बचाव होत असतो.

हे वाचा:   मेलेल्या लोकांच्या या तीन वस्तू चुकून पण घेऊ नये नाही तर येते खूप दारिद्र्य.! अनेक लोक या वस्तू खूप जपून ठेवताना दिसतात.!

तुळशीचे रोपटे जर घरासमोर असेल तर यामुळे संपूर्ण वातावरण पवित्र व प्रसन्न होत असते. परंतु तुळशीचे रोपटे हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सुकून जातच असते. अशावेळी या रोपट्या बाबत काय करायला हवे हे आपल्याला माहिती नसते. असे सुटलेले रोपटे घरांमध्ये कधीही ठेवू नये असे सांगितले जाते. सुकलेल्या तुळशीच्या रोपट्याचे काय करायला हवे असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहात असतो.

अशावेळी जर घरासमोर असलेले तुळशीचे रोपटे जर सुकत असेल तर अशा रोपट्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. तुळशी वृंदावन मध्ये एक नवीन रोपटे आणुन लावावे व या रोपट्याची मनोभावे पूजा करावी. कधीही तुळशीची पूजा करण्यात खंड पडू देऊ नये. दररोज संध्याकाळी तुळशी मातेची पूजा करून तुळशीला नमस्कार करावे. तसेच दररोज नियमित न चुकता तुळशीसमोर दिवा लावावा. असे केल्यामुळे घरामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते.

हे वाचा:   जेवणाच्या ताटात किंवा डब्यामध्ये कधीही देऊ नये तीन पोळ्या; जाणून घ्या काय आहे यामागील कारण.!

जर आपल्या घराजवळ वाहते पाणी नसेल तर अशा वेळी हे सुकलेले तुळशीचे झाड हे अंगणामध्ये कुठेतरी जमिनीत गाडावे. अशा वेळी जेव्हा पाऊस होतो किंवा जमिनीला पाणी मिळते तेव्हा या गाडलेल्या भागातून नवीन तुळशीचे रोपटे तयार होत असते. यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *