घरात दिवा लावताना दिव्याची वात नेहमी याच दिशेत ठेवावी, घरात होईल धनलाभ, अचानक पैसे येत राहतील.!

अध्यात्म

भारतामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आजकाल कोणतेही घर बांधण्यापूर्वी ते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधले जाते. कारण याला खूप विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मामध्ये कुठलाही सण असला की प्रत्येक सणाच्या दिवशी घरामध्ये दिवे लावले जातात. दिवाळीच्या सणाला तर संपूर्ण घरामध्ये हिंदू धर्मातील प्रत्येक घरांमध्ये दिवे लावले जातात.

शास्त्रानुसार असे सांगितले जाते की दिवे लावणे ही आपली संस्कृती मानली जाते. अनेक काळापासून दिवे लावले जातात. परंतु दिवा लावताना आपण अनेकदा एक चुकी खूपदा करत असतो. या चुकीमुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असते. अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने दिवा लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मक प्रभाव निर्माण होत असतो. असे करणे खूपच अशुभ मानले जाते. आजच्या या लेखामध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   हे रोपटे घरामध्ये लावा एखाद्या चुंबका सारखे पैसे घरात ओढला जाईल; गरीबी कायमची निघून जाईल.!

तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. आपण दररोज सायंकाळी तुळशी माते समोर तेलाचा दिवा नक्की लावायला हवा. तसेच आपल्या देवघरामध्ये देखील दिवा लावायला हवा. परंतु अनेक लोक दिवा लावताना एक चुकी करत असतात लोक दिवा लावताना दिव्याची वात ही वेगळ्याच दिशे मध्ये ठेवत असतात .परंतु दिव्याची वात कोणत्या दिशेमध्ये असायला हवी हे त्यांना माहिती नसते. वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेमध्ये दिव्याची वात असायला हवी हे सांगितलेले आहे.

पूर्व दिशा: जर आपण दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवली असेल तर या दिशेला शुभ मानले जाते. या दिशेला वात ठेवल्यामुळे आपल्या वयामध्ये वृद्धी होत असते. आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारच्या आजाराची बाधा होत नाही. कधीही दिव्याची वात ही या दिशेमध्ये ठेवायला हवी.

पश्चिम दिशा: या दिशेला वात ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेले सर्व दुःख नाहीसे होत असते. घरामध्ये आनंदाचे तसेच प्रसन्नाचे वातावरण निर्माण होत असते. यामुळे दुःखाचे सर्व वातावरण नष्ट होत असते. आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येत असतात. त्यामुळे दिव्याची वात ही याच दिशेमध्ये ठेवायला हवी.

हे वाचा:   शुक्रवारच्या दिवशी जर कधी केला हा एक उपाय तर, पैशाची कुठलीही समस्या राहत नाही, निरंतर धन-दौलत येत राहील.!

उत्तर दिशा: उत्तर दिशे मध्ये दिव्याची वात असेल तर असे असणे शुभ मानले जाते. यामुळे भरपूर प्रमाणात धनलाभ होत असतो. त्यामुळे उत्तर दिशे मध्ये दिवा लावण्यास काही हरकत नाही.

दक्षिण दक्षिण: दिशेकडे कधीही दिव्याची वात ठेवू नये. त्यामुळे घरामध्ये हानी निर्माण होत असते. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर दिलेल्या या तीन दिशांमध्ये तुम्ही दिव्याची वात ठेवू शकता. परंतु या एका दिशेमध्ये कधीही दिव्याची वात करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *