फक्त तीन वस्तू दाखवून देतील कमाल, चेहरा इतका गोरा होईल की सर्वजण बघतच राहतील.!

आरोग्य

प्रत्येकाला वाटत असते की आपला चेहरा हा खूपच कोमल व सुंदर असावा. परंतु आपल्या चेहऱ्यावर काही वातावरणा मुळे पिंपल्स डाग निर्माण होत असतात. अशावेळी आपल्याला सुचत नसते की नेमके काय करायला हवे. यासाठी आपण वेगवेगळ्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या क्रीमचा वापर करून बघत असतो. परंतु याचा काही एक फायदा होत नाही.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असा अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन घरगुती उपलब्ध असलेल्या वस्तूंची आवश्यकता भासणार आहे. या उपायाने तुमच्या चेहऱ्याचा रंग नक्कीच बदलेल. हा उपाय करण्यासाठी सोपा असून तुम्ही सहजपणे घरी करू शकता. यामुळे कुठलेही प्रकारचे साईड-इफेक्ट देखील होत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन वस्तूंची आवश्यकता भासणार आहे. सर्वात पहिला म्हणजे बेसन पीठ. बेसन पिठामध्ये त्वचेला गोरे करण्याची पूर्ण अशी क्षमता असते. त्यामुळे या उपायासाठी आपल्याला बेसन पीठ देखील लागणार आहे. दुसरी वस्तू लागणार आहे दूध या ठिकाणी दूध दोन ते तीन चमचे घ्यावयाचे आहे. दुधामध्ये त्वचेला कोमल करण्याचे तत्व असतात.

हे वाचा:   दोन रुपयाचा शाम्पू.! चेहऱ्यावरची सगळी घाण दूर करून चेहरा गोरापान बनवेल.! फक्त असा करा त्याचा वापर.!

दुधाचा वापर करून त्वचेला आणखी सुंदर बनवले जाऊ शकते. यासाठी दूध देखील फायदेशीर ठरते त्यामुळे या उपायासाठी दूध देखील लागणार आहे. तिसरी वस्तू लागेल ती म्हणजे तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामध्ये देखील असे गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त असतात. या तिन्ही वस्तू आपल्याला लागणार आहे.

चला तर मग पाहूया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय. सर्वप्रथम एका वाटीमध्ये तीन ते चार चमचे दूध घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे बेसन पीठ टाकायचे आहे व एक चमचा तांदळाचे पीठ टाकायचे आहे. या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर बनलेले हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यावे.

एका कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील दबलेला सर्व रंग निखरला जातो. तुम्हाला सावळ्या त्वचा पासून कायमची सुटका मिळते. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे दाग धब्बे असतील तसेच पिंपल असतील तर ते देखील नाहीसे होत असतात. यामुळे चेहरा आकर्षक व चमकदार होत असतो.

हे वाचा:   सलग काही दिवस भात खाणे किंवा जरा जास्तच भात खाणे कितपत योग्य आहे.? महिलांनी नक्की वाचा.!

हा उपाय जर तुम्ही दहा दिवसांपर्यंत करत राहिला तर यामुळे चेहऱ्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेलच. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *