शास्त्रांमध्ये भोजना संबंधीच्या अनेक काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. भोजन करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. जर आपण भोजन करत असताना अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्या तर याचा अतिशय वाईट प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपण झटपट भोजन करण्याच्या नादात काही गोष्टी करण्याच्या विसरुन जात असतो.
अनेकांना या काही गोष्टी माहिती देखील नसतील. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भोजन करते वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तसेच कोणकोणते कामे आहेत जे भोजन करताना करू नयेत व कोणते कामे आहेत ते भोजन करताना करायला हवे हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शास्त्रानुसार भोजन करण्याची योग्य पद्धत.
अन्नाला पूर्णब्रम्ह मानले जाते. अनेकांच्या घरामध्ये अन्न देवतेची स्थापना केलेली असते. ज्या घरात अन्नदेवतेचा वास असतो अशा घरात अन्नाची कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नसते त्यामुळे आपल्या देवघरात अन्नदेवतेची स्थापना करायलाच हवी. भोजन करण्यापूर्वी आपण काही गोष्टी नियमित करायला हव्यात. भोजनापूर्वी नेहमी समस्त देवीदेवतांचे नामस्मरण करायला हवे.
अनेक लोकांना अशी सवय असते की ते नेहमी भोजनाला नाव ठेवत असतात. जर भोजन स्वादिष्ट नाही लागले तर कधीही त्याला नावे ठेवू नये तसेच त्याचा तिरस्कार करू नये. यामुळे अन्न देवता नाराज होत असते. यामुळे घरामध्ये अन्नाची कमतरता भासण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात अशा प्रकारची चूकी कधीही करू नये. जसे असेल तसे अन्नाचे सेवन करावे.
जेवण करत असताना मधूनच उठून जाऊ नये. अर्ध्यावर सोडलेले जेवण याला अन्नाचा अपमान मानला जातो. कधीही अन्नाचा अपमान केला नाही पाहिजे. जेवण करत असताना अनेक जण रागाच्याभरात ताट फेकून देत असतात. परंतु याला अतिशय पापी वृत्ती समजले जाते. अशा प्रकारची चूक कधीही केली नाही पाहिजे. शास्त्रामध्ये अन्नाला पूर्णब्रम्ह मानले गेले आहे.
अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये भोजन व्यवस्था केलेली असते. तेथे बऱ्याचदा अन्नाची नासाडी झालेली दिसत असते. कधीही ताटामध्ये उष्टे टाकू नये. यालादेखील अन्नाचा अपमान मानला जातो. अशा काही चुका आहेत त्या जेवण करताना कधीही करू नयेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.