कोणताही ऋतू असो मच्छरांचा त्रास देण्याचा कार्यक्रम कधीही सुरूच असतो. मच्छर इतके भयंकर त्रासदायक असतात यामुळे आपण अनेकदा आजारी देखील पडत असतो. आपल्याला जेवढे आजार होत असतात त्यापैकी बरेचसे आजार ते मच्छरांचा चावण्यामुळे होत असतात. मच्छराना पळवण्यासाठी आपण घरात वेगवेगळे उपाय करून बघत असतो.
बाजारामध्ये यासाठीचे वेगवेगळे केमिकल युक्त पदार्थ उपलब्ध आहेत. परंतु यामुळे अतिशय विषारी असा वायू सोडला जातो ज्यामुळे मच्छराना काही होत नाही परंतु आपल्या शरीराला याचे भयंकर असे नुकसान सहन करावे लागत असते. याद्वारे सोडला जाणारा विषारी वायू हा आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतो. यामुळे अनेक भयंकर असे आजार निर्माण होण्याची शक्यता असते.
अशावेळी आपण नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खूपच सोपा असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा असून तुम्ही घरच्या घरी करून मच्छराना अगदी सहजपणे पळवून लावू शकता. चला तर मग सविस्तरपणे पाहूया कोणता आहे हा उपाय.
आपल्याला या उपायासाठी एक मातीचे भांडे किंवा मातीची पणती लागेल. तसेच मोहरीचे तेल व कडुलिंबाचे तेल देखील या उपायासाठी लागणार आहे. याबरोबरच काही कापूराची देखील या उपायासाठी आवश्यकता भासेल. यामध्ये लवंगाची देखील आवश्यकता भासेल कारण मच्छरांना याचा सुगंध अजिबात आवडत नसतो. त्यामुळे आपण याचा वापर देखील या उपायासाठी करणार आहोत.
सर्वात प्रथम मातीच्या पणती मध्ये किंवा मातीच्या वाटीमध्ये आपण हे मोहरीचे तेल व कडुलिंबाचे तेल ओतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये कापूर टाकावा लक्षात ठेवा कापूर टाकताना त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये टाकावे व यालाच चमच्या च्या
साह्याने चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे त्यानंतर यामध्ये एक ते दोन लवंग टाकावे व याला देखील चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे.
या मातीच्या पणती मध्ये कापसाची एक वात तयार करून यामध्ये टाकावी व त्याला दिव्या प्रमाणे पेटून ठेवावेत. तुम्ही जेव्हा हे पेटवून घरामध्ये ठेवाल तेव्हा तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये फरक दिसून येईल. हळुहळु सर्व मच्छर बाहेर निघून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.