सुंदरतेसाठी नख वाढवणार्‍या मुला-मुलींनो एकदा नक्की वाचा, वाढलेली नखे लगेच काढून टाकाल.!

आरोग्य

सध्याचा जमाना खूप बदलला गेला आहे. सध्याच्या काळात कोणतीही फॅशन येऊ शकते. सध्या एक निराळीच फॅशन आली आहे तरुण मुली आपले नखे वाढवून फिरत असतात. हाताची नखे वाढवणे हे मुलींना खूप आवडत असते. मुले देखील एखाद्या बोटाची नखे वाढवत असतात. परंतु याबाबत तुम्हाला हे माहिती नसेल की हे आरोग्यासाठी किती घातक मानले जाते.

असे करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे व हे जोखमीचे काम तुम्ही अजिबात केले नाही पाहिजे. नक्की नियमित कापून टाकायला हवेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला नखा विषयी माहिती सांगणार आहोत. वाढलेली नखे आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे घातक मानले जातात याबाबत सविस्तरपणे माहिती पाहूया.

लांबलचक असलेले नखे खूपच विचित्र दिसत असतात. यामध्ये अनेक प्रकारची घाण बसलेली असू शकते. तसेच यामध्ये बॅक्टेरिया देखील असू शकतो जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळे गंभीर असे संक्रमण देखील होण्याची शक्यता असते. मुली नखावर नेलपेंट लावत असतात त्यामुळे नखांमध्ये असलेली घाण दिसून येत नाही.

हे वाचा:   गुडघ्याने साथ सोडली, सांध्यात येतोय आवाज, ८० वर्षात सुद्धा धावू शकाल एवढा मजबूत उपाय एकदा करायलाच हवा.!

तसेच नखावर आपले चांगल्या प्रकारे लक्ष जात नसते. लांबलचक नखे असतील तर हे संक्रमण सारखे पिनवर्म्स निर्माण करू शकते. एका शोधा द्वारे देखील हे सिद्ध झालेले आहे की जास्त वाढलेली नखे हे लहान मुलांना जुलाब व उलटी चे कारण बनत असते. त्यामुळे शक्यतो नखे ही बारीक ठेवावी. जर लहान मुलांचे नखे खूप मोठे असतील तर यामुळे खाजण्याच्या द्वारे शरीरावर इजा देखील होऊ शकते.

लहान मुलांची आई असेल तर अशा महिलांनी देखील आपले नखे नेहमी बारीक ठेवायला हवे. यामुळे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावर याचा परिणाम पडेलच शिवाय लहान बाळावर देखील याचा गंभीर असा परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे लहान बाळाची आई असेल तर अशा महिलांनी कधीही नखे वाढवू नये.

हे वाचा:   झोपेत तुमची पण लाळ गळत असेल तर अत्यंत चिंता करण्याची गोष्ट आहे.! त्यामागे असते हे भयंकर कारण.! ऐकून पायाखालची जमीनच नष्ट होईल.!

नखे कापण्यासाठी आठवड्यातील एक वार ठरवून घ्यावा. त्यादिवशी नियमित स्वरूपात नखे कापावीत जेणेकरून नखांची वाढ कधी होणारच नाही व तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले राहिलेले दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *