कधीकधी असे घडते की आपल्याला खूप भूक लागते आणि त्या वेळी जे मिळेल ते खाण्यास आपण सुरुवात करतो. पण हे तुम्हाला तुमच्या आरोग्यास नुकसान पोहोचवू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेदानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या रिकाम्या पोटी खाऊ नयेत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा काही गोष्टी कधीही चुकून सुद्धा रिकाम्या पोटी खाल्ल्या नाही पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया.
सफरचंद आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सांगण्याची गरज नाही. परंतु हिवाळ्यात रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने बीपी वाढू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी म्हणजे काहीही न खाता सफरचंद खाल्ले तर तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी आपण उन्हाळ्यात रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ शकता.
सर्वांना पेरू हे फळ खूपच आवडत असते. त्यावर मीठ आणि मसाला टाकून खाल्ल्यानंतर तर त्याची खाण्याची मजाच काही औरच आहे. तोंडाला पाणी सोडणारे हे फळ खाताना मात्र काही वेळा काळजी घ्यावी. तुम्हाला माहित आहे का? की पेरू हे असे फळ आहे जे हिवाळ्यात रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटदुखी होते, तर उन्हाळ्यात रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायदा होतो. अशा स्थितीत तुम्ही रिकाम्या पोटी पेरू खाऊ नये.
कुठलाही पदार्थ असला तरी त्यात टोमॅटो हा येतच असतो. टोमॅटोमुळे कुठल्याही पदार्थांची चवही अधिकच वाढली जात असते परंतु टोमॅटोची चव गरम असते. हिवाळ्यात तुम्ही ते रिकाम्या पोटी खाऊ शकता. पण उन्हाळ्यात रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे अशा काळात तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाणे टाळावे.
अनेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर दही खाण्याची सवय असते. परंतु आरोग्य तज्ञ असे सांगतात की सकाळच्या वेळी दही खाणे हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. सकाळी उठल्याबरोबर कधीही दही खाऊ नये. यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुम्ही दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी दह्याचे सेवन करू शकता. यामुळे अनेक शारीरिक फायदे देखील होत असतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.