मित्रांनो, आपल्या आजूबाजूला खूप सुंदर, मनाला भुरळ पाडणाऱ्या फुलं असणाऱ्या वनस्पती असतात. म्हणूनच आपण अशा वनस्पती आपल्या अंगणात किंवा कुंड्यात लावतो. आज आपण पाहणार आहोत झेंडू फुलाच्या माहिती विषयी. आपल्या भारतात अनेक ठिकाणी झेंडूच्या फुलांची शेती केली जाते. सणासुदीला दसरा-दिवाळीच्या सुमारास या फुलांची मागणी वाढत असते. लग्नसराईत ही या फुलांना विशेष मागणी असते.
आज आम्ही तुम्हाला या वनस्पती पासून होणारे काही चमत्कारिक फायद्याविषयी माहिती देणार आहोत. गोड खाल्ल्यामुळे, फ्रीजमधील थंडगार, सतत कॉफी चहा पिणे, धूम्रपान, सिगारेट यांसारख्या सवयींमुळे कोणत्याही वयात दात दुखी ची समस्या होऊ लागते. अशा प्रकारची दात दुखणे जर तुमच्या घरात कोणाला असेल तर दहा ग्रॅम झेंडूच्या पानं घेऊन ते दोन ग्लास पाण्यामध्ये चांगली उकळावेत.
ते दोन ग्लास पाणी एक ग्लास होईपर्यंत उकळावे. त्या पाण्याने गुळण्या करा. असं केल्याने तुमची दात दुखी त्वरित थांबते. ज्या कोणाला पाइल्स (बवासीर ) चा त्रास असेल. त्यांनी दहा ग्रॅम झेंडू चे पानांचा रस सोबत दोन दाणे काळी मिरी कुटून घ्या. हे एकत्र करून प्या. असं केल्याने मूळव्याधीच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो. परंतु हा प्रयोग तुम्ही कोणता जाणकार वैद्याच्या सल्ल्यानुसारच करावा. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते.
आता थंडीचे दिवस येत आहेत आणि थंडीच्या दिवसांत टाचांना भेगा पडणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. झेंडूच्या पानांचा वापर करून तुम्ही फाटलेल्या टाचा ना /भेगांना ठीक करू शकता. झेंडूच्या पानांचा रसासोबत व्हॅसलीन मिसळून टाचेच्या भागांना लावावे. तुमच्या टाचा पुन्हा पूर्वीसारख्या मऊ होतील. झेंडूच्या वनस्पतीचा अजून एक फायदा म्हणजे किडनी स्टोन /पथरी च्या त्रासामध्ये स्टोन फोडून आराम देण्याचं काम करते.
त्यासाठी झेंडूच्या पानांचा काढा बनवून दिवसातून दोन वेळेस घेतल्याने मूत्रमार्गाने स्टोन पडून जातो. जर तुम्हाला विंचू डंख मारले किंवा मधमाशीने चावले असता त्या भागावर तुम्ही झेंडूच्या पानांचा रस त्वरित लावा. तुम्हाला आराम मिळेल. तर आज आम्ही तुम्हाला झेंडूच्या झाडाचे न ऐकलेले न वाचलेले काही फायदे सांगितले आहेत. आशा आहे तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.