फक्त महिलांसाठी.! युरेनरी इन्फेक्शन नेमके असते तरी काय माहिती आहे का.? एक लहानशी चूक जीवघेणी ठरू शकते.!

आरोग्य

जग बदलत चालले आहे. सर्वांच्या जीवनशैली‌ मध्ये देखील दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्याचबरोबर आजारांचे प्रमाण देखील वाढत आहे. अनियमित दिनचर्या, कामाचा मानसिक त्रास, प्रक्रिया केलेले अन्न खाणे, आरोग्याची पूरेशी काळजी न घेणे, मुळात स्वतःसाठी नसलेला वेळ हे या आजारांना वाढायला मदत करते.आज आपण अश्याच आजाराबद्दल बोलणार आहोत.

जो बऱ्याच वेळा कोणाला माहित नसतो की हा आजार आपल्याला झालाय किंवा त्यामधील फरक माहित नसतो.स्त्रियांना बहुतेक वेळा यु’रिनरी‌ ट्रॅक्ट‌ इन्फेक्शन व व’जायनल इन्फेक्शन यामधील फरक माहित नसतो. तर आज आपण या लेखामध्ये यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बद्दल जाणून घेऊया. यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे आजकालच्या तरुणायीमध्ये वाढलेला आजार.

यु’रिनरी ट्रक्ट इंन्फेक्शन म्हणजे मू’त्रमार्गाच्या भागातील संसर्ग. पुरुषांपेक्षा हा आजार मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये झालेला आढळतो. हा संसर्ग येवढा गंभीर नाही परंतु या आजारकडे जर लक्ष नाही दिले तर हा आजार किडनीपर्यंत तसेच शरीरामध्ये पसरू शकतो, मग हा आजार गंभीर बनू शकतो. यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा संसर्ग म्हणजे मूत्राशयाचा संसर्ग.

त्यामुळे यूरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन ची लक्षण देखील मू’त्राशयाच्या संसर्गा सारखीच दिसून येतात. जर एखादया व्यक्तीला यु’रिनरी ट्रक्ट इन्फेक्शन झाले असेल तर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. जसे की, पोटात दुखणे, लघवी मधून रक्त येणे, उलट्या होणे, पोटाच्या खालच्या बाजूला दुखणे, लघवीला सारखे होणे, लघवी करताना जलने, लघवीला वास येणे, लघवीला नीट न झाल्या सारखे वाटणे, ताप येणे, पाठ दुखणे, लघवीची जागा दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.

हे वाचा:   सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्यावे की तुळशीचे पाणी, कोणते पाणी असते शरीरासाठी उत्तम.!

हा आजार जर किडनीपर्यंत पोहचला असेल तर थंडी ताप सोबतच उलट्या होणे असे देखील दिसून येते. यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा इ.कोलाई बॅक्टरियामुळे होतो. हा बॅक्टरिया शौचाच्या जागेवर आढळतो. गुप्तांगांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे, गुप्तांगांची स्वच्छ्ता न ठेवल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा लैंगिकदृष्ट्या सक्रिय अडल्टस मध्ये होतो त्यामुळे शारीरिक संबंध झाल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता असते.

मासिकपाळीच्या नंतर महिलांना, त्याचप्रमणें शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्यापेक्षा कमी पाणी पिणे, वेळेवर लघवीला न जाणे ही कारणे देखील हा आजार होण्यासाठी मदत करतात. मधूमेहामुळे, किडनीच्या आजारामुळे किंवा कॅथरेटरमुळे देखील यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतो. ऑपरेशनमुळे युरिनरी कॅथराटर लावला जातो त्यामुळे देखील यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाला आहे की नाही हे ओळखाण्यासाठी यु’रीन रूटीन मायक्रोस्कोपी केली जाते.यामध्ये बॅक्टेरीयाचे प्रमाण , लाल र’क्तपेशींचे प्रमाण, लघवीचा रंग, लघवीमधून प्रथिन्यांचे विसर्ग होत आहे का , विशिष्ट गुरुत्व यांची चाचणी केली जाते. त्याचप्रमाणे या चाचण्यांमधून असे आढळून आले की संसर्ग तीव्र आहे तर यु’रीन कल्चर सेन्सिटिव्हीटी टेस्ट केली जाते. या चाचणीमध्ये संसर्ग निर्माण करणारा जंतू ओळखला जातो.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर एकदा तुमची उशी नक्की चेक करा.!

त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा आजार बरा करण्यासाठी मदत होते. यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन टाळण्यासाठी दररोज २-३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे , गुप्तांगाची स्वच्छता राखली पाहिजे, शारीरिक संबंध झाल्यानंतर व व्हायच्या आधी लघवी कारणे महत्त्वाचे आहे,महिलांना मासिकपाळीच्या दरम्यान स्वच्छ्ता राखणे गरजेचे आहे तसेच सॅनीटरी पॅड देखील ४-५ तासानंतर बदलने महत्त्वाचे आहे.

कॅथराटर लावले असेल तर त्याची देखील स्वच्छता ठेवली पाहिजे, डायबिटीस असणाऱ्या लोकांनी ती मर्यादे मध्ये राखली पाहिजे. २-३ तासाच्या अंतरात तरी लघवीला गेले पाहिजे. यु’रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये औषधांबरोबर ताक, दही यांचे सेवन केलेले चांगले असते हे हा आजार तर बरा करतात सोबतच रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.