शरीर हत्ती सारखे मजबूत बनेल, फक्त करा अशा प्रकारे सेवन, हे अकरा आजार जवळ सुद्धा येणार नाही.!

आरोग्य

जवसाच्या बियांचे (अलसी /flaxseed) सेवन करण्याचे फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल..मित्रांनो, आज आपण आयुर्वेदानुसार जवसाच्या सेवनाचे काही गजब फायदे पाहणार आहोत. पुरुषांतील वी’र्यनाश समस्या, महिलांच्या केसांच्या तक्रारी, मा’सिक पा’ळीच्या समस्या, हाडं ठीसूळ होणे, डोळ्यांनी कमी दिसणे,उच्च रक्तदाब, रक्ताची कमतरता (Anaemia), शरीरात ताकद ऊर्जेची कमी असणे अशा प्रकारचा कोणताही समस्या असल्यास पुढील माहिती अवश्य वाचा.

कोणत्याही वयामध्ये जवसाचे सेवन करू शकता. पण सेवन करण्याचे योग्य पद्धत आणि कशासोबत खावे हे आपण विस्तारित पाहुयात. कच्चे जवस गरम तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत तेलाशिवाय भाजायचे आहे. हलकेसर कोमट झाल्यावर मिक्सरच्या मदतीने बारीक पावडर बनवून घ्यावी. ही झाली तुमची जवसाची पावडर तयार. हे तुम्ही हवा बंद बरणीत एक महिन्यापर्यंत साठवू शकता.

या पावडरीचा एक चमचा हलक्या कोमट पाण्यासोबत त्यात अर्ध्या लिंबाचा रस, एक चमचा मध असे जर तुम्ही सकाळी उठून काहीही न खाता पिता घेतलत तर तुमच्या शरीराची ताकद वाढते. मग तुम्ही महिला असा किंवा पुरुष. हाडांची कमजोरी, कोणत्याही प्रकारचा थकवा, खूप जास्त आळस येणे अशा प्रकारांत हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.

कोणत्याही कारणाने पुरुषांमध्ये होणारे वीर्याची समस्या असेल तर अर्धा चमचा जवस पावडर, अर्धा चमचा अश्वगंधा पावडर, अर्धा चमचा शतावरी पावडर हे मिश्रण एकत्रित करून कोमट दुध किंवा कोमट पाण्यासोबत रात्री झोपताना प्यावे. आठवड्यातून तीन दिवस हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. यापेक्षा जास्त करू नये. हा उपाय रोज केल्यास शरीरातील उष्णतेचा दाह वाढेल.(चमचा छोट्या आकाराचा असावा.)

हे वाचा:   भेंडीचे पाणी सेवन केल्यास काय होते.? रात्रभर भेंडी पाण्यात भिजवून ठेवून त्याचे पाणी पिण्याने नेमके काय झाले.!

सोबतच सकाळी उठल्यावर दंड बैठका किंवा कोणताही योग-प्राणायाम करायचा आहे. सूर्यनमस्कार केल्यास अतिउत्तम.! एक चमचा जवस पावडर एक चमचा आवळा पावडर याचे रोज सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. सोबतच केसांना मजबुती येते. केस गळण्याच्या समस्या आजकाल वाढत आहेत त्यावर हा रामबाण उपाय आहे. केस मुळापासून स्ट्रॉंग होतात. शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित ठेवते.

ताणतणावामुळे अँटीएजिंग ची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जवसामध्ये विटामिन ए, बी १२, डी, कॅलशियम भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच सर्व प्रकारच्या समस्यांवर ती जवसाचे बीज सेवन हे एक वरदान होय. परंतु आम्ही तुम्हाला परत परत सांगत आहोत याचे प्रमाण मात्र कमी घ्यायचे आहे नाहीतर उष्णतेने त्रास वाढेल. जवसाच्या सेवनाने संपूर्ण पचनक्रिया सुधारते.

लहान आतडे मोठे आतडे पँक्रिया, पोट इत्यादी अन्नपचनाची संलग्न सर्व अवयव सहापट ठेवण्या सोबतच त्यांना स्ट्रॉंग ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला अन्न खाल्ल्या जात नसेल कमी अन्न खाऊनही वजन वाढत असेल, किंवा खूप खाऊन सुद्धा तुमचं वजन वाढत नसेल, मेटाबॉलिझम रेट असंतुलित झाला असेल या प्रकारच्या कोणत्याही समस्या असल्यास पुढील उपाय करावा. एका आठवड्यातील एक दिवसाड म्हणजेच तीन दिवस हे तुम्हाला करायचं आहे.

हे वाचा:   दहा रुपये खर्च करून हा जुगाड करून बघा.! घरात एका मिनिटाच्या वर पाल राहिली तर बोला सगळ्या पाली आता झटपट घरातून काढून टाका.!

अर्धा चमचा जवसाची पावडर त्यासोबत अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण सकाळी कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी घ्यायचे आहे. सोबत तुम्हाला वेळेत झोपणे उठणे याकडे लक्ष द्यायचे आहे. एक ते दीड महिना हा प्रयोग तुम्ही करावा यानंतर तुम्ही हा प्रयोग सुरू ठेवू नका. यातच तुम्हाला खूप फरक जाणवेल. रक्त शुद्धीकरणा मध्येही जवसाच्या बियांचा खूप मोठा फायदा होतो. या शिवाय शरीरातील स्नायूंना लवचिक बनवण्यात जवस मदत करते.

जवसाचे बी अति उष्ण असल्याकारणाने उन्हाळ्याच्या दिवसात याचे प्रमाण तुम्ही कमी करा. शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ही जवसाच्या बियांचे सेवन फायदेशीर आहे. याचा मेंदू क्षमता शार्प करण्यात फायदा होतो. थोडासा हवामान बदलामुळे ज्यांना लगेच त्रास होतो त्यांनी अर्धा चमचा जवस पावडर अर्धा चमचा आवळा पावडर मधासोबत चाटण करून घ्यावे.

फक्त जे लोक रोज व्यायाम करतात त्यांनी हे उपाय रोज केले तरीही चालतील. उपाय करताना वरील सांगितलेल्या प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *