नमस्कार मित्रांनो, आवळा तर तुम्ही लहानपणापासून खात आला असाल परंतु या वनस्पतीच्या पानांविषयी तुम्हाला माहिती आहे काय? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आवळा आणि आवळ्याच्या पानांविषयी माहिती. तुम्हाला पोटांच्या कोणत्याही तक्रारी असतील जसे की अपचन, गॅस होणे, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोट साफ न होणे, पोट दुखी असल्यास तुम्ही आवळ्याचे पाने वाटून 10 मिली पर्यंत रस घेऊन ताक दही किंवा मठ्ठा सोबत याचे सेवन करा.
असं केल्याने तुमच्या पोटा संबंधित सर्व तक्रारी नष्ट होतील. आवळ्याच्या पानांचे नियमित सेवन केल्याने ब्लडप्रेशर आणि डायबिटीस नेहमी नियंत्रणात राहतात. तोंडामध्ये फोड आले असल्यास, तोंड आले असल्यास या वनस्पतींच्या पानात थोडे मीठ घालून काढा बनवून गुळण्या केल्याने घशातील इन्फेक्शन दूर होईल आणि तोंडामध्ये आलेले फोड ठीक होतील.
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास आणि ती ठिक होत नसल्यास तर तुम्ही आवळा च्या पानांचा सोबत तुरटी मिसळून काढा बनवा. व त्याने ती जखम स्वच्छ धुवा. असं केल्याने त्या जखमे मधील बॅक्टरिया नष्ट होऊन इन्फेक्शन जाईल. जखम लवकर सुकू लागेल. आवळ्याची पाने जाळून कोणत्याही तेलात मिक्स करुन त्वचारोगात लावल्याने त्वचा रोग लवकर ठीक होऊ लागतो.
आवळ्याच्या पानांचे पेस्ट बनवून त्यात मध घालून त्याचा लेप बनवून चेहऱ्यावर लावल्यास फोड फुटकुळ्या पिंपल्स ठीक होतात. चेहरा चमकदार होतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते हे सर्वश्रुत आहेच. आवळ्याच्या खोडाचे साल देखील आवळा व आवळा च्या पानांप्रमाणेच गुणकारी आहे. डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारींवर आवळा च्या पानांचा काढा बनवून त्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांचे सर्व रोग नष्ट होऊ लागतात.
10 ग्रॅम आवळ्याचे पान त्यात काळे मीठ घालून चटणी बनवून त्याचे सेवन केल्याने भूक वाढते. पोटातील गॅस ॲसिडिटी दूर होते. केसांच्या सर्व तक्रारींवर रामबाण आणि वरदान उपाय म्हणजे आवळा. आवळ्याच्या पान किंवा सालिने केस धुतल्यास केस चमकदार होतात. कोंडा नष्ट होतो. जर तुम्ही खोकला दमाने हैराण असाल तर आवळ्याची सालं काढून वाळवून चूर्ण बनवा.
10ग्रॅम आवळ्याचे हे चूर्ण दहा ग्रॅम मधामध्ये रात्री चाटण केल्याने खोकला व दम्यामध्ये आराम मिळतो.छातीतील साठलेला कफ दूर होतो. नेहमीपेक्षा थोडेशी वेगळे अशी या माहितीने तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घातली असेल. या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशीच ही ज्ञानवर्धक माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.