मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत स्पेशल टॉपिक वर ती माहिती घेऊन आलो आहोत. कारण हा उपाय करून तुम्ही आपला हात पाय चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर लावल्यास इतका अद्भुत फरक जाणवेल. या उपायाने तुमची स्किन तर गोरी होईलच परंतु सोबतच लूज पडलेली त्वचा देखील यंग दिसून चमकू लागेल.
खराब हवामानामुळे प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचा रंग खराब होतो. हळूहळू ‘डलनेस’ वाढू लागतो. ज्यामुळे चेहरा काळवंडतो. हा जो उपाय आहे तो तुमच्या शरीराच्या पूर्ण अवयवांवर उजळपणा आणेल. आता जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा? त्यासाठी तुम्हाला लागणारा प्रथम घटक आहे थोडेसे तांदळाचे पीठ. चेहरा टवटवीत आणि उजळ ठेवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा आपल्याला उपयोग होतो.
तांदळाचे पीठ तुम्ही घरी देखील बनवू शकता किंवा किराणा च्या दुकानात तयार ही मिळते. दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे कच्चा दूध. अर्धा कप कच्च दुधास दीड चमचा तांदळाचे पीठ या प्रमाणात साहित्य घ्या. मिश्रण एकत्र करून मंद आचेवर गरम करा. गरम करताना चमच्याने सलग हलवत रहा. दुध गरम होईल तसतसे घट्ट पेस्ट बनत जाईल. दोन ते चार मिनिटातच घट्ट पेस्ट मिळेल. आता गॅस बंद करा.
रिकाम्या बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेऊन थंड होऊ द्या. ही पेस्ट पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. दोन ते तीन वेळेस वापरल्याने तुमची त्वचा उजळेल. थंड झाल्यावर शेवटचा घटक यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस. लिंबा मध्ये असणाऱ्या विटामिन सी या घटकामुळे त्वचा डॅमेज होण्यापासून वाचते.
सोबतच ॲन्टी एजिंग चे ही काम लिंबाचा रस करते. त्वचेचा PH लेवल नियंत्रणात ठेवते ज्यामुळे त्वचा उजळते. मध्यम आकाराचा अर्धा लिंबाचा रस या मिश्रणात घाला. हे एक ते दोन मिनिट समजा आणि व्यवस्थित ढवळून घ्या त्याची एक क्रीम तयार होईल. ही क्रीम शरीरातील कोणत्याही भागावर लावल्यास तुम्हाला अद्भुत रिझल्ट बघायला मिळतील.
ही क्रीम लावण्यापूर्वी त्वचेचा भाग साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. कोरडा करून बोटाने त्या भागावर ही क्रीम लावून घ्या. ही क्रीम सनस्क्रीन प्रमाणेच काम करते. हे लावून शरीराचा झाल्यावर तो भाग पोलिथेनने झाकावा. चेहऱ्यावर याचा वापर पंधरा मिनिटं करावा. बाकी शरीराचा भागावर 30 ते 45 मिनिटे याचा वापर करावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
पहिल्याच वापरात तुम्हाला फरक जाणवू लागेल. आठवड्यातून दोनदा याचा प्रयोग करावा. माहिती आवडल्यास याचा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरु नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.