नमस्कार मित्रांनो, जडीबुटी, वनस्पती, झाडे झुडपे याबद्दलची माहिती शृंखला पुढे नेत आज आपण जाणून घेणार आहोत अकरकरा या वनस्पती विषयी.. आपला भारत देश अशा अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण हिरवागार वनस्पतीने नटलेला आहे. त्यांचा काही ना काही उपाय उपचार नक्की आहे. या वनस्पतींच्या मदतीनेच तुम्ही अनेक प्रकारचा रोगांपासून सुटका करू शकता.
आमचा हेतू हाच आहे की तुमच्यापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती विषयी माहिती पोहोचवावी. आज पाहूया अकरकरा विषयी. अकरकरा ही वनस्पती भारतातील प्रत्येक क्षेत्रात सहज आढळते. वेगवेगळ्या प्रदेशातील या वनस्पतीला वेगवेगळी नावे आहेत. वर्षा ऋतूत ही वनस्पती आपोआप उगवते. खूप सुंदर आणि बहुगुणी रोपट असतं याचे.
या वनस्पतीच्या मदतीने अनेक होमिओपॅथी औषधे देखील बनवले जातात. वात पित्त कफशामक असते ही वनस्पती. चवीला कडू आणि प्रकृतीने उष्ण देखील असते. उत्तेजक व पाचक गुणधर्म यामध्ये आढळतात. या वनस्पतीचे फळं, फूल, पान, खोड, मुळं सर्वच भाग उपयोगी असतो. त्याचा उपयोग करुन तुम्ही दात दुखी ची समस्या ठीक करू शकता.
त्वचारोगातील खरूज नायटा गजकर्ण खाज येणे यासारखी समस्या देखील तुम्ही ठीक करू शकता. सायटीका चा इलाज देखील तुम्ही याच्या मदतीने करू शकता. सफेद डागाच्या समस्येवर देखील तुम्ही उपाय करू शकता. सायटीका मध्ये या वनस्पतीची मुळे वाटून अक्रोड च्या तेलासोबत मालिश केल्याने तुम्हाला लाभ होईल.
याचा उपयोग सांधेदुखी गुडघेदुखी यामध्येही करू शकता. सफेद डाग /श्वेत कुष्ठ च्या समस्यांमध्ये या वनस्पतीच्या पानांचा रस प्रभावित जागी लावा. श्वेतकुष्ठ ठीक होतो. त्वचा रोगात खाज नायटा इत्यादी मध्ये अकरकरा चे ताजे फुलं आणि पान वाटून प्रभावित जागी लावल्याने ही समस्या ठीक होते. दातदुखीत या वनस्पतीचे फुलं चावा.
असं केल्याने तुम्हाला आराम मिळेल. या माहितीचा तुम्ही फायदा करून घ्या आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांचा ही फायदा करून द्या. या वनस्पतीला तुमच्या भागात काय म्हंटले जाते ते कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.