ओला खोकला असूद्या किंवा कोरडा खोकला, हा काढा दोन मिनिटात त्याला पळवून लावेल, खोकल्याचे जालीम औषध.!

आरोग्य

आजकाल वातावरणातील बदलांमुळे कोणताही संसर्ग झाला की, थोडी काळजीच वाटू लागते. अशा हवामनातील बदलांमुळे होणारा एक त्रास म्हणजे घसा दुखणे. बऱ्याचदा अचानक आपला घसा दुखीचा त्रास होत असल्याचे जाणवू लागते. अन्न चावताना त्रास होतो इतकेच काय तर पाणी पिताना देखील घसा दुखतो. घसा दुखण्याकडे दुर्लक्षही करुन चालत नाही. कारण त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा जास्त त्रास होऊ शकतो.

अनेकदा घसा खवखवून आवाज ही बसू शकतो. दीर्घ घसादुखी राहिल्यानंतर कोरडा खोकला झाल्याचे पाहायला मिळते. कोरडा खोकला झाल्यावर खोकून खोकून छातीत दुखणे इत्यादी प्रकारचे अनेक आजार होतात. त्यामुळे घसा दुखी सुरू झाल्यास त्यावर ताबडतोब उपचार करायला हवेत. वैद्यकीय भाषेमध्ये याला थ्रोट इन्फेक्शन म्हटले जाते.

घसा दुखी चे असे कोणतेही एक स्पेसिफिक कारण नसते. घशाला सूज येणं, कामामुळे सतत अति बोलून ताण येणे, काही अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे घसा खवखवला जाणे असे बरेच कारण असतात. तोंडाचा वापर आपण सगळ्यात जास्त करतो आणि त्यावेळी अनेकदा जंतूचा शिरकाव हा तोंडातून होतो. जर तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्हाला कोणत्याही इन्फेक्शनचा त्रास अगदी पटकन होऊ शकतो.

हे वाचा:   फक्त एकदा असा कांदा खा, तुमची मर्दानी ताकद खूप वाढेल, स्टॅमिना मध्ये जबरदस्त वाढ होईल.!

अनेक जणांना तोंड उघडं ठेवून झोपण्याची सवय असते. सतत बोलल्यामुळे घशावर ताण येतो. अनेकदा ताप आल्यामुळे देखील घसा दुखू लागला असल्याचे जाणवते. सर्दी झाल्यास ती आत ओढण्याच्या सवयीमुळे देखील घसा दुखू लागतो. आहे लोकांना तोंडामध्ये कमी लाळ बनण्याचा त्रास असतो त्यामुळे तोंड कोरडे पडते. अशा लोकांना घसादुखी चा त्रास जास्त होण्याची शक्यता असते.

घशामध्ये श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि जंतू संक्रमणाचा त्रास दूर करण्याचे काम टॉन्सिल्स करतात. अति प्रमाणात थंड पदार्थ /पाणी पिणे, ताप, सर्दी यामुळे टॉन्सिल्स खराब होऊन कशावर परिणाम होतो. तेव्हा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे तुम्हाला आता लक्षात आले असेल. तरीदेखील घशाचा दुखीचा त्रास सुरु झाला असल्यास आम्ही तुम्हाला उपाय सुचवत आहोत.

एक ग्लास कोमट पाण्यात तीन चिमूटभर सैंधव मीठ घालून गुळणा करणे हा एक जुन्या काळापासून चालत आलेला घरगुती प्रभावी उपाय आपण सगळेच जाणतो. पण कोमट पाण्यात एकच मुठभर हळद घालून गुळण्या करा. मूळव्याधीची समस्या असल्यास व गर्भवती स्त्रियांनी जास्त हळद वापरू नका. लहानांपासून अगदी थोरामोठ्यांचा पर्यंत हा उपाय कोणी करू शकते.

हे वाचा:   तळपायापासून डोक्यापर्यंत सर्व शरीर होईल मोकळे.! सर्व नसा मोकळ्या होऊन वाहू लागतील.! हे आजार आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही.!

हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल, अँटी फंगल, anti-inflammatory गुणधर्म असतात. त्यामुळे घशातील सर्व इन्फेक्शन जाण्यास आपली मदत होते. काही टिप्स : १. वाफ घ्या : तोंड उघडून घशाला लागेल अशा पद्धतीने वाफ घ्यावी. यामुळे घशाला शेक बसून आराम मिळेल. २. सुंठ पावडर व मध याचे चाटण बनवून खाल्ल्याने ही घसा दुखीत आराम मिळतो.

३. जास्तीत जास्त पाणी प्या. शक्य असल्यास काही दिवस सलग कोमट पाणी प्यायची सवय करा. ४. लसणाचा बेस्टचा अर्क मधासोबत घेतल्याने घशाला आलेल्या सुजे मध्ये आराम मिळतो. ५. प्रमाणात पेपरमिंटच्या गोळ्या देखील तुम्ही खाऊ शकता. ६. दोन लवंग, पाव चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात उकळवून ते पाणी गाळून कोमट करून प्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *