मनका दुखी आणि कंबरदुखी पासून त्रस्त झाला का? आता करा याचा परमनंट इलाज.!

आरोग्य

भयंकर असे कमरेचे दुखणे मुळापासून नष्ट करण्याचा घरगुती रामबाण उपाय आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत. कितीही जुनाट कमरेचे दुखणे असले किंवा थंडी मध्ये होणारे कमरेचे दुखणे असेल तर तुम्ही या उपायाचा अवलंब निश्चितच करायला हवा. आम्ही तुम्हाला दोन प्रकार सांगू. दोन्ही प्रकार स्वतः करून बघितलेले आहेत. या उपायांमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही झालाच तर प्रत्येक प्रकाराने फायदाच होईल.

या उपायासाठी सर्व प्रथम आपल्याला लागणाऱ्या घटकांपैकी एक आहे तो म्हणजे भाजी बनवण्यासाठी मसाल्यात वापरला जाणारा पदार्थ म्हणजेच तमालपत्र! आपल्या शरीरासाठी अनेक रोगांवर आजारात अत्यंत फायदेशीर असते तमालपत्र. तमाल पत्रा मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, लोह हे घटक मोठा प्रमाणात असतात. कंबर दुखी मुळे अनेक लोकांना मांसपेशी शिरा आखडल्या जातात आणि तीव्र वेदना होऊ लागतात.

यासोबतच थंडीच्या दिवसांमध्ये याचा काढा बनवून पिल्यास तुम्हाला सर्दी कफ खोकला मध्ये देखील आराम मिळेल. दुखण्याला प्रतिबंध करणारे अनेक घटक पदार्थ तमालपत्र मध्ये असतात. आठ ते दहा तमालपत्र घेऊन त्यांचे हाताने छोटे छोटे तुकडे करा. ते एका कढईमध्ये घाला. यानंतर या उपायात आपल्याला पुढील घटक लागणार आहे तो म्हणजे दोन वाटी मोहरीचे किंवा तिळाचे तेल.

आज-काल बघायला गेलं तर बाजारामध्ये तमालपत्र चे रेडिमेड ऑइल देखील उपलब्ध आहे. परंतु, घरामध्ये तुम्ही या पद्धतीने तेल बनवले तर ते स्वच्छ, बिना भेसळ, अधिक परिणाम कारक, केमिकल विहरीत आणि खिशाला परवडेल असेही असेल.. तेव्हा सांगितलेल्या कृती प्रमाणे तमालपत्र चे तेल तुम्ही घरीच बनवून बघा.

हे वाचा:   चिकन मटन बनवताना हे दोन मसाले टाका.! जबरदस्त चव येईल.! हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल असे मटन घरीच बनवा.!

तिळाचे अथवा मोहरीचे तेल अशा तुमाल पत्रांच्या तुकड्यांमध्ये कढईमध्ये घालून मंद आचेवर शिजवा. सुमारे दहा ते बारा मिनिटे असे शिजवून घ्या. व्यवस्थित शिजल्यानंतर तमालपत्र चा रंग बदलेल तेव्हा गॅस बंद करा. शिजवताना अधूनमधून चमच्याने हलवत रहावे. तमाल पत्राचे पूर्ण औषधी गुणधर्म या तेलात उतरतील. हे थंड होईपर्यंत कसे ठेवावे. कोमटसर झाल्यावर हे तेल गाळून घ्यावे किमाया मधील तमाल पत्रा ची पाने वेगळी करावी.

हे तेल एका बाटलीमध्ये भरून ठेवा. या तेलाचा मसाज करण्यासाठी तुम्ही अवश्य वापर करा. जिथे कुठे तुम्हाला दुखत असेल त्या ठिकाणी हलक्या हाताने पाच ते सात मिनिटं मसाज करावा त्यासाठी तेल कोमटसर असावे. कंबरेच्या दुखण्यासाठी दुसरा उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत तो तीन ते चार दिवस तुम्हाला सलग प्यायचे आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे पाव चमचा ओवा, पाव चमचा बडीशेप. या दोन्ही वस्तू एका भांड्यात एकत्र करा.

हे वाचा:   जर कुठे आढळली ही वनस्पती तर पटकन घरी घेऊन या; दम्याच्या आजारावर आहे रामबाण उपाय.!

यामध्ये दीड ग्लास पाणी घाला. आता हे मिश्रण गॅस वर गरम करायला ठेवा. यासोबतच यामध्ये दोन मोठे तमालपत्र स्वच्छ धुऊन व नंतर तोडून घाला. आता हे मिश्रण मंद आचेवर इतके शिजवा की दीड ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी होईल. या प्रक्रियेमध्ये तमालपत्र तळाशी बसतील. सर्व घटकांचे गुणधर्म या पाण्यात उतरतील. हे गाळून ग्लासामध्ये घ्या. पिण्याजोगे कोमट झाल्यानंतर या मध्ये एक चमचा मध घालून याचे सेवन करा.

उपाय तीन : वरीलप्रमाणे बनवलेले तेल लावून मसाज केल्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये टॉवेल बुचकळवा. टॉवेल पिळून त्यातील पाणी काढून घ्या. अशा गरम टॉवेलचा उबारा कमरेवर ठेवा. त्यामुळे तुमच्या कमरेला उब व शेक लागून त्वरित आराम मिळेल. टॉवेल थंड झाल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने तीन ते चार वेळेस तुम्ही कंबर शेकावी. तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *