नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये सण व्रत वैकल्यांची काहीही कमतरता नाही. त्यामुळे फक्त श्रावण महिन्यात काय तर वर्षभर आपल्या घरी काही ना काही पूजा सुरूच असते. त्यामध्ये वापरले जाणारे तांब्या-पितळेची ही भांडी स्वच्छ ठेवण्याचे काम म्हणजे जिकरीचे असते. त्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत एक उपाय. चला तर मग पाहूया आता कधीही कमी मेहनती मध्ये फटक्यात अशी तांब्या-पितळेची भांडी कशी चकाचक स्वच्छ करायची ते याचे भन्नाट आयडिया..!
यासाठी तुम्हाला लागणार आहे चार मोठे टोमॅटो. या टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घ्या. फोडी फार मोठ्या किंवा बारीक नको. प्रेशर कुकर मध्ये हे कापलेले टोमॅटो घाला. त्यामध्ये तुमच्या पूजेत वापरले जाणारे तांब्या-पितळेची चे कोणतेही भांडे घाला. जसे दिवा, समई, घंगाळे इत्यादी.. घरातील काही स्वयंपाकाच्या भांड्यांना देखील तळाला तांब्याचे कोटिंग व वर स्टील चे भांडे असते. स्टील चा भाग तर स्वच्छ निघतो परंतु तळाशी असलेले तांब्याचे कोटिंग मात्र काळे पडते.
अशा वेळी असे भांडे देखील तुम्ही कुकर मध्ये घालू शकता. तुमचा कुकरच्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात कमी आकाराची सर्व भांडी बसतील. यानंतर यामध्ये सर्व भांडे बुडतील इतके प्रमाणात व्यवस्थित असे पाणी घाला. त्यानंतर कूकरचे झाकण लावा. आता गॅस पेटवून कुकरच्या चार शिट्ट्या करा. लक्षात ठेवा गॅस मध्यम असे वर असू द्यावा. जास्त आच असू नये किंवा कमी आचही असू नये. चार सुट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर व्यवस्थित गार होऊ द्यावा.
गार होईपर्यंत घाई करू नका. गार झाल्यानंतर कुकर मधील वाफ काढून घ्या. थोडक्यात भात/भाजी शिजवतो त्याचप्रमाणे शिजवायचे आहे. पकडीच्या किंवा चिमटाच्या मदतीने एक एक करुन कुकर मधील सर्व भांडे बाहेर काढून घ्या. सर्व भांडी तुम्हाला कमी मेहनतीत स्वच्छ लखलखीत झालेली दिसतील. अगदीच खूप जास्त प्रमाणामध्ये भांडण घाण किंवा चिकट असेल तर थोडे फार घासावे लागू शकते.
भांड्याच्या प्रमाणानुसार टोमॅटोचे प्रमाणदेखील कमी जास्त करावे व कुकर त्या मापाचा घ्यावा. अशाप्रकारे तांब्या पितळाची भांडी न घासता कमी मेहनती मध्ये स्वच्छ व लखलखीत पाहिजे तेंव्हा करू शकता. लक्षात घ्या, कुकर मधील पाणी संपूर्ण गार होऊ द्यावे. यामध्ये आपण टोमॅटो चा वापर केला आहे. टोमॅटो मध्ये प्रचंड प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच लाभदायी आहे.
भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन सर्वत्रच घेतले जाते त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात, तेही अगदी कमी किंवा माफक दरात. आपल्या दैनंदिन जीवनात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तेंव्हा हा स्वस्त सोपा उपाय तुम्ही आजच करून बघा. आणि आपल्या मैत्रिणी सोबत अवश्य शेयर करा.
स्मार्ट टीप : चेहऱ्यावर आठवड्यातून टोमॅटोचा रस लावल्याने त्वचा उजळते आणि डाग जातात. याशिवाय त्वचेला लवकर सुरकुत्या पडत नाहीत.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.