2 दिवसाच्या आत खाज खरुज बरा होणार.! त्वचा इन्फेक्शन असे केले जाऊ शकते दूर.! कसाही त्वचा विकार यामुळे बरा होतो.!

आरोग्य

वातावरणातील बदल आपल्या त्वचेवर परिणाम करत असतात. म्हणूनच इतर ऋतू व खास करून उन्हाळ्यात होणार्‍या त्वचेच्या आजारांची माहिती आणि त्यांचे त्वरित उपचार आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. घामोळ्या : अति प्रमाणात घाम येतो. शरीरावरील घर्मग्रंथी बंद होतात. आणि सर्व त्वचेवर लालसर पुरळ उत्पन्न होतात. यामुळे खूप आग होते खाज येते.

बुरशी : याला ” fungus ” म्हणून ओळखतात. ज्यामध्ये त्वचेवरचा काही भाग पांढरट सर होतो आणि पुढे हे पॅच पसरत जातात. शरीराच्या ओलसर भागी अधिक पाहायला मिळतात. जसे काख , जां’घ , स्त’ना खालील भाग. या ठिकाणी देखील प्रचंड आग आणि सूज असू शकते.

नायटा : या आजाराला ” रिंग वर्म इन्फेक्शन ” म्हणून सामान्यतः ओळखले जाते. यामध्ये त्वचेवर गोलसर चट्टे उठतात. ते कोरडे असतात. त्यांना खाज जास्त असते व पुढे ते पसरत जातात. गळू : याला ” बेंड ” या नावाने बरेच जण ओळखतात. यामध्ये त्वचेवर आधी पुरळ येतात. नंतर ते मोठे होऊन त्यामध्ये पु साठतो. हा भाग लाल होतो. तेथे सूज येते. खूप ठणका असतो. खूप वेदना जाणवतात. शरीरात खूप जास्त उष्णता निर्माण झाल्यास असे गळू निर्माण होतात.

यापैकी काहीही त्रास झाल्यास वेळेत योग्य ते उपचार सुरू करावेत, जेणेकरून त्वचेचे आजार वाढत नाहीत आणि पुन्हा पुन्हा त्यांचा उत्पन्न होणार नाहीत. परंतु आपल्याला उन्हाळा / त्वचेचे आजार सुकर व्हावा यासाठी काही सोपे उपाय योजना मात्र आपण सांगू शकतो ते पुढीलप्रमाणे..

हे वाचा:   अनेक लोकांनी तुरटीचे पाणी वापरले, त्यामुळे काय झाले बघा तुम्हीच.! शरीरात झाले असे काही बदल..! आता करत आहे...

१) शक्यतो सुती व सैल कपडे वापरावे. २) त्वचा नियमित कोरडी ठेवावी. ओलसरपणा येऊ नये याची काळजी घ्यावी. ३) कडुनिंबाची पाने गरम पाण्यात टाकून आंघोळ करावी. कडूनिंबाच्या पानांचा रस काढून तो त्वचेवर लावावा. हा रस दोन चमचे पिणे देखील उत्तम. ४) ज्यांना त्वचेचे आजार वारंवार होतात त्यांनी खारट – आंबट – तिखट हे पदार्थ खाण्यातून कमी करावेत. किंवा बंद करावेत.

५) उन्हाळ्यात येणारी सर्व रसदार फळे व नारळ पाणी नियमित घ्यावे. उसाचा रस , कोकम सरबत हे देखील उत्तम. ६) कोरफड : सहज मिळणारी वनस्पती. तितकीच गुणाची व उपयुक्त ठरते. कोरफडचा गर काढून आग होणाऱ्या किंवा खाज येणाऱ्या भागावर हळूहळू फिरवून लावावा. चेहऱ्यावर लावल्याने देखील चेहऱ्याची त्वचा सतेज होते. ७) बदाम तेल : त्वचेची कांती व तुकतुकीतपणा टिकून ठेवण्यास रोज बदाम तेल लावावे.

८) तुळस : अत्यंत बहुगुणी वनस्पती. त्वचेच्या कोणत्याही आजारात तुळशीच्या पानांचा रस काढून लावावा. ९) उन्हाचा संपर्क टाळावा. १०) नित्यनियमाने दोन्ही वेळेस स्नान करावे. आजचा खास घरगुती उपाय: दोन चमचे कापूर ची पावडर बनवून घ्या. त्यामध्ये दीड चमचा खोबऱ्याचे तेल घाला. यासोबत त्यामध्ये अर्धा चमचा शुद्ध हळद पावडर घाला. मिश्रण एकजीव करून घ्या.

हे वाचा:   चष्मा घालणारे लोक जरा इकडे लक्ष द्या.! किती दिवस चष्मा घालणार.? हा एक पदार्थ आजपासून खायला सुरुवात करा चष्मा काढून फेकावा लागेल.!

त्रास असणाऱ्या प्रमाणात या मिश्रणाचे प्रमाण देखील कमी जास्त करा. शरीराचा तो भाग कोमट पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडा करून त्यानंतर कापसाच्या मदतीने हे मिश्रण लावा. हा उपाय सलग किमान दोन आठवडे तरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक पडेल. या आजारांची लक्षणे कमी असताना, सांगितलेले उपाय केल्यास फायदा होतो. परंतु लक्षणे वाढल्यास मात्र कानाडोळा न करता वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घेणे जास्त योग्य ठरेल.

तेव्हा आपल्या त्वचेची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *