मित्रांनो आपल्या शरीरातील किडनी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास आपले शरीर अनेक आजारांचे घर बनते. आपल्या दैनंदिन बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला लक्षातही येत नाहीत अशा चुका आपण करत राहतो. याचा साहजिकच परिणाम आपल्या किडनीवर होतो. परिणामी आपले संतुलन बिघडते आपण आजारी पडतो. किडनी स्टोन ची समस्या उद्भवते जा मध्ये प्रचंड प्रमाणात वेदना होतात.
अनेक औषध उपचार प्रसंगी शस्त्रक्रिया देखील करावी लागते. भविष्यात होणारे हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास वर्तमानात काही चुकीच्या सवयींकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. आपल्यापैकी बर्याच जणांना लघवी रोखण्याची सवय असते. तुम्ही देखील असं करत असाल तर हे तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे. यामुळे स्टोनचा धोका वाढतो आणि किडनी लवकर खराब होते.
कमी प्रमाणात पाणी पिणे या सवयीमुळे देखील शरीरातील घाण बाहेर पडत नाही. परिणामी किडनी लवकर खराब होते. तसेच यामुळे मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होते. अतिप्रमाणात आयोडीन सोडीयम मीठ खाणे. यामुळे तुमचा रक्तदाब वाढून किडनी वर ताण येतो. आयडीयली, दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम खाऊ नये. अति प्रमाणात शीतपेये पिणे. पुरेशी वेळेत झोप न घेणे यामुळे देखील किडनी वर ताण येतो. नैसर्गिक प्रक्रिया मध्ये अडचण येते.
जास्त प्रमाणामध्ये मांसाहार केल्यामुळे मेटाबोलिजम वर ताण येतो. यामुळे पडलेला अतिरिक्त काम करावे लागते आणि ती खराब होण्याची शक्यता असते. तेव्हा अशा काही वाईट सवयी लवकरच सोडा. मुतखडा म्हणजे लघवी मध्ये वेगळ्या होणाऱ्या कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्साईलेट सारख्या क्षारांचं स्फटिक कणांपासून बनलेले खडक पदार्थ होय. यामुळे मूत्रविसर्जनात अडथळा येऊन पोटात कमालीचे दुखते.
अनेक वैद्य या प्रकारच्या आजारात निदानासाठी एक्स-रे अल्ट्रासाउंड सिटीस्कॅन देखील करायला सांगतात. अनेकदा अनुवंशिकता हे देखील याचे कारण असू शकते. काही उपाय : • याचं प्रमुख कारण पाणी कमी पिणे. यासाठी दिवसभरातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी सेवन करायचे उद्दिष्ट ठेवावे. सकाळी उठल्याबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे.
• टोमॅटो पालक दूध दुधाचे पदार्थ असे काही वर्ज केल्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. • जास्त कालावधीसाठी लघवी कधीही धरून ठेवू नका. यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता वाढते. • जिम अथवा जास्त ताकतीचे व्यायाम वर्ज्य करा. • विटामिन डी च्या स्त्रोताचा साठी नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर करावा. • मुतखड्याच्या आजारामध्ये सातो च्या पाण्याचा उपयोग अत्यंत फायदेशीर ठरतो. • जुनाट किडनी स्टोन चा प्रकारात होमिओपथी ठरते अत्यंत उपयुक्त.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.