बापरे! उवा? असं म्हटलं की लोकांच्या नजरा आपल्याकडे वळतात. उवा असल्यावर लोकांमध्ये जाणे सुद्धा आपण टाळतो. शिवाय त्या आरोग्याला घटक सुद्धा असतात. केसांत राहून त्या केसांना कमजोर बनवतात. केसांच्या मुळाशी राहून केस गळती चालू होते. तसेच आपल्या डोक्यातील रक्त शुद्ध ते शोषून घेतात. आणि यामुळे आपले केस खूप कमजोर होऊन गळतात.
अशा परिस्थितीत बर्याच मुली या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केसांची निगा राखणारी उत्पादने वापरतात. परंतु महागड्या आणि रसायनांनी भरलेल्या गोष्टी वापरण्याऐवजी तुम्ही हे उपाय करू शकता. म्हणूनच आज आपण यावर उपाय बघणार आहोत. खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर असते. या तेलाने मालिश केल्यास केसांची वाढ होऊन केस काळे होतात.
केसातील कोंडा देखील निघून जातो. म्हणूनच आपल्याला 2 चमचे खोबरेल तेल घेऊन त्यात एक चमचा ग्लिसरीन टाकायचे आहे आणि केसांना हळूवारपणे मालिश करायची आहे. केस खूप कोरडे असतात. विंचरल्यामुळे ते तुटतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता. यामुळे कोंडा तसेच केसातील घाण सुद्धा निघून जाते.
त्याचप्रकारे तुम्ही खोबरेल तेल आणि लिंबाचा रस सुद्धा एकत्र करून लावू शकता. लिंबाचा मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते. यामुळे केसांची वाढ होते आणि केसांना चमक येते. तसेच केसातील उवा सुद्धा निघून जातात. या उपायांसोबतच एक चांगला उपाय म्हणजे मेथीची पूड आणि दह्याचे मिश्रण. हे मिश्रण केसांना लावल्याने केसांना पोषण मिळते.
यामुळे केस स्वच्छ होतात. हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करतं. पूर्ण केसांवर हे दह्याचे मिश्रण लावून शॉवर कॅप लावून घ्या. 30 मिनिटाने केस धुऊन टाका. केसात जर काही जखम किंवा पुरळ असेल तर तो निघून जातो. आणि केस निरोगी राहतात. यामुळे केसांची वाढ नीट होते. तसेच, कडुनिंबाची पाने केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात.
ज्यांच्या केसात उवा असतात. त्यांनी ही पाने वाटून किंवा त्याचा रस काढून केसांना लावावा. कडुलिंबामध्ये औषधी गुणधर्मांव्यतिरिक्त अँटी-फंगल,अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म देखील आहेत. यामुळे केसातील कोंडा, डोक्यात येणारी खाज, अतिरिक्त तेल, गळणारे केस इत्यादी समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
यामुळे केसांवर नैसर्गिक चमक देखील येते. म्हणूनच उवा असणाऱ्यांनी केसांकडे दुर्लक्ष न करता हे उपाय करावेत. यामुळे केसांचे आरोग्य नीट राहील. केसांची वाढ होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.