पिंपल्स ची समस्या अनेक लोकांना निर्माण होताना दिसते. आपण पाहतो की अनेक लोक यामुळे त्रस्त आहेत. अनेक लोकांना वाटते की आपल्याला पिंपल्स नाही आले पाहिजे यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करून पाहतो. काही घरगुती उपाय करून पिंपल्स ची समस्या दूर केली जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला पिंपल्स कसे दूर करावे हे नाही तर पिंपल्स का येतात याबाबत माहिती देणार आहोत.
पिंपल्स येणे तशी साधारण समस्या आहे. पण यामुळे अनेक लोक त्रस्त होऊन बसतात कारण हे आपल्या सुंदरता च्या मध्ये येत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या सामान्यतः किशोरवयीन मुलांशी जोडली जाते. असे घडते कारण या वयात आपल्या शरीरात वेगाने हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे संप्रेरक पातळीच्या गडबडीमुळे त्वचेवर पिंपल्स वाढू लागतात.
जे सुरुवातीला लहान पुरळ किंवा फुगवटासारखे वाटते. चला तर मग पाहूया याचे काही कारणे. तेल आणि तूप याचे अती सेवन करणे. अनेक लोकांना कोणतीही गोष्ट अती सेवन करायची सवय असते. तूप तेल याचा दैनिदिन जीवनात कमी वापर करायला हवा. रोजच्या जेवणात तेल किंवा तूप जास्त प्रमाणात घेतल्याने देखील मुरुमांची समस्या नेहमीच उद्भवते. जर तुम्ही याचा वापर जास्त प्रमाणात करत असाल तर आजच हे सोडा.
दुग्ध उत्पादने: दुग्ध पदार्थांची चटक ही अनेक लोकांना असते. याचा आस्वाद आणेक मंडळी मोठ्या आवडीने घेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचे संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे, आहारात त्यांचे प्रमाण जास्त असल्याने मुरुमांची समस्या दिसून येते. तुम्ही याचे सेवन करू शकता परंतु प्रमाणात कुठली पण गोष्ट जर प्रमाणात सेवन केली तर याचा शरीरावर कमी इफेक्ट दिसून येतो.
मांसाहारी पदार्थ: नॉनव्हेज चे दिवाने मंडळी तुम्हाला भरपूर मिळतील. अनेक लोक नॉनव्हेज मोठ्या आवडीने खात असतात. काही लोक तर याचे अतिरिक्त सेवन करत असतात. मांसाहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण असते, परंतु जास्त मांसाहार केल्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे पोट साफ होत नाही आणि मुरुमांची समस्या तुम्हाला घेरते. त्यामुळे याचे सेवन प्रमाणात करायला हवे. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.
तं’बा’खू-सि’गा’रेट: अनेक लोकांना अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन करण्याची फारच वाईट सवय असते. या सवयी असेल तर कायमच्या बंद केल्या पाहिजे यामुळे शरीराचे भरपूर नुकसान होत असते. तं’बा’खूचे थेट सेवन किंवा सि’गा’रेट-बि’डी’चे सेवन केल्याने आरोग्यासोबतच त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे याचे सेवन करणे थेट बंद करून टाकावे. ही विनंती…!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.