या व्यक्तीने रोज रात्री झोपताना खाल्ल्या लसणाच्या दोन पाकळ्या.! त्यानंतर झाले असे काही.! वाचून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.!

आरोग्य

आज काल प्रगती व परिवर्तनाच्या आंधळ्या धावेत माणूस आजू बाजूचा परिसर प्रदूषित करत आहे. याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम हा मानवी शरीरावर दिसून येतो. आपल्याला दिर्घ आयुष्य हवे असेल तर शरीर निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे. आपल्या भारतीय स्वयंपाक घरात अशी एक गोष्ट आहे जी अनेक आजारांवर एक रामबाण उपाय मानली जाते. लसूण या भाजीला तुम्ही सगळे ओळखता.

मात्र हिचे अनेक फायदे आहेत ते खूप कमी लोकांना माहित असतील. म्हणूनच हा सदर लेख आम्ही घेवून आलो आहोत. चला तर जाणून घेवूया काय आहेत या लसणीचे फायदे. लसूण ही कांद्याच्या जातिमधीलच एक कंद मूळ आहे. झाडावर झुडपांवर अथवा वेलीवर न लागता ही जमिनीवर उगवली जाते. आयुर्वेदात लसणीला खूप मोठे स्थान दिले गेले आहे. लसूण हा जेवणाना फोडणी तडका देण्यासाठी वापरली जाते.

कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. जेवणात लसूण नसेल तर जेवण फीके वाटू लागते. चला आता जाणून घेवूया लसूण कच्ची खाल्यास याचे काय फायदे आपल्या शरीराला होतात. जर शरीरात एंजियोटेंसिन किंवा एसीई यापैकी कोणत्याही एका पदार्थाचे उत्पादन वाढले. तर र’क्तदाबाची समस्या निर्माण होते.

हे वाचा:   जेवण करत असताना 99% लोक करतात या चुका, शरीरात उतरले जाऊ शकते विष.!

अनेक कृत्रिम औषधे याला नियंत्रणात करण्यासाठी कार्य करतात परंतु या औषधांचे दुष्परिणाम देखील असतात. अश्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी लसणाचे सेवन उपयोगी ठरू शकते. उच्च रक्तदाब पीडित व्यक्तीला दररोज काही लसणाच्या पाकळ्या खायला द्याव्यात. जर लसणाच्या स्वाद आवडत नसेल तर तुम्ही लसणाला बारीक कुटून दुधासोबत घेऊ शकतात.

लसूण वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुणकारी ठरला आहे. यात असणारे अॅन्टी ओबेसिटी गुणधर्म लठ्ठपणा कमी करण्यात सहाय्यक असतात. याशिवाय लसणाच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे अनावश्यक चरबी बर्न होण्यात मदत मिळते. लसूण मध्ये असणारे गुणधर्म हृदयासाठी लाभकारी असतात. शास्त्रज्ञांनी मनुष्य आणि प्राण्यांवर केलेल्या शोधानुसार लक्षात आलेले आहे की लसणात काही खास तऱ्हेचे कार्डिओ प्रोटेक्टीव गुणधर्म असतात.

हे गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात. हृदय संबंधी समस्या असणाऱ्या लोकांनी दररोज सकाळी एक ते दोन बारीक केलेले लसुन खायला हवे. लसूण मध्ये अॅन्टी बायोटिक आणि अॅन्टी व्हायरल गुण असतात. सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांमध्ये लसूण एक अद्भुत उपचार आहे. शोधानुसार दररोज चार ते पाच लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप एक ते दोन दिवसात दूर होतो.

हे वाचा:   पोटात साठलेली जुनाट घाण, अशी बाहेर काढा.! कधीच पोट दुखणार नाही.! सतत पोट दुखते अशा लोकांनासाठी फारच कमालीचा उपाय.!

या सोबतच लसूण पचन शक्ती वाढवून पोटासंबंधी आजार दूर करतो. शरीरात असणाऱ्या घातक पदार्थांनाही नष्ट करतो. यासाठी लसणाच्या पाकळ्यांना बारीक करुन पाणी अथवा दुधात टाकून पिले जाऊ शकते. जुलाब झाला असल्यास लसूण खाल्याने नियंत्रणात येतो. जर छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर लसूण, आले, कांदा आणि हळद यांचे मिश्रण करून छातीवर लेप लावावा आणि या लेप वर कापड बांधून ठेवावा.

छातीत कफ होणे, श्वास घेण्यात अडचण येणे इत्यादी रोगांमध्ये हा उपाय अत्यंत उपयोगी आहे. डोके अथवा छाती दुखण्याची समस्या असल्यास लसणाच्या पाकळ्या दुखत असलेल्या जागी चोळाव्यात. असे केल्याने वेदना कमी होतात.अर्थात लसणाचे फायदे हे दुखणे दूर करण्यासाठी देखील उपयोगी आहेत. कोणत्या ही गोष्टीचे अती प्रमाण हे घातक असते. लसूण ही गुणकारी जरी असली तरी ही जास्त खावू नये अत्यंत गरम असल्या कारणाने याचे शरीरावर दुष्परिणाम देखील होवू शकतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.