मित्रांनो चांगले आरोग्य हा दीर्घ आयुष्याचा पाया मानला जातो. मानवाचे शरीर हे एक अत्यंत कठीण यंत्र आहे. आपण विज्ञानात एवढी प्रगती करुन देखील या शरीराची अनेक गुपिते अजून उलगडायची बाकी आहेत. आपण एका समाजात राहतो. चार चौघात आपल्याला मान- सन्मान दिला जातो. सगळ्यांमध्ये उठून व आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाल तुमचे शरीर बळकट व पीळदार असावे लागते.
काही लोकांना निसर्गाकडूनच ही देणगी मिळते परंतू अनेक असे देखील आहेत जे शरीराने कमकुवत असतात. आज काल आपले आयुष्य खूपच धाव पळीच झाले आहे. मानव हा फक्त जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल याचा विचार करत असतो व एका अर्थाने हे बरोबर देखील आहे .पैसा आता काळाची गरज बनला आहे. अश्या या व्यस्त जीवनात आता स्वतःसाठी मुळीच वेळ मिळत नाही.
अन्न ग्रहण करण्यासाठी देखील आता तुम्हाला कामातून वेळ हा काढावा लागतो. जगभरात बरीच लोकं हा बहुमुल्य वेळ वाचवण्यासाठी बाहेरचे अरबट-सरबट व लवकर तयार होणारे फास्टफूड खातात. परंतू नियमित या अन्नाचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही सुद्धा सुंदर, आकर्षक व बळकट शरीराची स्वप्ने पाहत असाल व किती ही मेहनत करुन तुमच्या हाती चांगले फळ लाभत नसेल.
या चिंतेने तुम्ही सगळा वेल त्रासलेले असता तर आता चिंता सोडून सुटकेचा निश्वास टाका. होय आज आम्ही आमच्या या लेखात तुम्ही कठोर मेहनत व परिश्रम करुन देखील तुमची तब्येत का होत नाही याची करणे घेवून आलो आहोत. होय या चूका तुम्ही तुमच्या दैनंदिनी करता व या सुधारल्यास तुम्हाला याचा फायदा मिळू लागेल. ही माहिती तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे त्यामुळे आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
अनेक जण आपल्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतात. रोज व्यायाम व कसरत करतात. हा गैरसमजच आहे कारण जर फक्त व्यायाम करुन शरीर बळकट तयार झाले असते तर मजूरी करणार्या लोकांची देखील चांगली तब्येत तयार झाली असती. परंतू व्यायामा सोबतच सोबतच चांगली फले चांगला आहार देखील ग्रहण करतात. होय जर तुमचा रोज खाल्ला जाणारा आहार हा पोषकतत्वांनी भरलेला नसेल तर त्याचा आपल्या शरीराला काडी मात्र फायदा होत नाही.
या उलट पित्त व अपचन शरीरात वाढू लागते. चला या विषयावर अगदी सुरवाती पासूनच माहिती घेवू. तुम्ही जे अन्न ग्रहण करता ते अन्ननलिके द्वारे तुमच्या पोटा पर्यंत पोहचते. छोटे व मोठ्या आतड्यात जाण्याआधी अन्न यकृतात जमा होते. यकृताचे आकार मान हे साधारण आपल्या झाकलेल्या मोठी एवढे असते. मात्र हे फ्लेक्सीबल असल्या कारणाने हे मोठे व छोटे होते. यात आपले अन्न जमा होते व यातील चांगला भाग शरीरात जातो व शरीरासाठी नको असलेला पुढे ढकलला जातो.
यकृतात एक वायू असतो जो आपले पोट भरल्यास ढेकरच्या स्वरूपात बाहेर पडतो. आता आपल्या पैकी अनेक जण हा ढेकर आला तरी ही जेवण थांबवत नाहीत ते जेवतच राहतात. मात्र असे वागणे हे पूर्ण अयोग्य आहे. ढेकर आल्यानंतर तुम्ही जे अन्न खाता ते अन्न यकृतात जास्त जागा व्यापते व जागा न मिळाल्यास यकृतात असणारे जेवण सडू लागते. पुढे याचा मल तयार होतो आणि याचा आपल्या शरीराला काही फायदा होत नाही.
तुम्ही पौष्टिक आहार खात असाल तरी ही तो एका प्रमाणाच्या बाहेर घेवू नये. तृप्तीचा ढेकर आल्यास जेवण थांबवावे असे केल्याने तुम्हाला तुमच्या अहरातील सर्व पोषकतत्वे मिळतील व तुमचे शरीर सुधृड व मजबूत बनू लागेल. काही दिवसातच तब्येत चांगली सुधारु लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.