अस्थमा चा त्रास कसा बरा केला जातो.? अस्थमा चा त्रास असेल हा उपाय तुम्हाला खूप कामी येईल.! प्रत्येकाने नक्की वाचा.!

आरोग्य

तुम्हाला कितीही जुना अ’स्थ’मा असेल तुम्हाला श्वासांमध्ये अडथळा निर्माण होत असेल तर आजचा आपला घरगुती उपाय त्यासाठीच असणार आहे. आता गरमीचे दिवस असल्यामुळे या त्रासांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे म्हणूनच आजचा आपला उपाय गरमीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या त्रासासाठीच आहे. चला तर मग जाणून घेऊया या घरगुती उपाय साठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला इथे लवंग घ्यायचे आहे. लवंग अ’स्थ’मा चा आजार असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे ओवा. ओवा देखील अ’स्थ’मा असलेल्या पेशंटसाठी अत्यंत उपयोगी आहे. आता तुम्ही विचार करत असाल कि लवंग आणि ओवा तर गरम आहे किंवा हे दोन्ही पदार्थ गरम असतात. या दोन्ही गोष्टी गरम जरी असल्या तरी त्यामधून बनलेला उपाय फायदेशीर आहे.

आता सर्वप्रथम आपल्याला एका पात्रांमध्ये एक ग्लास पाणी घेऊन गॅस वर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर पाच ते सात फुल आलेली लवंग यामध्ये टाकायची आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा देखील टाकायचा आहे. या दोन्ही गोष्टी पाण्यामध्ये टाकल्यानंतर आता हे मिश्रण पाच ते सहा मिनिटांसाठी मंद आचेवर शिजू द्यायचे आहे.

हे वाचा:   खूप वर्षापासून होते फंगल इन्फेक्शन पण या सोप्या उपायाने दोन दिवसात पूर्णपणे गायब झाले.! फंगल इन्फेक्शन वर सर्वात साधा सोपा उपाय.!

मंद आचेवर यासाठी उकळवून घ्यायचे आहे ज्यामुळे लवंग आणि ओव्यांमध्ये असलेले औषधी गुणधर्म आणि इसेन्शीअल ऑइल या पाण्यामध्ये उतरतील. हे पाणी उकळत असताना तुम्ही तिथे उभे राहून त्याची वाफ देखील घेऊ शकता. यामुळे बंद असलेले नाक आतून उघडण्यास मदत होईल. आता पाच मिनिटानंतर गॅस बंद करून गरम झालेला काढा आपल्याला एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचा आहे. हा काढा आपल्याला फक्त अर्धा ग्लास भरुनच याचे सेवन करायचे आहे.

यामुळे बंद नाक उघडायला मदत होते त्याच बरोबर छातीमध्ये दुखणे, दडपण येणे असे सर्व त्रास नाहीसे होतात. त्याचबरोबर ज्यांना जास्त प्रमाणात कफ झाला असेल तर त्यांनी या काढा चे सेवन एक चमचा मध टाकून करायचे आहे. आता आपल्याला दुसरा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम दोन लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत. ज्यांना असे वाटत असेल की ओवा आणि लवंग खूप गरम आहेत आणि गरमीच्या दिवसांमध्ये त्यांचे सेवन नाही केले पाहिजे त्यांच्यासाठी हा दुसरा उपाय आहे.

त्यामुळे इथे दोन लसूण पाकळ्या घेऊन त्या ठेचुन घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक ग्लास दूध गॅसवर एका पात्रांमध्ये गरम करायला ठेवायचे आहे आणि या दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकून चार मिनिटे उकळवून घ्यायचे आहे. दूध चांगल्या प्रकारे उकळवून झाल्यानंतर थोडे थंड झाल्यावर या दुधाचे सेवन कराईचे. आपल्याला या दुधामध्ये गोड टाकायचे असेल तर इथे खडीसाखरेचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   सदा दुखणे येत असेल किंवा पोटात दुखत असेल तर अशा वेळी करायचे हे एक काम.! एका पाकळी लसणाची किमया आज नक्की बघा.!

हे दूध सकाळच्या वेळी आपल्याला प्यायचे आहे. या दुधाचे सेवन संध्याकाळच्या वेळी देखील आपण करू शकतो. यानंतर तिसरा उपाय हा आहे आपल्याला रात्रभर दोन अंजीर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी भिजलेले अंजीर आणि त्यासोबत ते पाणी देखील आपल्याला प्यायचे आहे. या उपायांमुळे देखील तुम्हाला बराच फरक दिसून येईल.

आपण बनवलेल्या औषधी उपायांमध्ये वापरलेल्या सर्व गोष्टी घरगुती असल्यामुळे रोजच्या वापरातील असल्यामुळे यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *