फक्त एक लिंबू तुमच्या चेहऱ्यावरच्या मातीला असे काढून टाकेल.! त्यासाठी लिंबाच्या अर्ध्या फाकेवर टाका हे तीन पदार्थ आणि मग लावा चेहऱ्याला.!

आरोग्य

पुरुष असो अथवा महिला प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा हा सुंदर दिसावा असे वाटत असते. आजकाल वाढते धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर त्वचेवर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात आपल्यापैकी अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर ऍलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

निस्तेज त्वचा, डाग-धब्बे घालण्यासाठी काही घरगुती, सोप्या उपायांचाही फायदा होतो. पाहुयात काही टिप्स आणि घरगुती उपाय. एका रात्रीत काही जादू होत नाही. भविष्यात तुमची स्किन क्लीन क्लिअर होईल ते फक्त आणि फक्त घरगुती किचन मधील साहित्यामुळे. आयुर्वेदिक उपचार हे खूप उपयुक्त ठरतात. रिझल्ट उशिरा मिळतात पण कायमस्वरूपी त्यातून सुटका मिळते. काही लोकांना दीड महिना लागतो.

तुम्हाला ह्यापेक्षा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो. पण नक्‍की प्रयत्न करून पाहा. यासोबत जीतके नैसर्गिक राहता येईल तेवढे नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न करावा. नेहमी आनंदी आणि उत्साही राहावे. केसात कोंडा होऊ देऊ नये. सगळ्यात आधी आपल्या त्वचेचा पोत ओळखा. व भरपूर पाणी प्यावे (शक्यतो तांब भांड्यातील प्यावे.) पुरेशी झोप घ्यावी. आठवड्यातून एकदा बेडशीट, उशिंचे अभ्रे बदलावेत.

हे वाचा:   फक्त एक चमचाभर घेऊन कोपऱ्यात ठेवा पाली जमा होऊ लागतील.! आयुष्यात पुन्हा घरात पाली दिसणार नाही.! एकदा करून बघावा हा घरगुती जुगाड.!

फेस पॅक लावत असाल तर ओरिजनल चंदन काठी मिळते ती पाण्यात उगळून लावावे. अंघोळ करताना तोंड हे गरम पाण्याने धुवून मग तुम्ही मासुरीचे पीठ किंवा जे चंदन साबण असतात ते लावावे आणि तोंड धुवून पुन्हा लगेच गार पाण्याने तोंड धुवावे. सकाळी उठल्या उठल्या बडीसोपची 2 चमचे पावडर कोमट पाण्यातून पिणे. सगळ्यात महत्त्वाचे पिंपल्स आल्यावर फोडू नका.

आज आम्ही तुम्हाला जो उपाय सुचवणार आहोत यात लागणार आहे हळद, गुलाबपाणी आणि लिंबू. तीनही गोष्टी हर्बल आहेत. हळद पावडर चांगल्या प्रतीची घ्यावी. एका वाटीत एक चमचा हळद पावडर घ्या. दोन चमचे गुलाबपाणी यात घाला. मिश्रण एकत्र करा. एक लींबू अर्धे करून घ्या. बिया काढून घ्या. अर्धे लींबू या मिश्रणात बुडवून चेहऱ्यावर लिंबाच्याच मदतीने गोल गोल करत लावावे.

हे वाचा:   एकदा उपाय केल्यावर चेहऱ्यावर मरेपर्यंत केस उगणार नाही, छोटासा उपाय देईल मोठा फायदा.!

पाच मिनिटांनी फक्त पाण्याने चेहरा धुऊन टाका. तुम्हाला मिळेल सुंदर त्वचा…! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.