आज पासून तुम्ही कांद्याचे व लसणाचे टरफले फेकून देणार नाहीत, याचे फायदे ऐकून प्रत्येक जण हैराण होतोय.!

आरोग्य

तुम्हाला जर असे विचारले की तुम्ही स्वयंपाक करताना जो लसुन किंवा कांदा वापरता त्यावरील असलेले आवरण म्हणजेच टरफले काय करता? सहाजिकच आहे की कांदा व लसुन याच्या टरकला चा काय उपयोग असू शकतो असे आपल्याला वाटणार. परंतु तुम्ही हे जाणून चकित व्हाल की याचा देखील भरपूर उपयोग होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखामध्ये याविषयी माहिती पाहूया.

तुम्ही जर ही माहिती वाचली तर यापुढे तुम्ही कधीही अशा प्रकारचे टरफले फेकून देणार नाहीत हे मात्र नक्की. जर तुम्ही कधी खिचडी किंवा बिर्याणी वगैरे बनवत असाल तर अशावेळी लसुन तर टाकतच असणार. परंतु लसुन टाकताना जर न सोलता लसुन टाकला तर यामुळे बनलेला भात खूपच सुंदर लागत असतो याची चव देखील आणखी वाढत असते. जर तुम्हाला स्वयंपाकामध्ये उत्तम चव हवी असेल तर मसाले भात बनवत असताना लसूण न सोडता त्याच्या पाकळ्या सहित टाकावा.

हे वाचा:   दाताची ठणक कायमची गायब.! एक चिमूट तुमचे दात दुखी थांबवू शकते.! एकदा नक्की वाचा.!

तुम्हाला एखादे आरोग्यदायी सूप बनवायचे असेल तर अशावेळी पाण्यामध्ये लसून व कांदा याचे टरफले टाकावे व याला उकळून घ्यावे. उकळल्यानंतर याला काही वेळा पर्यंत थंड होऊ द्यावे. चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतर एका गाळणी च्या साह्याने हे सूप गाळून घ्यावे. गाळलेले हे सूप प्यावे याचे शरीराला भरपूर असे फायदे मिळत असतात. यामुळे शरीराला अनेक पोषकतत्व मिळत असतात.

लसूण व कांदा यांच्या टरफलांना तुम्ही एकत्र केले व त्याची पावडर बनवून घरात ठेवली. व जेव्हा तुम्ही जेवण बनवत असाल तेव्हा ही पावडर त्यामध्ये थोडीशी टाकली तर यामुळे जेवणाचा स्वाद हा आणखी वाढला जातो. अनेक लोक सलाद देखील खात असतात. सलादवर जर ही पावडर टाकून याचे सेवन केले तर यामुळे त्याची चव आणखी वाढली जाते.

हे वाचा:   घरात एक पण उंदीर, घुस राहणार नाही, एक रुपयाची वस्तू करेल कमाल.!

कांद्यामध्ये सल्फर असते चे केसांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. यामुळे केसांना भरपूर असा फायदा होत असतो. केस गळती होणे, केसात कोंडा होणे अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर कांद्याची टरफले यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. काही कांद्याचे टरफले एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये साधारणतः चार ते पाच कप पाणी टाकावे व याला चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे. आंघोळी दरम्यान हे पाणी तुम्ही केसांना लावले तर यामुळे केस आणखी सुंदर बनत असतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *