प्रत्येक महिन्याला कापावे लागतील इतके केस वाढतील.! लांबसडक केस बनवण्याचा इतका सोपा आहे फॉर्म्युला.!

आरोग्य

 

केस गळती, कोंडा अशा अनेक समस्या प्रत्येकालाच भेडसावत आहेत. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. आणि अगदी कमी वयातच आपले केस गळू लागतात.

या नंतर आपल्यापैकी अनेक जणांना केस गळती च्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत आहोत. महागड्या वस्तू वापरत आहोत पण त्याने देखील आपल्या या समस्या काही दूर होत नाही त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय असा एक हेअर मास्क तयार करणार आहोत, ज्यामुळे आपले केस गळतीचे प्रमाण अत्यंत कमी होईल आणि तुमचे केस कधीही गळणार नाहीत.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. आपण अनेकदा असे ऐकले आहे की, मेथी आपल्यासाठी म्हणजेच आपल्या केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये देखील मेथीचा वापर केला जातो कारण मेथी आपल्या केसांसाठी औषधी आहे. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम येथे मेथीचा वापर करायचा आहे. आपण येथे मेथीचा वापर करत असताना मेथी आपल्याला भिजवून हा उपाय करायचा आहे.

म्हणजेच तुमच्या केसांप्रमाणे जर तुमचे केस भरपूर मोठे असतील तर दोन वाटी मेथी भिजत घालायची आहे. जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्हाला फक्त एक वाटी मेथी रात्रभर भिजवून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या भिजलेल्या मेथीचा वापर आपल्याला करायचा आहे. मेथी जेवढी भिजून वापरली जाईल तेवढीच ती आपल्या केसांसाठी उपयोगी आणि गुणकारी ठरणार आहे त्यामुळे आपल्याला मेथीचा वापर भिजून करायचा आहे.

हे वाचा:   अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त एवढे एक काम करा, पितृदोष मधून कायमचे मुक्त व्हाल, घरामध्ये सुरू असलेले भां'डण कि'रकिर होईल लगेच बंद...!

जर तुम्ही रात्री झोपतानाही मेथी भिजत टाकत असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तिचा वापर करू शकता कमीत कमी सात ते आठ तास तुम्हाला या मेथीला पूर्णपणे द्यायचे आहे. आता आपल्याला भिजवून घेतलेली मेथी मिक्सर च्या द्वारे बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट अगदी पातळ किंवा अगदी जाड ठेवायची नाही आहे. आपल्याला मीडियम बारिक करून घ्यायची आहे.

आता तयार झालेल्या पेस्ट ला देखील आपण गाळणीच्या मदतीने व्यवस्थित रित्या गाळून किंवा त्यामधून ती पेस्ट गाळून त्याचा भरपूर बारीक आणि सॉफ्ट अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून केसांमध्ये लावल्यानंतर ती धुतल्यानंतर त्यामधील बारीक कण आपल्या केसांमध्ये न राहता धुतल्यावर व्यवस्थित रित्या आपले केस साफ होण्यास मदत होईल. आता आता या बारीक गाळून घेतलेल्या पेस्ट मध्ये एक चमचा एलोवेरा जेल टाकायचे आहे केसांसाठी भरपूर उपयोगी ठरते.

त्यानंतर यामध्ये एक चमचा एरंडेल चे तेल टाकायचे आहे. आपण अनेकदा ऐकले असेल की, केसांसाठी अत्यंत गुणकारी एरंडेल तेल असते. त्यामुळे एक चमचा तेल आपल्याला इथे या पेस्टमध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये एक-दोन चमचा कांद्याचा रस देखील टाकायचा आहे. एक छोटा कांदा कापून घेऊन त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एक ते दोन चमचे कांद्याचा रस आपल्याला या पेस्ट मध्ये टाकायचा आहे आणि ही पेस्ट व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   फक्त एक तुकडा असा वापरा, जुलाब चा त्रास कधीच होणार नाही.!

आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण आपल्या केसांच्या मुळांवर लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला अजून गुणकारी पेस्ट बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही अंडे देखील टाकू शकता. आता पूर्णपणे हे हेअर मास केसांवर लावून झाल्यानंतर कमीत कमी एक ते दीड तास या हेअर मास्क ला केसांवर राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर एकदम माइल्ड शाम्पूने केसांना धुऊन घ्यायचे आहे. या उपायाचा एक ते दोन वापर यांमध्ये तुमच्या केस गळती मध्ये झालेला फरक दिसून येईल.

आपल्या केसांना योग्य ते पोषक तत्वे दिले नाहीत तर आपल्या केसांमधल्या समस्या वाढू लागतात त्यामुळे आज आपण हे सगळे गुणकारी पदार्थ या पेस्टमध्ये वापरलेले आहेत. जर तुम्हाला केसांमध्ये कोंडाची देखील समस्या असे तरी देखील तुम्ही अजून एक उपाय बनवून तो देखील वापरू शकता. टाळूच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा न झाल्यास कोंड्यासह अन्य समस्या उद्भवतात.

केसांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याच्या रसाचा समावेश करून पाहावा. आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस घ्यावा. यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळूसह संपूर्ण केसांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढ देखील चांगली होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *