कॉफी पावडर मध्ये ही एक वस्तू मिसळून हाता पायांना लावा.! वर्षानुवर्षीची सासलेली माती एका मिनिटात दूर होईल.!

आरोग्य

आपण सुंदर दिसावे म्हणून अनेक विविध प्रकारची उत्पादने आपल्या चेहर्यावर वापरत असतो. चेहरा गोरा व चमकदार असला तरी शरीराच्या इतर अवयवांची त्वचा काळपत असेल तर आपल्या सुंदरतेच्या रंगात भंग पडतो. मित्रांनो आपण पाहतो अनेक लोक खूप सुंदर व आकर्षक दिसतात परंतू त्यांच्या हाता व पायांची त्वचा निस्तेज व काळी पडलेली असते. अशी त्वचा होण्या मागचे कारण म्हणजे वातावरणातील धूळ व या अवयवांची नीट निगा न राखणे.

आपल्या परिसरातील अनेक युवक मंडळी आता या काळपत भागांच्या समस्येने त्रस्त झाली आहे. बाजारात मिळ्णार्या कृत्रिम क्रीम व लोशन वापरुन तुम्ही तुमच्या त्वचेला इजा करत आहात. या उत्पादनां मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल रसायने मिसळली जातात. यांच्या वापराने तुम्ही तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग कायमचा गमावून बसाल. मात्र आता चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे.

आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी काळपत पडलेले भाग पुन्हा सुंदर व गोरेपान बनवण्याचा एक रामबाण उपाय सांगणार आहोत. होय हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला कुठे ही जाण्याची आवश्यकता नाही आहे. स्वयंपाक घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता. सोबतच शरीरासाठी हा उपाय निर्धोक आहे. चला आता विलंब न लावता पाहूया हा उपाय.

हे वाचा:   वजन कमी करण्यासाठी जास्त काही करावे लागत नाही.! फक्त या तीन पदार्थांची असते गरज.! या उपायाने अनेकांनी केले आहे आपले वजन कमी.!

मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे ती म्हणजे बटाट्याच्या एका नगाची. बटाटा खाणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. बटाट्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने व शरीर उपयुक्त घटक असतात. याच एका बटाट्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व किसणीच्या मदतीने याचा बारीक किसा आता याचा रस काढून एका भांड्यात घ्या. टोमॅटॉला तर तुम्ही सर्वच ओळखत असाल.

चवीला ही फळभाजी अत्यंत रुचकर लागते. टोमॅटॉचे सेवन केल्यास शरीरात रक्ताची वाढ होते व रक्त शुद्ध देखील होते. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यसाठी टोमॅटॉ उपयुक्त मानला जातो. स्वच्छ पाण्याने धुवून या टोमॅटॉचा मिक्सरमध्ये फिरवून बारीक रस करुन घ्यायचा आहे. आता बटाट्याचा रस व टोमॅटॉचा रस यांना एकत्र का भांड्यात करुन निट हलवून मिक्स करा.

आता यात आपला या उपायासाठी तीसरा घटक घाला. या उपायासाठी लागणारा तीसरा घटक आहे कॉफीची पावडर. शरीरावरचा चिकट मळ काढण्यासाठी ही कॉफीची पावडर खूपच असरदार आहे. दहा ग्राम एवढ्या मात्रेत या पावडरचा वापर तुम्ही या उपायासाठी करु शकता. मात्र हा उपाय तुम्ही फक्त शरीरावरच्या त्वचेसाठी करु शकता. चेहर्यावर याचा वापर करु नये.

हे वाचा:   सलग २१ दिवस अशा प्रकारे पाणी पिऊन बघा.! शरीरात येईल अशी जागृती.! शरीर होईल रोग मुक्त.! जाणून घ्या किती, कसे आणि कधी पाणी प्यावे.!

या नंतर बाजारात मिळणारे कोणते ही नैसर्गिक पील ऑफ मास्क घ्या आणि या मिश्रणात टाका. पील ऑफ मास्क शरीरावरचा सर्व मळ खेचून काढते म्हणून तीस ते चाळीस ग्राम एवढ्या प्रमाणात ही क्रीम या उपायासाठी वापरायची आहे. आता बटाट्याचा रस, टोमॅटॉचा रस, कॉफीची पावडर व पील ऑफ मास्क या सर्व घटकांना एका पात्रात नीट एकत्र करुन घ्या. आपल्या शरीराची जी त्वचा काळपत पडली आहे त्यावर हे लावा व हे असेच अर्धा तास ठेवून द्या.

सुकले की याचा एक मास्क तयार होईल तो अलगद त्वचे पासून वेगळा करा. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोनदा करायचा आहे. दोन आठवड्यातच तुम्हाला याचा सकारात्मक प्रतिसाद जाणवू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.