तुळस भारतीय घरातील एक महत्त्वाचे व धार्मिक सोबतच औषधी गुणधर्म लाभलेले पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळतं. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. तुळशीचं बी म्हणजेच सब्जा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते.
सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. अनेक त्रासातून मुक्तता करण्याचे काम हा सब्जा करतो. चला या लेखात पाहूया सब्जा वापरून तुम्ही शरीरातील अनेक व्याधींचे निवारण कश्या प्रकारे करू शकता. ही माहिती तुमच्या करिता खूप महत्त्वाची ठरू शकते म्हणून सदर लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.
आज काल लोक घरच्या पोषक आहारापेक्षा बाहेरचे तिखट तेलात तयार झालेले अरबट सरबट पदार्थ जास्त सेवन करतात आणि या मुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यास सुरुवात होते. मात्र या समस्येवर सब्जा अत्यंत गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो.
सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. मित्रांनो या सोबतच या उपायाने पोटातील जळजळ, पित्त देखील कमी करण्यासही मदत होते. आपल्या परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. त्वचा ड्राय व निर्जीव होत चालली आहे आणि या मुळे तुमच्या सौंदर्यात थोडा कमी पणा येवू लागला आहे. बाजारातील कृत्रिम उत्पादने वापरून देखील या वर उपाय मिळत नसल्यास चिंतित आहात तर आता सुटकेचा निश्वास घ्या.
हा सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. त्वचेचे गेलेले तेज पुन्हा परत येईल. शरीरावरच्या काळपट डागा वर देखील हा उपाय फायदेशीर ठरेल. प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. वया आधीच केस सफेद होवू लागतात. सोबतच केस पातळ व केस गळती सारख्या समस्या आता आपल्या परिसरात वाढत चालल्या आहेत.
रासायनिक केमिकल्स वापरून तयार केलेली उत्पादने वापरणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र सब्जा बियाणे वापरुन तुम्ही तुमच्या केसांना नैसर्गिक जीवन प्रदान करू शकता. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो.
सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात पित्त कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते. उन्हातून लोकांना तोंड येण्याची व तोंडात फोडी येण्याची समस्या जास्त त्रास देते. या मुळे नीट काही खाता व पिता ही येत नाही.
अश्या वेली तुम्ही सब्जा बियाण्यांची मदतीने ही तक्रार दूर करू शकता. या साठी सब्जा बियाणांना एक तांब्यात भिजण्यासाठी ठेवा आता दोन ते तीन तासानंतर हे पाणी गाळणीने गाळून मग प्या असे दोन दिवस करा तोंडाच्या असणार्या सर्व समस्या अगदी समूळ नष्ट होतील. सांधेदुखी व मणक्याचे दुखणे या वर देखील हे सब्जा पाणी खूपच फायदेशीर आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.