एकाच कारल्याने कितीही जुनाट गजकर्ण, खाज, नायटा दूर होऊ शकतो.! कारल्याचे अनेकांना केले आहे बरे.! असे लोकांचा कधीच होणार नाही बरा.!

आरोग्य

त्वचा विकार हा असा विकार आहे जो एकदा वाढत गेला की वाढत जात असतो. सध्याच्या काळामध्ये त्वचाविकार खूपच जास्त प्रमाणात वाढू लागले आहेत. त्वचा विकार होण्याचे अनेक कारणे सांगितले जातात. खूप जास्त घाम येणे, एखाद्या त्वचा विकार असणाऱ्या व्यक्तीस च्या संपर्कात येणे, हा संक्रमण जन्य रोग आहे, त्वचाविकार झाल्यानंतर माणसाला काही सुचत नसते.

अतिशय भयंकर अशी खाज यातून येत असते. अशा वेळी नेमके काय करायला हवे हे आपल्याला सुचत नसते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही केला तर कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर होईल. अतिशय सोपा असलेला हा उपाय तुम्ही सहज पणे घरी करू शकता.

तुमचे गजकर्ण, खरूज, नायटा कितीही जुनाट असू द्या यापुढे अजिबात टिकू शकणार नाही. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय. बाजारांमध्ये गजकर्ण तसेच इतर त्वचा विकार यावर वेगवेगळ्या क्रीम उपलब्ध आहेत. परंतु या क्रीमने काही काळापर्यंत हे गायब होते परंतु ते पुन्हा येत असते.

हे वाचा:   लाखोच्या किमतीच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती, आरोग्यासाठी आहे विशेष फायदे.!

याला कायमचे घालवण्यासाठी हा उपाय नक्की करून बघावा. आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लागणार आहे कारले. सर्वप्रथम काढले स्वच्छ धुऊन काढावे. त्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे. त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने याला बारीक करून घ्यावे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी कापूरची देखील आवश्यकता भासणार आहे. कापूर मध्ये फंगल एक्सीडेंट असे गुणधर्म असतात.

यामुळे कुठल्याही प्रकारचा त्वचारोग बरा केला जाऊ शकतो. आपल्याला दोन ते तीन कापूर चे तुकडे घेऊन त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आपल्या घरांमध्ये सहजपणे उपलब्ध असलेले नारळाचे तेल आपल्याला लागणार आहे. नारळाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन असते जे आपल्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त मानले जाते.

तर सर्वप्रथम एका वाटीमध्ये कापूर ची पावडर घ्यावी. त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल टाकावे. यामध्ये अर्धा कप कारल्याचा रस टाकावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण तुमच्या त्वचा विकाराच्या जागेवर लावावे व सकाळच्या वेळी आंघोळी करत असताना चांगल्या प्रकारे धुऊन काढावे. असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुमची त्वचा पूर्णपणे चांगली होईल व त्वचाविकाराच्या या समस्येपासून सुटका मिळेल.

हे वाचा:   आंबे खाऊन कोय फेकून देणाऱ्यांनो, एकदा हे नक्की वाचा, वाचल्यानंतर एकही कोय फेकून देणार नाहीत...!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.