दाढी आणि मिशा मुळे आपला लूक हा खूपच सुंदर दिसत असतो. पुरुष लोकांना तर ह्या लूक मुळे खूप कॉन्फिडन्स येत असतो. परंतु सध्या चुकीच्या खानपानामुळे किंवा चुकीच्या जीवन शैली मुळे वयाच्या खूप लवकर केस सफेद होण्याची समस्या वाढत आहे. अशा वेळी आपण खूप चिंता करत असतो. केस पांढरे पडण्याचे कारण बदलती जीवनशैली आहेच कारण अनेक कारणे यातच दडलेली आहेत.
जसे की टेन्शन घेणे, सतत ताण तणावात राहणे, चुकीचा आहार घेणे, व्यसन करणे अशी एक ना अनेक कारणे केस पांढरे होण्याला कारणीभूत असू शकतात. त्यासोबतच तणाव, चुकीचं खाणं-पिणं, आजारी असणे आणि वृद्धापकाळ यानेही केस पांढरे होतात. वयानुसार पुरुषांच्या दाढीचे आणि मिशीचे केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे हे केस पांढरे करण्यासाठी लोक वेगवेगळे डाय वापरतात. पण तरीही अनेकांना पांढऱ्या केसांपासून सुटका मिळत नाही.
पण बाजारातील महागड्या उत्पादनांवर खर्च न करता काही घरगुती उपायांच्या मदतीने हे पांढरे केस काळे करता येऊ शकतात. आपण आज जाणून घेणार आहोत असेच काही घरगुती उपाय. वाढत्या वयासोबत शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागलं त्याच कारणाने मिशी आणि दाढीचे केस पांढरे होतात. मेलेनिन एक असा घटक आहे जो त्वचेचा रंग आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यात मदत करतो.
पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांना काळे करण्याचे खास उपाय सांगणार आहोत. हे उपाय तुम्हाला खूप लाभ मिळवून देऊ शकतात. या उपायांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत त्यामुळे तुम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे व्यासलीन.
आपण हे थंडी मध्ये त्वचेला लावतो. पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलिन जवळजवळ प्रत्येक घरात वापरलं जात आणि जास्तकरून आपण याचा वापर थंडीत ओठ फुटल्यावर करतो. पण खूप कमी जणांना माहीत असेल की, याचा उपयोग तुम्ही अजूनही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता. म्हणूनच आपल्याला एक चमचा व्यासलीन घेऊन त्यात एक चमचा खोबरेल तेल मिक्स करायचे आहे. हे व्यवस्थित मिक्स करून त्यात एक चमचा चारकोल पावडर टाकायची आहे.
हे एकत्र करून थोडा वेळ ठेवायचे आहे. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्या बोटांनी दाढीच्या केसांना लावायचे आहे. हे लावल्यानंतर थोडा वेळ ते तसेच ठेवायचे आहे. आणि 10 ते 20 मिनिटांनी ते धुवून टाकावे. याचा परिणाम तुम्हाला लगेचच समजेल. आणि केस काळे होतील. तसेच, दोन चमचे कांद्याच्या रसात पुदीन्याची पाने मिश्रित करु दाढी आणि मिशीच्या केसांवर लावा. यानेही केस काळे राहण्यास मदत होईल.
आवळ्याचं पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करुन उकळून घ्या. हे तेल थंड करुन रोज दाढीच्या केसांची मालिश करा. यानेही पांढरे केस दूर होतील. हळू हळू केस काळे होण्यास मदत होईल. गायीचं तूपही दाढीचे केस काळे ठेवण्यात मदत करतं. गायीच्या तूपाने रोज दाढीच्या केसांची मालिश केल्यास केसांचा काळा रंग कायम राहतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.