चेहऱ्यावरील नको असलेले केस कायमचे घालवण्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून बघा, खुपच सोपा उपाय आहे, घरगुती पद्धतीने अगदी सहजपणे केला जाऊ शकतो.!

आरोग्य

बदलती जीवनशैली व आरामाचे राहणीमान यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोन्स संतुलन बिघडत चालले आहे, याचे परिणाम म्हणजे अंगावरती जास्त प्रमाणामध्ये केस येणे. आजकाल बऱ्याच मुलींना व महिलांना हार्मोनल इम्बॅलन्समुळे चेहऱ्यावर व शरीरावर अनावश्यक केस येताना दिसत आहेत. यामुळे महिलांचा व मुलींचा कॉन्फिडन्स कमी होतो व स्वत:बद्दल कमीपणा वाटू लागतो.

या अनावश्यक केसांना घालवण्याकरता अनेक उपाय केले जातात. मात्र या उपायांनी केस कायमचे जायचे बंद होते असे नाही. हे उपाय तात्पुरत्या स्वरूपातील असतात. काही दिवसानंतर काढलेले केस जसेच्या तसे उगवतात. बाजारामध्ये मिळणाऱ्या हेअर रिमूवर क्रीम्स, साबण, स्प्रे वापरला तर केस तात्पुरत्या स्वरूपात जातात मात्र पंधरा-वीस दिवसांनंतर परत केस तसेच दिसू लागतात. तसेच या केमिकल प्रोडक्टसवर हजारो रुपये खर्च करावे लागतात.

ब्युटी पार्लरच्या व लेसर थेरपीच्या महागड्यस ट्रीटमेंटमध्ये काही हजार रुपये देखील या गोष्टींकरता खर्च करावे लागतात. ज्यामध्ये पैसा व वेळ दोघेही वाया जातात. मात्र गुण येत नाही, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग अशाप्रकारच्या ब्युटी पार्लरच्या ट्रीटमेंटमध्ये त्वचेचे नुकसान होते. तसेच त्वचा लाल होणे, त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे चेहऱ्यावर दाणे बनणे अशा प्रकारच्या समस्या देखील निर्माण होतात. तसेच काही काळानंतर स्किन लूज होते व चेहरा काळवंडतो.

हे वाचा:   जे लोक दररोज सकाळी बदाम खात होते त्यांच्यात दिसून आला हा बदल.! कुठलाही आजार एका झटक्यात संपेल.!

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे शरीरावरील अनावश्यक केस मुळापासुन काढण्याकरता अगदी सोप्पस घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनावश्यक केसांपासून सुटका मिळू शकते. चला तर जाणून घेऊया काय आहे तो उपाय.?

अनेक वेळा लोक म्हणतात की टूथपेस्टच्या मदतीने आपण अंगावरील केस काढू शकतो! मात्र टूथपेस्टच्या मदतीने खरच अंगावरील केस निघू शकतात का?असे असेल तर ते कसे वापरावे? याबद्दल अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात! आज आम्ही आपल्याला त्याबद्दलच सांगणार आहोत.

सर्वात अगोदर टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा एका प्लास्टिकच्या वाटीमध्ये मिक्स करा व त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी टाका. ही पेस्ट चांगली एकत्र मिसळून घ्या. बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स होईपर्यंत चांगले ढवळून घ्या.

हे वाचा:   छाती मध्ये कफ, होऊ शकतो श्वसना संबंधीचा त्रास, एक तुकडा छातीतला सर्व कफ रात्रीतून होईल गायब...!

सर्वात अगोदर आपण मानेजवळ किंवा कानाच्या मागे थोड्याशा प्रमाणामध्ये हे मिश्रण लावून टेस्ट करून घ्या की आपल्या स्किनला हे सहन होत आहे की नाही? यानंतर हे मिश्रण ज्या ठिकाणी आपल्याला केस काढायचे आहे त्या ठिकाणी लावावे जवळपास पंधरा मिनिटानंतर हे मिश्रण सुकल्यावर आपले हात, पाय धुऊन घ्या.

असे करत राहिल्यावर त्या ठिकाणी केस येण्याचे हळूहळू बंद होईल व केसांची मुळे मरुन जातील ज्यामुळे तेथील त्वचा कोमल आणि सुंदर दिसू लागेल. जर आपल्याला ही अंगावर व चेहर्‍यावर अनावश्यक केसांची समस्या जाणवत असेल तर आपण देखील हा उपाय करुन याचा लाभ घ्या.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *