लसूण आपण जेवणात दररोज वापरत असाल यात काही शंका नाही.! पण लसूण खरंच चांगला आहे का म्हणजे आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत का? मित्रांनो वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला होणे ही सध्याची अगदी कॉमन समस्या आहे. खोकला काही वेळेला कफ झाल्यामुळे झालेला असू शकतो तर काही वेळा नुसताच कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला होण्याचे प्रमुख कारण घशात किंवा फुफ्फुसांमध्ये होणारे इन्फेक्शन हे असते.
फुफ्फुसांमधून हवा जोराने बाहेर ढकलली जात असताना होणारा आवाज म्हणजे खोकला. घशातून तोंडाद्वारे ही हवा जोराने बाहेर फेकली जाते आणि कोरडा खोकला येतो. कोरड्या खोकल्यामुळे घशाला आणि तोंडाला वेदना होते. घशात खवखव होते तसेच घशाला सूज येते आणि सर्दी किंवा फ्लूमुळे कोरडा खोकला होऊ शकतो. यावर वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप धरण करू शकते.
मित्रांनो खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण हा सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे मित्रांनो थोड्या दिवसानंतर हा सर्दी खोकला चा त्रास आपल्याला खूपच जाणवू लागतो.
त्याचबरोबर आपल्या छातीमध्येही कफ तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच मित्रांनो यावर वेळच्या वेळी योग्य ते उपाय आपण नक्की केला पाहिजे. मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे छातीमध्ये कफ झालेला असेल आणि ओला खोकला तुम्हाला वारंवार येत असेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही काळीमिरी पावडर एक चमचा मधामध्ये घ्यायची आहे.
त्यानंतर त्याचे सेवन दोन ते तीन दिवसांपर्यंत करायचे आहे. मित्रांनो यामुळे तुमच्या छातीमध्ये असणारा सर्व कप निघून जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जो ओला खोकला झालेला आहे आणि त्यापासून जो त्रास तुम्हाला होत आहे तोही दूर होईल. परंतु मित्रांनो आज आपण सुका खोकला यापासून होणारा त्रास आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो. याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो तुम्हाला सुका खोकला झालेला असेल आणि त्यापासून तुम्हाला खूप त्रास होत असेल तर मित्रांनो अशावेळी आपण कोणता उपाय करू शकतो हे आता जाणून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला सुक्या खोकला पासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवायचे असेल तर मित्रांनो यासंबंधीचा आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय करा.
तर हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला शंभर ग्रॅम गोडेतेल किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर शेंगदाणा तेल तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे गोडेतेल तुम्हाला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चेचून घालायचे आहेत.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला शंभर ग्रॅम तेलामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चेचून घालायचे आहेत म्हणजेच त्याची पेस्ट करून आपल्याला त्या तेलामध्ये घालायचे आहे. हे तेल व्यवस्थितपणे आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते खाली उतरवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा सेंधव मीठ टाकायचा आहे.
त्यानंतर हे तेल आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचा आहे म्हणजेच ते नीट त्या तेलामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण हलवायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण गाळून आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये हे तेल काढून घ्यायचा आहे. मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला कोरडा खोकला होईल आणि त्यापासून त्रास होण्यास सुरुवात होईल.
यावेळी मित्रांनो तुम्हाला या काचेच्या बरणीतून दोन चमचे तेल एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तेल तुम्हाला आपल्या बोटाच्या साह्याने चाटून खायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटात आपल्याला हे दोन चमचे तेल खायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक किंवा दोन तुम्हाला जितक्या होतील तितक्या लसणाच्या पाकळ्या चावून खायचे आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर हा एक छोटासा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे तुम्हाला जो सूका किंवा कोरडा खोकला झालेला आहे आणि त्यापासून जो त्रास होत आहे तो लवकरात लवकर दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.