बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित, काही दिवसापूर्वी वडापाव खाताना दिसली. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवल तो तर आम्ही पण खातो…? पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की या वडापाव ची किंमत किती आहे? आणि माधुरी बरोबर बसलेला तो व्यक्ती कोण आहे?
तर मित्रांनो ही व्यक्ती आहे “टीम कुक” नुकत्याच मुंबई येथे सुरू झालेल्या एप्पलच्या स्टोअरसाठी ते भारतामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माधुरी बरोबर वडापाव वर ताव मारला. पण या वडापाव मध्ये असे काय विशेष.? तर या वडापाव ची किंमत…! तर झाले असे की एप्पल कंपनीचे 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी भारतामध्ये मुंबई या ठिकाणी त्यांचे स्टोर सुरू करण्याची संकल्पना मांडली.
यासाठी स्वतः कंपनीचे सीईओ टीम कुक हे जातीने मुंबईत हजर राहिले. टीम यांनी स्टोअर मधील सर्वांची भेट घेतली तसेच मुंबईमध्ये देखील त्यांनी फेरफटका मारला. त्यावेळी त्यांच्यासोबत मुंबई दर्शन घडवण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांच्याबरोबर होती. मुंबईत फेरफटका मारताना त्यांनी वडापाव वर सुद्धा ताव मारला. माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे फोटो शेअर करत सांगितले आहे की मुंबईमध्ये वडापाव शिवाय कशानेच भारी स्वागत केले जाऊ शकत नाही.
यावर उत्तर देताना टीम यांनी असा रिप्लाय दिला आहे की माधुरी “तू दिलेली वडापाव ची पार्टी अत्यंत उत्तम होती.” तर प्रश्न असा आहे की माधुरी आणि टीम यांनी हा वडापाव खाल्ला तरी कुठे? तर मुंबई येथे “ताडदेव” येथे असणाऱ्या स्वाती स्नॅक सेंटर मध्ये त्यांनी ह्या वडापाव वर ताव मारला. त्या ठिकाणी वडापाव ची किंमतही तशीच आहे तेथे 180 ते 400 पर्यंत किमतीचे वडापाव मिळतात.
माधुरीने खाल्लेल्या वडापाव ची किंमत ही 180 होती त्यामध्ये दोन वडे व पाव मिळतात. स्वाती वडापाव मध्ये अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री वडापाव खाऊन जातात कारण तेथील टेस्ट देखील उत्तम असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.